निपाणी (वार्ता) : श्री. बाहुबली ब्रह्मचर्याश्रम, बाहुबली संचलित स्तवनिधी येथील श्री पार्श्वनाथ ब्रह्मचर्य आश्रमात (गुरुकुल) रविवारी (ता.८) श्रीमद्देवादिदेव श्री १००८ भगवान सहस्त्रफणी पार्श्वनाथ नूतन मूर्ती प्रतिष्ठापना महोत्सव सोहळा होणार आहे. यावेळी परिसरातील श्रावक- श्राविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजन कमिटीने केले आहे. गुरुकुल प्रणालीचे प्रवर्तक श्री २०८ गुरूदेव समंतभद्र महामुनिराज …
Read More »महिलांमुळेच घडते कुटुंबासह समाज : डॉ. रागिनी पाटील
बोरगावमध्ये महिला दिनानिमित्त व्याख्यान निपाणी (वार्ता) : समाजाच्या प्रगतीमध्ये महिलांचे मोठे योगदान आहे. त्यांच्याशिवाय जीवन अपूर्ण आहे. आई, बहीण, पत्नीच्या रूपामध्ये ती घरातील प्रत्येकासाठी काम करून कुटुंबासह समाज घडविण्याचे काम तिच्या हातून होत असल्याचे मत डॉ. रागिणी पाटील यांनी व्यक्त केले. येथील बोरगाव शिक्षण संघाच्या के. एस पाटील माध्यमिक …
Read More »कर्नाटक अर्थसंकल्प २०२६-२७ : राज्य सरकारच्या कल्याणकारी योजना कायम
पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान विकासाला चालना; ४.४८ लाख कोटीचा भव्य अर्थसंकल्प बंगळूर : मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी शुक्रवारी राज्य विधानसभेत २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठीचा विक्रमी १७ वा अर्थसंकल्प सादर केला. ४.४८ लाख कोटी रुपयांच्या या भव्य अर्थसंकल्पात कल्याणकारी योजना कायम ठेवत पायाभूत सुविधा, शिक्षण, शेती, तंत्रज्ञान आणि सामाजिक न्याय या क्षेत्रांवर …
Read More »अकोळ विविधोद्देश प्राथमिक ग्रामीण कृषी संघाच्या नूतन इमारतीचा सोमवारी उद्घाटन, शतक महोत्सवपूर्ती सोहळा
निपाणी (वार्ता) : संघाचे सभासद, ग्राहक ठेवीदार, पदाधिकारी हितचिंतकांच्या सहकार्याने अकोळ विविधोद्देश प्राथमिक ग्रामीण कृषी संघाची नवीन इमारत बांधली आहे. त्याचा उद्घाटन समारंभ आणि शताब्दी पुर्ती महोत्सव सोहळा सोमवारी (ता.९) सकाळी १०.१५ वाजता आयोजित करण्यात आला आहे. सोहळ्याचे उद्घाटन माजी खासदार, जिल्हा बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेचे …
Read More »खानापूर तालुक्यातील कोंगळा परिसरात हत्तीचा उच्छाद; मोठे नुकसान
खानापूर : खानापूर तालुक्यातील भीमगड अभयारण्य परिसरातील कोंगळा गावात गुरुवारी (ता.५) हत्तीने शेतात घुसून केळी तसेच उन्हाळी वायंगणी भात पिकांची मोठ्या प्रमाणावर नासधूस केल्याची घटना घडली. या घटनेत शेतकरी जयवंत गावकर यांच्या शेतातील पिकांचे सुमारे ५० हजार रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, …
Read More »खासदार प्रियांका जारकिहोळी यांच्या हस्ते शनिवारी विविध विकास कामाचा प्रारंभ
निपाणी (वार्ता) : खासदार प्रियांका जारकीहोळी यांच्या प्रयत्नाने सार्वजनिक बांधकाम खात्याच्या एससीपीटीएसपी फंडातून निपाणी मतदारसंघातील १२ गावांना रस्ता कामांसाठी २ कोटी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामधून होणाऱ्या कामांचा प्रारंभ (ता.७) शनिवारी होणार आहे. यासाठी खासदार प्रियांका जारकीहोळी या उपस्थित असणार आहेत. या निधीतून १२ गावांमधील मागासवर्गीय …
Read More »आला उन्हाळा, वाहनांना सांभाळा!
वाढत्या तापमानामुळे आग; स्वतःसह वाहनांची घ्या काळजी निपाणी (वार्ता) : यंदा फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच निपाणी आणि परिसरात तीव्र उन्हाच्या झळांचा सामना करावा लागत आहे. पारा ३१ अंशावर पोहोचला आहे. दरवर्षी मार्च, एप्रिल व मे महिन्यात अशा वाढत्या उष्यामुळे आग लागण्याच्या घटनांत वाढ होत आहे. दोनच दिवसापूर्वी येथील अक्कोळ …
Read More »बोरगाव अरिहंत क्रेडिट संस्थेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रम
निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील श्री अरिहंत को-ऑप. क्रेडिट (मल्टीस्टेट) संस्थेच्या कारदगा शाखेतर्फे येथील अरिहंत सभागृह गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे धनादेश वितरण करून सन्मानित करण्यात आले. अरिहंत उद्योग समूहाचे कार्याध्यक्ष अभिनंदन उर्फ बच्चू पाटी आणि सहकारत्न उत्तमआण्णा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. सर्वसामान्य आणि गरजू विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी …
Read More »बोरगाव के. एस. पाटील हायस्कूलमध्ये दहावी विद्याथ्यर्थ्यांचा सदिच्छा समारंभ
निपाणी (वार्ता) : बोरगांव येथील बोरगाव शिक्षण संघाच्या के. एस. पाटील माध्यमिक शाळेत दहावी विद्याथ्यर्थ्यांचा सदिच्छा समारंभ पार पडला. अध्यक्षस्थानी शिक्षण संधाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून निपाणी येथील व्हीएसएम कॉलेजचे सीईओ डॉ. एस. बी. पाटील होते. व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन आणि दीप प्रज्वलन झाले. सन २०२५ …
Read More »उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचे निपाणीतील कार्यकर्त्यातर्फे जंगी स्वागत
निपाणी (वार्ता) : राज्याचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे आमदार प्रकाश हुक्केरी यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी एकसंबा येथे जाणार होते. तत्पूर्वी त्यांनी कोल्हापूर येथील महालक्ष्मीचे दर्शन घेऊन निपाणीमार्गे जाताना पहिल्यांदाच निपाणीला भेट दिली. यावेळी येथील कार्यकर्त्यांनी बसस्थानकाजवळील धर्मवीर संभाजीराजे चौकात फटाक्यांची आतषबाजी करून त्यांचे जंगी स्वागत केले. यावेळी टाऊन …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta