माळमारुती पोलिसांत तक्रार बेळगाव : महांतेशनगर परिसरातील साई कॉलनी येथे बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असा सुमारे तीन लाख दहा हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घरफोडी 25 ते 26 सप्टेंबरदरम्यान घडली असून, याप्रकरणी रविवारी माळमारुती पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. साई कॉलनी …
Read More »महात्मा गांधी संस्थेतर्फे खेळाडू श्रीनाथ निलजकरचा सन्मान
कावळेवाडी.. येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्थेतर्फे बिजगर्णी हायस्कूलचा इ.दहावीत शिकणारा गुणवंत खेळाडू श्रीनाथ चंद्रकांत निलजकर याची जिल्हा स्तरावर गोळा फेक स्पर्धेत निवड झाल्याबद्दल, मान्यवरांच्या हस्ते शाल, सन्मान चिन्ह, रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्थेतर्फे दरवर्षी विविध क्षेत्रातील गुणवंतांचा गौरव केला जातो. श्रीनाथ निलजकरने …
Read More »गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या पोलीस प्रशासनाचे महामंडळाकडून आभार
बेळगाव : मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळ, बेळगावच्या वतीने यंदाचा श्री गणेशोत्सव शांतता, शिस्त व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडण्यासाठी सहकार्य करणाऱ्या बेळगाव पोलीस प्रशासनाचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले. महामंडळाचे अध्यक्ष श्री. रमाकांत दादा कोंडुसकर यांच्या अध्यक्षतेखाली महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आज बेळगावचे पोलीस आयुक्त श्री. प्रकाश निकम तसेच डीसीपी …
Read More »हस्तकला कारागिरांना प्रोत्साहन देण्यासाठी जनतेने पुढे यावे; आम. असिफ सेठ
इंडियन दस्तकार हँडलूम व हँडीक्राफ्ट हाटचे उदघाटन बेळगाव : देशातील वीसहून अधिक राज्यातील विविध हस्तकला कारागिरांची प्रकारची उत्पादने इंडियन दस्तकार हँडलूम व हँडीक्राफ्ट हाटने आज बेळगावात सदाशिवनगर येथील प्रदर्शनात उपलब्ध करून दिली आहेत. हस्तकला कारागिरांना प्रोत्साहन देण्यासाठी बेळगावकरांनी या उत्पादनांचा खरेदी करून लाभ घ्यावा असे आवाहन उत्तरचे आमदार असिफ …
Read More »भारत विकास परिषदेतर्फे “गुरु वंदना – छात्र अभिनंदन” कार्यक्रम
बेळगाव : भारत विकास परिषदेतर्फे ‘गुरु वंदना – छात्र अभिनंदन’ कार्यक्रम संत मीरा शाळेच्या माधव सभागृहात रविवारी सायंकाळी अपूर्व उत्साहात पार पडला. या विशेष कार्यक्रमांतर्गत विविध शाळांच्या 25 उत्कृष्ट शिक्षकांना मानपत्र, शाल व स्मृतिचिन्ह देऊन खास सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे 50 विद्यार्थी-विद्यार्थिनींनाही यावेळी उत्कृष्ट छात्र पुरस्कार देऊन विशेष गौरविण्यात …
Read More »वंटमुरी कॉलनी, बसवन कुडची येथे दोन अंगणवाडी केंद्रांच्या बांधकामाला प्रारंभ
बेळगाव : बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ (राजू) सेठ यांच्या हस्ते वंटमुरी कॉलनी आणि बसवन कुडची येथे दोन नवीन अंगणवाडी केंद्रांच्या बांधकामाला प्रारंभ करण्यात आला. बालकांना चांगल्या शैक्षणिक सुविधा व आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही कामे हाती घेण्यात आली आहेत. यावेळी युवा नेते अमान सेठ यांच्यासह …
Read More »धनगरी ओवी गायनातून लोककलेचे संवर्धन; प्रा. संजय हेरवाडे
कुर्लीत धनगरी ओवी गायन स्पर्धा निपाणी (वार्ता) : सध्याच्या आधुनिक युगात पारंपरिक लोककला लुप्त होत आहेत. नव्या पिढीला मातीतील संस्कृती, ढोल-कैताळाच्या तालाची आणि राम कथासार चरित्रावर आधारित ओव्यांची ओळख करून देण्यासाठी व पारंपारिक लोककलांचे संवर्धन धनगरी ओवी गायन स्पर्धा उत्तम माध्यम असल्याचे मत मुरगूड येथील सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाचे प्रा. …
Read More »म. मं. ताराराणी महाविद्यालयाचा दसरा जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत बेळगाव जिल्ह्यात पहिला क्रमांक!
खानापूर : जिद्द, चिकाटी आणि उत्कृष्ट सांघिक खेळाच्या जोरावर खानापूर येथील म. मं. ताराराणी पी.यू. कॉलेजच्या विद्यार्थिनींनी क्रीडा क्षेत्रात नवा इतिहास रचला आहे. बेळगाव, यळ्ळूर, कडोली, कंग्राळीसह बैलहोंगल, सौंदत्ती , रामदुर्ग अशा खेळाडूंचे निर्विवाद वर्चस्व असणाऱ्या आणि प्रतिष्ठेचे मानलेल्या नुकत्याच पार पडलेल्या दसरा जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत म मं ताराराणी …
Read More »रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया निपाणी तालुका जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन
निपाणी (वार्ता) : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) निपाणी तालुका जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन कोल्हापूर जिल्हा आरपीआयचे उत्तम कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ …
Read More »साधना संघाची जिल्हास्तरीय दसरा स्पर्धेत दमदार बाजी
गोकाक व हुक्केरी संघांवर मात; बागलकोट येथील विभागीय स्पर्धेसाठी पात्र बेळगाव : तालुकास्तरीय दसरा क्रीडा स्पर्धेत अव्वल स्थान पटकावलेल्या साधना संघाने जिल्हास्तरीय स्पर्धेतही दमदार कामगिरी करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. निर्णायक सामन्यांत साधना संघाने गोकाक संघाचा एक डाव व ४ गुणांनी, तर अंतिम सामन्यात हुक्केरी संघाचा एक डाव व …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta