Monday , September 21 2026
Breaking News

Belgaum Varta

मंदिरांना हात लावाल तर खबरदार…

देवस्थान मंडळाच्यावतीने प्रशासनाला निवेदन बेळगाव : सार्वजनिक मंदिरे आणि प्रार्थनास्थळे हटविण्याचा आदेश देण्यात आला असला तरी आमचा त्याला तीव्र विरोध आहे, जर आमची मंदिर हटविण्याचा फाजील प्रयत्न केल्यास जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, सज्जड इशारा बेळगाव शहर देवस्थान मंडळाचे अध्यक्ष व महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रणजीत चव्हाण-पाटील यांनी दिला आहे. …

Read More »

देशाच्या जडणघडणीत अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

मंडळ पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी : निपाणीत अभियंता दिन निपाणी : शिक्षकांमुळे समाजाची प्रगती, पोलिसांमुळे शांतता, सुव्यवस्था राखली जाते. त्यापाठोपाठ रस्ते, घरबांधणी चांगली होण्यासाठी दळणवळण सुरळीत करण्यासाठी अभियंत्यांनी कार्य केले आहेत. त्यांच्यामुळेच जलाशये, पूल अशी महत्त्वाची कामे होत आहेत देशाच्या जडणघडणीत अभियंत्यांचे योगदान महत्वाचे आहे, असे मत मंडल पोलीस निरीक्षक …

Read More »

निपाणीत रात्रीचा प्रवास धोक्याचा!

भटके कुत्रे आवरा : कुत्र्यांच्या झुंडींनी घेतला रस्ते व चौकांचा ताबा निपाणी : गत महिन्यापासून शहरात मोकाट कुत्र्यांचा त्रास पुन्हा वाढला आहे. रस्त्यांवर, चौकांमध्ये व वसाहतींमधील कुत्र्यांच्या झुंडीनी नागरिकांना हैराण करून सोडले आहे. अनेकांना चावा घेतल्यामुळे जायबंदी व्हावे लागत आहे. तर रस्त्यावर अचानक वाहनासमोर कुत्रे आल्याने अपघातही झाले आहेत. मोकाट …

Read More »

श्रीगणेश-2021 किताबचा तानाजी चौगुले मानकरी

बेळगाव : बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटना आणि मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ झेंडा चौक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रत्नाकर शेट्टी स्मृती 17 व्या श्रीगणेश जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेतील मानाचा ‘श्री गणेश -2021 किताब’ रॉ फिटनेस जिमच्या तानाजी चौगुले याने पटकाविला आहे. रामनाथ मंगल कार्यालय येथे काल मंगळवारी रात्री सदर शरीरसौष्ठव स्पर्धा …

Read More »

डी. के. शिवकुमार यांना न्यायालयाकडून वॉरंट

29 ला हजर राहण्याची सूचना बंगळूर : केपीसीसीचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्याविरोधात वॉरंट जारी करण्यात आले आहे. दक्षिण कन्नड जिल्ह्याच्या सुळ्ये न्यायालयाने वॉरंट जारी करून 29 सप्टेंबरला न्यायालयासमोर हजर राहण्यासाठी डीजी व आयजीपीनाही नोटीस जारी करण्यात आली आहे. सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये ऊर्जा मंत्री असताना डी. के. शिवकुमार यांना …

Read More »

नरेंद्र दाभोलकर प्रकरणात अखेर आरोप निश्चिती; आरोपींनी आरोप फेटाळले

पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला आठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर बुधवारी गुन्ह्यातील पाच आरोपींवर दोषारोप निश्चित करण्यात आले. डॉ. विरेंद्रसिंह तावडे, शरद कळसकर, सचिन अंदुरे, विक्रम भावे, ऍड. संजीव पुनाळेकर यांच्यावर ही आरोप निश्चिती करण्यात आली. विशेष न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी ही आरोप निश्चिती केली. …

Read More »

करंबळच्या बेपत्ता तरूणाचा मृतदेह आढळला मलप्रभा नदीत

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील करंबळ गावच्या बेपत्ता झालेल्या तरूणाचा मृतदेह मलप्रभा नदीत सापडला. त्या तरूणाचे नाव परशराम जयराम पाटील वय २७ असे आहे.याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, गेल्या पंधरा दिवसापूर्वी कामाला जातो म्हणून घराबाहेर पडलेल्याचा दोन दिवस झाले तरी पत्ता नाही. म्हणून घरच्यानी शोधाशोध करून पाहिले. परंतु कुठेच …

Read More »

पान दुकानदाराचा निर्घृण खून

बेळगाव : पान उधारी देण्यास नकार दिल्याने पान दुकानदाराचा चाकूने वार करून खून केल्याची घटना मंगळवारी रात्री उशिरा घडली आहे. वडगाव भागातील लक्ष्मीनगर येथे ही घटना घडली आहे. बाळकृष्ण नागेश शेट्टी (५०) रा.लक्ष्मीनगर असे मृत पान दुकानदाराचे नाव आहे. या प्रकरणी दत्तात्रय शिवानंद जंतिकट्टी रा.भारत नगर दुसरा क्रॉस याच्यावर शहापूर …

Read More »

आत्मदहनाचा इशारा अन् आरसीयु पदव्युत्तर परीक्षा पुढे

बेळगाव : विद्यार्थ्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर राणी चन्नमा विद्यापीठाने (आरसीयु) पदव्यूत्तरच्या अंतिम वर्षातील परीक्षा चार दिवस पुढे ढकलल्या आहेत. या परीक्षा मंगळवारपासून होणार होत्या. मात्र, विद्यार्थ्यांनी विद्यापीठ आवारात सोमवारी आंदोलन केल्यामुळे या परीक्षा पुढे ढकलल्या असून सदरच्या परीक्षांना शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे.विद्यापीठाने गेल्या वीस दिवसांपुर्वी मागील सेमीस्टरच्या परीक्षा घेतल्या होत्या. महिनाभरातच …

Read More »

घरगुती बाप्पांना आज निरोप, बेळगावात 29 फिरते विसर्जन कुंड

बेळगाव : घरगुती गौरी गणपतींचे आज मंगळवारी गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी विसर्जन होत आहे. दरम्यान बेळगाव महापालिका व प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून गौरी गणपती विसर्जनासाठी 29 फिरते विसर्जन कुंड उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.पीओपी आणि रंगांमुळे तलावांचे पाणी प्रदूषित होऊ नये याची खबरदारी घेत, दरवर्षी फिरते विसर्जन कुंड उपलब्ध करून दिले जातात. …

Read More »