Sunday , December 14 2025
Breaking News

Belgaum Varta

जय भवानी कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, खवणेवाडी येथे कबड्डी स्पर्धेचे आयोजन..

  दड्डी : जय भवानी कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ खवनेवाडी ता – हुक्केरी जि – बेळगांव येथे भव्य 58 किलो वजनी गटात कबड्डी स्पर्धेचे आयोजन खास दीपावली निमित्त शनिवार दि. १८/१०/२०२५ रोजी सायंकाळी ठीक ०५ वाजता आयोजित केली आहे. तरी हौशी महाराष्ट्र – कर्नाटक कबड्डी प्रेमींनी याचा लाभ घ्यावा …

Read More »

तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक रविवारी

  बेळगाव : बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक रविवार दिनांक १९ रोजी दुपारी ठीक २.०० वाजता मराठा मंदिर (रेल्वे ओव्हर ब्रिज) येथे होणार आहे. एक नोव्हेंबर काळा दिन संदर्भात विचार विनिमय करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. तरी या बैठकीला बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी, नियंत्रण या …

Read More »

लिंगराज महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची बेळगावातील हिंडलगा मध्यवर्ती कारागृहाला समाजभान जागवणारी भेट

  बेळगाव : बेळगाव येथील कर्नाटक लिंगायत एज्युकेशन संस्थेच्या लिंगराज महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी हिंडलगा मध्यवर्ती कारागृहाला भेट दिली. या भेटीचा उद्देश विद्यार्थ्यांना कारागृहातील सुधारणा प्रक्रिया व समाजातील पुनर्वसन उपक्रमांविषयी माहिती करून देणे हा होता. त्यांनी तेथील प्रशासकीय व्यवस्थेबद्दल आणि कैद्यांच्या विविध प्रकारच्या कामाच्या उपक्रमांबद्दल माहिती गोळा केली. मध्यवर्ती कारागृहाचे …

Read More »

डॉ. अंजलीताई निंबाळकर यांच्या प्रयत्नांना यश; इटगी गावातील ४२ विद्यार्थ्यांची शैक्षणिक समस्या मार्गी

  खानापूर : खानापूर तालुक्यातील इटगी गावातील ४२ शालेय विद्यार्थ्यांची शिक्षणविषयक समस्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी अखेर सोडवली आहे. त्यांनी दिलेले आश्वासन पूर्ण करून विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. काही दिवसांपूर्वीच इटगी गावचे ज्येष्ठ नागरिक, तरुण आणि ग्रामस्थांनी शाळेच्या मागणीसाठी गाव बंद ठेवून आंदोलन केले …

Read More »

शेततळ्यात पडून तीन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू; विजापूर येथील घटना

  विजापूर : शेततळ्यात पाय घसरून पडून तीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची भीषण घटना घडली आहे. एका मुलासह दोन मुलींचा मृत्यू झाल्याची ही दुर्घटना विजापूर तालुक्यातील मिंचनाळ तांडा येथील मादेव नगरात घडली आहे. शिवम्मा राजू राठोड (८), कार्तिक विश्वा राठोड (७) आणि स्वप्ना राजू राठोड (१२) अशी मृत पावलेल्या मुलांची …

Read More »

संत मीरा शाळेच्या प्राथमिक क्रीडा स्पर्धाना प्रारंभ

  बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या प्राथमिक विभागाच्या वार्षिक क्रीडा स्पर्धांना प्रारंभ झाला. स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुण्या म्हणून शाळेचे माजी राष्ट्रीय महिला फुटबॉल खेळाडू सान्वी पाटील, चैत्रा इमोजी, शाळेचे प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी, शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव, गीता भाग्गाणाचे, आशा कुलकर्णी, क्रीडाशिक्षक चंद्रकांत पाटील, …

Read More »

सामाजिक कार्यकर्त्याला विनाकारण मारहाण; आरोपींवर एआयआर दाखल

  बेळगाव : एका सामाजिक कार्यकर्त्याचे वडील जीवन मृत्यूच्या झुंजेत अतिदक्षता विभागात असताना त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी विनाकारण त्यांच्यावर हल्ल्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सामाजिक कार्यकर्ते श्री. शशिकांत आंबेवडकर यांचे वडील रुग्णालयात दाखल होते. त्यावेळी औषध आणण्यासाठी मेडिकलकडे जात असताना त्यांचे काका नारायण आंबेवडकर निवृत्त शिक्षक राहणार …

Read More »

कोल्हापूरात ६ नृत्यांगणांचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न; हाताच्या नस कापल्या अन्…

  कोल्हापूर : कोल्हापुरात सहा नृत्यांगणांनी सामूहिक आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. हाताच्या नसा कापून घेत त्यांनी आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर त्यांना तातडीने सीपीआर रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सहा नृत्यांगणांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला? याची अद्याप माहिती समोर आलेली नाही. सध्या अधिक तपास सुरू आहे. …

Read More »

मार्कंडेय साखर कारखान्याच्या अध्यक्षांचे राजीनामा नाट्य; अडचणीत दिवसेंदिवस वाढ

  बेळगाव : मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याच्या अडचणी कमी होण्याची चिन्ह दिसत नाहीत‌ अध्यक्ष आर आर पाटील यांच्या राजीनाम्या नंतर कारखाना सुरू होण्यात अनिश्चितता दिसून येत आहे. अध्यक्ष आणि माजी अध्यक्ष यांच्या नाराजीचा परिणाम थेट कारखान्याच्या कामकाजावर होत असल्याचे स्पष्ट होत आहे. मार्कंडेय साखर कारखाना सुरू नसल्याने बँकांचे कर्जही थकले …

Read More »

तायक्वांदो स्पर्धेत गोल्ड मेडल पटकविल्याबद्दल नगारजीचा सत्कार

  निपाणी (वार्ता) : येथील नगरपालिका इंग्लिश माध्यम शाळेतील युकेजीमधील विद्यार्थी तैमुर फैय्याज नगारजी यांने बेंगळुरू येथील कोरमंडलम इनडोअर स्टेडियम येथे झालेल्या राज्य स्तरीय तायक्वांदो स्पर्धेतील जी ४ या खेळामध्ये प्रथम क्रमांक आणि कुंफूमध्ये द्वितीय क्रमांक मिळवून गोल्ड मेडल फटकाविले आहे. त्याला प्रशिक्षक उत्तम सूर्यवंशी, कौस्तुभ जाधव,ऋषिकेश भोसले यांचे मार्गदर्शन …

Read More »