लसीकरण करणे गरजेचे : अनेक जनावरे आजारी कोगनोळी : कुर्ली तालुका निपाणी येथील लाळखुराक आजाराने तीन जनावरे दगावली आहेत. यामुळे शेतकर्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सध्या सुरू असलेल्या कोरोना काळात शेतकर्यांना आर्थिक फटका बसला आहे. निपाणी तालुक्यामध्ये पशुवैद्यकीय दवाखानाच्या वतीने लाळखुराक लस दोन महिन्यापूर्वीच देण्यात यायला पाहिजे होती. पण …
Read More »शेतकर्यांच्या पिक हानीसंदर्भात अधिवेशनात चर्चा : मुख्यमंत्री बोम्माई
बेळगाव : कोरोनामुळे गेली दोन वर्षे बेळगावात हिवाळी अधिवेशन झालेले नाही. त्यामुळे यावर्षी बेळगावच्या सुवर्णसौध येथे हिवाळी अधिवेशनाचा आयोजित करण्याचे सरकारने निश्चित केले आहे. बेळगावच्या हिवाळी अधिवेशनात राज्यातील जनतेच्या महत्त्वाच्या समस्यांबरोबरच अतिवृष्टीने झालेल्या पिक हानी संदर्भात सविस्तर चर्चा करून निर्णय घेण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी पत्रकार परिषदेत …
Read More »मतदान केंद्रात मोबाईल बंदी करावी : ऐवान डिसोझा यांची मागणी
चिक्कोडी : विधानसभा निवडणुका नि:पक्षपणे पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने राज्यातील प्रत्येक बूथवरील मतदारांवर मोबाईल बंदी घालावी, असे आवाहन काँग्रेसचे निवडणूक आयुक्त ऐवान डिसोझा यांनी केले. चिक्कोडी जिल्हा काँग्रेस कार्यालयात त्यांनी पत्रकार परिषद घेतली, यावेळी ते बोलत होते. मतदारांकडे मोबाईल असल्याने ते संबंधित उमेदवाराकडे जाऊन बूथमध्ये मतदान केलेला फोटो किंवा व्हिडिओ …
Read More »उत्तर प्रदेशात काँग्रेससोबत शिवसेनेची युती?
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात शिवसेना काँग्रेसशी युती करण्याचे संकेत मिळत असल्याने भारतीय जनता पक्षाच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी काँग्रेस नेते राहूल गांधी यांची भेट घेतल्यानंतर काँग्रेस शिवसेना युतीच्या चर्चेला राजकीय वर्तुळात तोंड फुटले. राऊत यांनी मात्र राज्यातील राजकारणासंदर्भात चर्चा झाली उत्तर प्रदेश निवडणुकीच्या संदर्भातही …
Read More »गोव्यात काँग्रेसला मोठा झटका! माजी मुख्यमंत्र्यांचा पक्षाला ‘रामराम’
पणजी : गोव्यात काँग्रेसला आणखी एक दणका बसला आहे. या पक्षाचे विद्यमान आमदार आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री रवि नाईक यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. त्यामुळे गोव्यातील काँग्रेस आमदारांची संख्या आता केवळ तीन वर आली आहे. गेल्या ऑक्टोबर महिन्यात लुईझिन्हो फालेरिओ यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन तृणमुल काँग्रेसचा रस्ता धरला होता. अर्थात …
Read More »समस्या घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांना भेटण्यापासून रोखले
बेळगाव : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आज मंगळवारी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगावला आले आहेत. किणये गावाजवळील रिजेंटा हॉटेलमध्ये भाजप लोकप्रतिनिधी, पदाधिकारी मेळावा आयोजित करण्यात आला आहे.या मेळाव्या मुख्यमंत्री उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर गंदीगवाड येथील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री बोम्मई यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांना मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यापासून रोखण्यात आले. …
Read More »विधान परिषद प्रचारासाठी मुख्यमंत्री उद्या बेळगावात
बेळगाव : विधान परिषद निवडणुकीचे वारे सध्या गतिमान झाले आहे. त्यामुळे राजकीय पक्ष नेत्यांचे दौरे देखील वाढले आहेत. मंगळवार दि. 7 रोजी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई हे बेळगावात येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील पक्षनेते आणि पदाधिकार्यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. यासंदर्भात सोमवारी भाजपचे राज्यप्रवक्ते अॅड. एम. बी. जिरली आणि …
Read More »अलीकडे सिद्धरामय्या खोटे बोलण्यास शिकत आहेत : रमेश जारकीहोळी
बेळगाव : माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे आजही आमचे नेते आहेत. परंतु आजकाल त्यांच्या खोटे बोलण्यात वाढ होत चालली असून अनेकवेळा ते खोटे बोलत आहेत, असे विधान माजी मंत्री आणि आमदार रमेश जारकीहोळी यांनी केले आहे. रायबाग परिसरातील महावीर भवनमध्ये अपक्ष उमेदवार लखन जारकीहोळी यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. सिद्धरामय्या …
Read More »काँग्रेसलाच सदस्यांचा कौल : माणिकराव ठाकरे
संकेश्वर (प्रतिनिधी) : बेळगांव विधानपरिषद निवडणुकीत ग्रामपंचायत, पालिका सदस्यांचा काँग्रेसला कौल असल्याचे चित्र स्पष्ट आहे. त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार चन्नराज हट्टीहोळी यांचा विजय निश्चित असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सांगितले. ते संकेश्वर एसडीव्हीएस सभाभवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बेळगांव विधानपरिषद निवडणूक प्रभारी म्हणून बोलत होते. ते पुढे …
Read More »…तर शाळा, महाविद्यालये पुन्हा बंद; शिक्षण मंत्र्यांची माहिती
विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी तडजोड नाही बंगळूर : राज्यातील विशेषत: शाळा, महाविद्यालयातील कोविड सकारात्मक प्रकरणामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. याच पार्श्वभुमीवर आवश्यक वाटल्यास, कर्नाटक सरकार शाळा आणि महाविद्यालये पुन्हा बंद करून ऑनलाईन वर्ग पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेईल, असे राज्याचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री बी. सी. नागेश म्हणाले. सोमवारी, (ता. 6) …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta