प्रगती नगरातील घटना; माणुसकी जिवंत असल्याचा प्रत्यय निपाणी (वार्ता) : घरातील कचरा घंटागाडीला देताना घाईगडबडीने तीन लाखाचे सोन्याचे दागिने नगर पालिकेच्या घंटागाडीत दिले होते. नगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी कचऱ्याच्या ढिगाऱ्यात शोधून काढत प्रामाणिकपणे संबंधित कुटुंबाच्या स्वाधीन केले. या घटनेमुळे आधुनिक युगातही माणुसकी जिवंत असल्याचा प्रत्यय आला.निपाणी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे …
Read More »चारही स्थायी समित्यांवर ‘समझोता एक्सप्रेस’!
सत्ताधारी-विरोधकांची हातमिळवणी; २८ नगरसेवकांना स्थायी समित्यांमध्ये संधी बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेतील सत्ताधारी आणि विरोधी गटातील राजकीय मतभेद बाजूला ठेवत झालेला समझोता अखेर यशस्वी ठरला. महापालिकेच्या चारही स्थायी समित्यांची निवडणूक बुधवार, दि. १२ ऑगस्ट रोजी बिनविरोध पार पडली. प्रत्येक समितीवर सात सदस्यांची निवड झाल्याने एकूण २८ नगरसेवकांना स्थायी समित्यांमध्ये काम …
Read More »लॉरी-दुचाकीची भीषण धडक; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
बेळगाव : चिक्कोडी तालुक्यातील कब्बूर शहरातील बेल्लद-बागेवाडी रस्त्यावर लॉरी आणि दुचाकीची भीषण धडक होऊन दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. प्रविण रामाप्पा हिरेकुरबर (वय 35) असे मृताचे नाव आहे. ते कब्बूर शहरातील हिरेकुरबर येथील रहिवासी होते. प्रविण हे शहरातून घरासाठी साहित्य खरेदी करून दुचाकीवरून आपल्या घराकडे परतत असताना हा अपघात झाला. …
Read More »‘तिरंगा ऑन व्हील्स’ सायकल रॅलीतून देशभक्तीचा संदेश; तरुणाईचा उत्स्फूर्त सहभाग
बेळगाव : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभक्ती, शिस्त आणि शारीरिक तंदुरुस्तीचा संदेश देण्यासाठी मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरच्या वतीने बेळगावमध्ये ‘तिरंगा ऑन व्हील्स’ सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. भारतीय लष्कराच्या पुढाकारातून झालेल्या या रॅलीत विविध शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक तसेच लष्करी अधिकारी, जेसीओ आणि जवानांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. सुमारे २० किलोमीटरची ही …
Read More »शाळांमध्ये दररोज दहा मिनिटे वृत्तपत्र वाचन
विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी वाढविण्यासाठी धारवाड विभागीय शिक्षण आयुक्तांचा महत्त्वपूर्ण निर्णय बेळगाव : ‘वाचाल तर वाचाल’ हे बोधवाक्य विद्यार्थ्यांच्या अंगवळणी पडावे आणि त्यांच्यामध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी, यासाठी शिक्षण विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. धारवाड विभागीय शिक्षण आयुक्तांनी शाळांमध्ये दररोज सकाळच्या परिपाठाच्या वेळी दहा मिनिटे वृत्तपत्र वाचनाचा उपक्रम राबविण्याचा आदेश …
Read More »सावंतवाडीचे विक्रम नाईक यांना गणित विषयात पीएचडी
सावंतवाडी : सावंतवाडी येथील सुपुत्र विक्रम नाईक यांना नुकताच गणित विषयात पीएचडी प्रदान करण्यात आली. पिलानी राजस्थान, बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून संपादन केल्याबद्दल ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळातर्फे त्यांचा विशेष सन्मान समारंभ आरपीडी हायस्कूलमध्ये आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी सावंतवाडी पतपेढी चेअरमन रमेश बोंद्रे उपस्थित होते. दरवर्षी ज्ञानदीपतर्फे गुणवंतांचा …
Read More »कल्लेहोळच्या शेतकऱ्यांचा जमिनीच्या हक्कासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कल्लेहोळ येथील सुमारे १०० ते १२५ शेतकरी कुटुंबांनी आपल्या हक्काच्या जमिनीच्या संरक्षणासाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. पूर्वजांपासून कसत असलेल्या जमिनीवर भू-माफिया आणि काही प्रशासनिक घटकांकडून कब्जा करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित जमीन गेल्या शंभर वर्षांहून …
Read More »बोरगाव सर्कल कामाबाबत राजेंद्र पवार यांनी घेतली मंत्री सतीश जारकीहोळी यांची भेट
निपाणी (वार्ता) : बोरगाव सर्कल रुंदीकरण व सुशोभीकरण कामाला विलंब होत असल्याने प्रवाशासह वाहनधारकांची गैरसोय होत आहे. त्या पार्श्वभूमीवर माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वडर- पवार यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सतीश जारकीहोळी यांची भेट घेऊन माहिती दिली. मंत्री जारकीहोळी यांच्या अलदाळ येथील गेस्ट हाऊस मध्ये ही भेट घेतली. …
Read More »कर्नाटकातील २३ मंत्र्यांना खातेवाटप; डी. के. शिवकुमारांकडे महत्त्वाची खाती
बंगळुरू : कर्नाटकातील मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील २३ मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आले आहे. राज्यपाल कार्यालयाने बुधवारी यासंदर्भातील अधिसूचना जारी केली असून, खातेवाटप तात्काळ लागू करण्यात आले आहे. मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी अर्थ खाते, मंत्रिमंडळ व्यवहार, कर्मचारी व प्रशासकीय सुधारणा, गुप्तचर, माहिती, कायदा, न्याय व मानवाधिकार, संसदीय कामकाज व …
Read More »अनैतिक संबंधाचा काटा काढण्यासाठी पतीचा खून; पत्नी-प्रियकराला बेड्या
लोखंडी रॉडने घात केला; मोटारसायकलची तोडफोड करून अपघाताचा बनाव; अथणी पोलिसांनी उलगडले खुनाचे गूढ अथणी : अनैतिक संबंधात अडथळा ठरत असलेल्या पतीचा पत्नीने प्रियकराच्या मदतीने काटा काढल्याची धक्कादायक घटना अथणी तालुक्यातील शिरूरजवळ उघडकीस आली आहे. पतीचा लोखंडी रॉडने निर्घृण खून केल्यानंतर मोटारसायकलची तोडफोड करून हा मृत्यू अपघातात झाल्याचा बनाव …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta