निपाणी (वार्ता) : निपाणी येथील पुरातन महादेव मंदिरातील श्री महादेव जप मंडळ, निलांबिका महिला बळग, महादेव गल्लीतर्फे श्रावण महिन्याचे औचित्य साधून येथील पुरातन महादेव मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही २३ व्या जपनाम सोहळ्यसब सव मल्लिकार्जुन वामीजी, श्री. मुरुधेद्र स्वामी विरक्तमठ यांच्या सानिध्यात प्रारंभ झाला. जपनाम कार्यक्रमात दररोज पहाटे ५-४५ ते ६ …
Read More »विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाचा स्तुत्य उपक्रम
बेळगाव शहरातील नामवंत बेळगाव रुरल इंडस्ट्रीज को-ऑपरेटिव्ह सोसायटी, जिजामाता चौक, फोर्ट रोड यांच्या सौजन्याने चव्हाट गल्ली, बेळगाव येथील सरकारी मराठी मुला-मुलींची शाळा क्रमांक ५ येथे गुरुवारी सायंकाळी ठीक ४ वाजता शाळेच्या सभागृहात विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती देवीच्या पूजनाने झाली. सोसायटीचे चेअरमन मारुती सदावर यांच्या हस्ते …
Read More »मद्यपींची ‘गटारी’; पोलिसांची ‘खबरदारी’
हॉटेल, चिकन मटण दुकानासमोर रांगा निपाणी (वार्ता) : गुरुवारपासून श्रावण महिना सुरू झाला आहे. आता महिनाभर हात लावायचा नाही. असे स्वतःलाच बजावत मद्यपी आणि मांसाहारप्रेमी निपाणीकरांनी यंदाची ‘गटारी अमावस्या’ बुधवारी (ता. १२) साजरी केली. त्या पार्श्वभूमीवर हॉटेल्समध्ये टेबलमिळवण्यासाठी ‘वेटिंग’, चिकन मटन दुकानासह वाईन्स शॉपसमोर रांगा लावण्याची वेळ तळीरामांवर आली. …
Read More »श्रावणमास आला… भक्तीची पालखी घेऊन!
हिरवाईच्या साजात नटलेला निसर्ग, मंदिरांत घुमणारा हर हर महादेवचा जयघोष अन् घराघरांत व्रत-वैकल्यांची मंगलमय लगबग “श्रावणमासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहिकडे; क्षणात येते सरसर अन् फिरुनी क्षणात ऊन पडे…” बेळगाव : पावसाच्या रिमझिम सरींनी धरतीला चिंब भिजवित, हिरवाईची शाल पांघरून निसर्गाला नवसंजीवनी देणारा आणि मनामनांत भक्तीची ज्योत प्रज्वलित करणारा …
Read More »इस्कॉनतर्फे मंडपाची मुहूर्तमेढ संपन्न
बेळगाव: येत्या दिनांक 4 व 5 सप्टेंबर रोजी संपन्न होणाऱ्या श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) च्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त इस्कॉनच्या शुक्रवार पेठ टिळकवाडी येथील श्री श्री राधा गोकुलानंद मंदिरासमोर उभारण्यात येणाऱ्या मंडपाची मुहूर्तमेढ नुकतीच करण्यात झाली. इस्कॉन बेळगावचे अध्यक्ष ज्येष्ठ संन्यासी परमपूज्य …
Read More »गुड्सशेड रोडच्या कायमस्वरूपी दुरुस्तीसाठी रहिवाशांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : आज गुड्सशेड रोड, शास्त्रीनगर, आठले गुरुजी रोड, एसपीएम रोड, गोडसे कॉलनी, गोकुळनगर तसेच परिसरातील रहिवाशांनी गुड्सशेड रोडची कायमस्वरूपी दुरुस्ती व विकास करण्याच्या मागणीसाठी माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. गेल्या जवळपास ७ वर्षांपासून हा रस्ता अत्यंत खराब अवस्थेत असून, यामुळे परिसरातील रहिवासी, पादचारी, विद्यार्थी तसेच दररोज या मार्गाने …
Read More »कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल मंत्री शिवराज तंगडगी यांचा सत्कार
निपाणी (वार्ता) : निर्वाचित मंत्री आणि भोवी समाजाचे प्रेरणादायी नेतृत्व शिवराज तंगडगी यांची कर्नाटक राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाले आहे. त्यानिमित्त माजी जिल्हा पंचायत सदस्य व ओ सी सी आय डायरेक्टर राजेंद्र पवार -वडर यांनी बेंगळुरू येथे भेट घेऊन कोल्हापूरचे आराध्य दैवत अंबाबाई देवीचीची मूर्ती देऊन सत्कार केला. यावेळी …
Read More »गणेशोत्सवात डीजेला परवानगी नाही; रात्री १० नंतर ध्वनिक्षेपकावरही बंदी : पोलीस आयुक्त भूषण बोरसे
बेळगाव : गणेशोत्सवादरम्यान डीजे वापरण्यास कोणतीही परवानगी दिली जाणार नाही. सर्वांनी सौहार्दपूर्ण वातावरणात गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी केले. गुरुवारी कुमार गंधर्व कला मंदिर येथे आयोजित गणेशोत्सव पूर्वतयारी बैठकीत ते बोलत होते. मागील वर्षीही गणेशोत्सवादरम्यान डीजेला परवानगी देण्यात आली नव्हती. या निर्णयाचे ज्येष्ठ …
Read More »अफूची वाहतूक करणाऱ्या आरोपीस सीसीबीकडून अटक
बेळगाव : विक्रीच्या उद्देशाने अफूजन्य अमली पदार्थाची वाहतूक करणाऱ्या ६२ वर्षीय आरोपीला बेळगाव सीसीबी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून सुमारे २ किलो ९८८ ग्रॅम अफूजन्य पदार्थ, अंदाजे ४४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (१३ ऑगस्ट) सीसीबी विभागाचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ नाईक यांच्या नेतृत्वाखाली पथकाने …
Read More »इंस्टाग्रामवरील ‘क्यूट कपल’ची कहाणी संपली? कोट्यधीशाशी लग्न केलेली महिला बस कंडक्टरसोबत पळून गेल्याचा पतीचा आरोप
केरळ : सोशल मीडियावर लोकप्रिय असलेल्या केरळमधील अखिल (Akhil NRD) आणि मेघा या दाम्पत्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. इंस्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स असलेल्या या ‘क्यूट कपल’ने रील्स आणि व्ह्लॉग्सच्या माध्यमातून मोठी लोकप्रियता मिळवली होती. मात्र, त्यांच्या वैवाहिक जीवनाबाबत आता एक धक्कादायक दावा समोर आला आहे. अखिलने सोशल …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta