Thursday , September 19 2024
Breaking News

Belgaum Varta

निपाणीला नियोजनबद्ध पाणीपुरवठा होणार

  खासदार प्रियांका जारकीहोळी; जवाहर तलावात गंगापूजन निपाणी (वार्ता) : पडलेल्या दमदार पावसामुळे जवाहर तलाव भरून सांडव्यावरून वाहिला आहे. त्यामुळे यावर्षी पाणीटंचाई भासणार नाही. याशिवाय वर्षभर नियोजनबद्ध पद्धतीने शहर आणि उपनाराला पाणीपुरवठा होणार आहे. त्यासाठी पाणीपुरवठा विभागांनेही यंत्रणा व्यवस्थितपणे हाताळणे आवश्यक असल्याचे मत खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी व्यक्त केले. शनिवारी …

Read More »

विमा कंपनीने लाभार्थींची रक्कम देण्यासाठी ‘रयत’चा मोर्चा

  निपाणी (वार्ता) : जिल्ह्यातील काही विमा कंपनीनी जनतेचे पैसे भरून घेऊन त्यांची रक्कम परत करण्यास टाळाटाळ केली आहे. त्यामुळे न्यायालयाने विमा कंपनीची मालमत्ता विकून लाभार्थींना त्यांचे पैसे परत द्यावे, यासाठी कर्नाटक राज्य रयत संघटनेतर्फे जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालयावर संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार, अध्यक्ष चुनाप्पा पुजारी यांच्या …

Read More »

आमदार – खासदारांच्या नावाचा गैरवापर करून पोलीस अधिकाऱ्यांना धमकावणाऱ्याला अटक

  बेळगाव : बेळगावच्या एसपी आणि आयजीपींना वेगवेगळ्या नंबरवरून फोन करून त्यांचे म्हणणे न ऐकल्यास बदली करण्याची धमकी देणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली आहे. बेळगावचे एसपी भीमाशंकर गुळेद यांनी पत्रकार परिषदेत याबद्दल माहिती देताना सांगितले की, मी गोकाकचे आमदार बोलतोय, मी जिल्हा पालक मंत्री बोलतोय, मी बेळगावचे खासदार बोलतोय. असे …

Read More »

श्रीक्षेत्र धर्मस्थळ ग्राम अभिवृद्धी योजनेतून येळ्ळूर येथील श्रीमती लक्ष्मी ईश्वर चौगुले यांना घर मंजूर

  बेळगाव : येळ्ळूर कार्यक्षेत्रामध्ये श्रीक्षेत्र धर्मस्थळ ग्राम अभिवृद्धी योजनेकडून श्रीमती लक्ष्मी ईश्वर चौगुले लक्ष्मी गल्ली येळ्ळूर यांना वात्सल्य घर मंजूर झाले आहे. त्यासाठी 10,15000 रुपयाचा निधी मंजूर झाला आहे. त्या जागेचे भूमिपूजन सोमवार दिनांक 19/08/2026 रोजी सकाळी 11-00 वाजता संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. दुदाप्पा बागेवाडी हे होते. …

Read More »

माधुरी जाधव फाउंडेशनच्या माध्यमातून मुलीच्या वाढदिवसानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत

  बेळगाव : प्रत्येक वर्षी लक्ष्मीकांत कांबळे हे आपली कन्या कृतिका लक्ष्मीकांत कांबळे हिच्या वाढदिवसानिमित्ताने बऱ्याच ठिकाणी अन्नदान करत असतात. पण यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी होणारी अडचण लक्षात घेऊन त्यांनी माधुरी जाधव फाउंडेशन यांच्याकडे गरजू विद्यार्थ्यांच्या करिता आर्थिक मदत पोहोचविली. फाउंडेशनच्या संस्थापिका माधुरी जाधव यांनी ही मदत श्रीधर केसरकर आणि …

Read More »

कर्ले गावात भर रस्त्यात एकाचा निर्घृण खून

  बेळगाव :  कर्ले गावात एकाचा भर रस्त्यात निर्घृण खून झाल्याची घटना सोमवार दि. 19 रोजी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास घडली. मृताचे नाव मोहन गिद्दु तलवार वय 55 असे आहे. याबाबत समजलेली सविस्तर माहिती अशी की, कर्ले येथील माजी ग्रामपंचायत सदस्य असलेले मोहन तलवार हे सोमवारी दुपारी किणये येथून कर्लेच्या …

Read More »

राज्यपालांच्या विरोधात बेळगाव जिल्हा काँग्रेसचे तीव्र आंदोलन

  बेळगाव : म्हैसूर नगर विकास प्राधिकरणाच्या म्हणजेच मुडाच्या जमीन वाटपासंदर्भातील भ्रष्टाचाराच्या मुद्द्याने राज्यात खळबळ माजवली आहे. यामध्ये मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या चौकशीला राज्यपालांनी अनुमती दिली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने सोमवारी राज्यभरात आंदोलन छेडले. यासाठी बेळगाव जिल्हा काँग्रेसच्या वतीने आरटीओ सर्कल येथील काँग्रेस भवन पासून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. …

Read More »

इस्कॉनमध्ये बलराम जयंती साजरी

  बेळगाव : ‘भगवान श्रीकृष्ण हे आपले बंधू बलराम यांच्या सोबतच पृथ्वीवर प्रकट होतात असे वर्णन श्रीमद् भागवत या ग्रंथातील दहाव्या अध्यायात करण्यात आले आहे’ अशी माहिती इस्कॉनचे ज्येष्ठ संन्यासी परमपूज्य भक्तीरसामृत स्वामी महाराज यांनी सोमवारी सायंकाळी आपल्या व्याख्यानात दिली. बलराम जयंतीच्या निमित्ताने सोमवारपासून महाराजांचे कथाकथनास प्रारंभ झाला. इस्कॉनच्या श्री …

Read More »

खानापूर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे विविध खात्याला निवेदन सादर

  खानापूर : खानापूर व परिसरात गणेश उत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. खानापूर शहरांमध्ये अनेक, सार्वजनिक गणेश उत्सव मंडळे असून त्या सर्वांची आतापासूनच जोरदार तयारी सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर खानापूर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या वतीने अध्यक्ष पंडित ओगले यांच्या नेतृत्वाखाली आज सोमवार दिनांक 19 ऑगस्ट 2024 रोजी विविध मागण्यांसाठी विविध खात्याच्या …

Read More »

रामदेव गल्ली वडगाव येथे 3 मूर्तींची प्रतिष्ठापना कार्यक्रम

  बेळगाव : रामदेव गल्ली, माधवपूर -वडगाव येथे श्री हनुमान, श्री नागदेवता, श्री शिवलिंग व नंदी यांची प्रतिष्ठापना व नव्या मंदिराची वास्तुशांती, विधिवत हवन वगैरे कार्यक्रम बुधवार दि. 21 ऑगस्ट ते शुक्रवार दि. 23 ऑगस्ट पर्यंत आयोजित करण्यात आले आहेत. अनेक देणगीदारांच्या देणगीतून या परिसराचा कायापालट करण्यात आला असून तेथे …

Read More »