Monday , September 21 2026
Breaking News

Belgaum Varta

कुत्रा चावल्याने रयत गल्लीतील लहान मुलगी जखमी

  बेळगाव : रयत गल्लीतील बेवारस कुत्री गल्लीत बाहेर लावलेल्या वाहनांच्या शिट, कारकवर, चप्पल, वाळत घातलेले कपडे गेल्या अनेक वर्षांपासून रात्री फाडताहेत त्यामूळे गल्लीतील लोक अक्षरशः कंटाळले असतानाच सोमवारी अचानक कुत्र्यांनी दहा वर्षांच्या निविका जितेंद्रसिंह राठोड वय १० वर्षांच्या या मुलीला रविवारी दुपारी चावल्याने ती बरीच जखमी झाल्याने सरकारी रुग्णालयात …

Read More »

उचगाव मराठी साहित्य अकादमीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली संमेलन अध्यक्षपदी इंद्रजीत देशमुख यांची भेट

  उचगाव : उचगाव येथे रविवारी दिनांक 18 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या उचगाव मराठी साहित्य अकादमी आयोजित 25 व्या उचगाव मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक इंद्रजीत देशमुख यावर्षी उपस्थित राहणार आहेत. उचगाव मराठी साहित्य अकादमीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या निवासस्थानी नुकतीच त्यांची भेट घेऊन त्यांना निमंत्रण दिले आहे. त्यांनी या निमंत्रणाचा …

Read More »

भारत विकास परिषदेतर्फे स्वामी विवेकानंद जयंती अपूर्व उत्साहात साजरी

  बेळगाव : भारत विकास परिषदेतर्फे स्वामी विवेकानंद जयंती अपूर्व उत्साहात जीजीसी सभागृहात साजरी करण्यात आली. प्रारंभी स्वामी विवेकानंद आणि भारतमातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजा करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. अक्षता मोरे यांनी संपूर्ण वंदे मातरम् प्रस्तुत केले. परिषदेचे अध्यक्ष विनायक मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक …

Read More »

संक्रांतीच्या वाणात पर्यावरणपूरक वस्तूंचा ‘ट्रेंड’

  कापडी पिशव्या, लाकडाच्या वस्तू ; निपाणीत महिलांकडून खरेदी सुररु निपाणी (वार्ता) : मकर संक्रांत एक दिवसावर आली आहे. त्यामुळे हळदी- कुंकू वाण देण्याच्या वस्तूंसाठी येथील बाजारात महिलांची वर्दळ दिसत आहे. केवळ हळदी- कुंकू आणि तीळगूळ देण्यापेक्षा यंदा परवडणाऱ्या उपयोगी आणि पर्यावरणपूरक वस्तू खरेदीकडे महिलांचा विशेष कल आहे. बाजारात कमी …

Read More »

बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक गुरुवारी

  बेळगाव : १७ जानेवारी हुतात्मा दिन व सीमा लढ्याच्या पुढील वाटचालीबद्दल विचारविनिमय करण्यासाठी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे बैठक गुरुवार दिनांक १५ रोजी दुपारी ठीक २.०० वाजता मराठा मंदिर (रेल्वे ओव्हर ब्रिज) येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये १७ जानेवारी १९५६ रोजी झालेल्या सत्याग्रहात हुतात्मा झालेल्या हुतात्माना अभिवादन …

Read More »

प्रभाग २९ चा संघ ठरला ‘मालक’ चषकाचा मानकरी

  प्रभाग ‌३० चार संघ उपविजेता; ३१ प्रभागातील संघाचा सहभाग निपाणी (वार्ता) : येथील म्युनिसिपल हायस्कूलच्या मैदानावर सलग पाच दिवस प्रकाश झोतातील प्रभाग नुसार क्रिकेट स्पर्धा पार पडल्या. स्पर्धेतील अंतिम सामना वार्ड क्रमांक २९ व वार्ड क्रमांक ३० यांच्यात झाला. प्रथम वार्ड क्रमांक २९ संघाने निर्धारित सहा षटकांत ७७ धावा …

Read More »

मराठी सन्मान यात्रेची सुरुवात स्वराज्याची राजधानी रायगडावरून

  बेळगाव : मराठा मंदिर येथे झालेल्या महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या बैठकीत सुरुवातीला 17 जानेवारी रोजी हुतात्मा दिनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले त्याच बरोबर इतर विषयांवर चर्चा करण्यात आली. त्या नंतर महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने काढण्यात येणाऱ्या मराठी सन्मान यात्रेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी …

Read More »

गळतगा रेणुका यात्रेच्या पार्श्वभूमीवर पोलीस, शांतता कमिटीची बैठक

  निपाणी (वार्ता) : गळतगा (ता.निपाणी) येथील ग्रामदैवत श्री रेणुका देवीची यात्रा मंगळवार (ता.१३) आणि बुधवारी (ता.१४) होणार आहे. यात्रेच्यावेळी शांतता आणि सुव्यवस्थेसाठी यात्रा कमिटी आणि पोलीस प्रशासनाची सदलगा पोलीस स्टेशनचे पीएसआय शिवकुमार बिरादार यांच्या नेतृत्वाखाली शांतता बैठक पार पडली. यावेळी माजी जिल्हा पंचायत सदस्य व ओसीसीआयचे राज्याचे संचालक राजेंद्र …

Read More »

कॉम्रेड कृष्णा मेणसे पुरस्काराचे मानकरी कॉम्रेड अमरजीत कौर

  बेळगाव : कॉम्रेड कृष्णा मेणसे पुरस्काराच्या मानकरी कॉम्रेड अमरजीत कौर या श्रमजीवी महिला व कष्टकरी जनतेच्या नेत्या आहेत. कम्युनिस्ट पक्षप्रणित आयटक कामगार संघटनेच्या त्या राष्ट्रीय महासचिव आहेत. तसेच जागतिक कामगार महासंघाच्या उपाध्यक्षा व भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राष्ट्रीय सचिव मंडळाच्या सदस्या आहेत. ७४ वर्षाच्या अमरजीत कौर या स्वतंत्र भारतातील मध्यवर्ती …

Read More »

मराठी भाषा आणि संस्कृती टिकविणे मराठी माणसाचे कर्तव्य : बाळासाहेब देसाई

  उचगाव मराठी साहित्य संमेलनाच्या शामियानाचा मुहूर्तमेढ कार्यक्रम उचगाव (वार्ता) : मराठी भाषा आणि संस्कृती वाढविणे आणि टिकविणे हे सर्वस्वी मराठी माणसांमध्ये आहे. मराठी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून आज खऱ्या अर्थाने ती वृद्धिंगत होत असल्याचे मनोगत लँड ट्रिब्युनलचे संचालक बाळासाहेब देसाई यांनी या मुहूर्तमेढ कार्यक्रम प्रसंगी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केले. उचगाव …

Read More »