Monday , June 1 2026
Breaking News

संकेश्वर

बेळगावात विहिंप-बजरंग दलातर्फे औषधी काढ्याचे वाटप

बेळगाव : विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलातर्फे कणेरीमठात बनविण्यात आलेल्या काढ्याचे बेळगावात विविध ठिकाणी वितरण करण्यात आले. डीसीपी डॉ. विक्रम आमटे यांच्या हस्ते या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.कोरोना महामारी रोखण्यासाठी लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. याच दरम्यान, कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी रोग प्रतिकारक शक्ती वाढविणारी विविध प्रकारची औषधे वाटण्याचा उपक्रम …

Read More »

डिस्ट्रीक्ट बुक सेलर्स अँड स्टेशनरीज असोसिएशनने दिला 21 रोजी आंदोलनाचा इशारा

बेळगाव : शाळा-महाविद्यालयांसह बाजारपेठ सुरू होण्यातील अनिश्चिततेमुळे गेल्या दीड वर्षापासून पुस्तक विक्री आणि स्टेशनरी व्यवसायावर अत्यंत प्रतिकूल परिणाम झाला आहे. संबंधित दुकानदारांना मोठे नुकसान आणि अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. तेंव्हा येत्या सोमवार दि. 21 जून रोजी सरकारने घालून दिलेल्या वेळेत सरसकट सर्व दुकाने खुली करण्यास परवानगी दिली जावी अन्यथा …

Read More »

कर्नाटक मायग्रेशन देईना अन् महाराष्ट्र परीक्षेला बसू देईना!

प्रा. राजन चिकोडे यांचे पत्रक : सीमाभागातील विद्यार्थ्यांची कुचंबना निपाणी : शिक्षणासाठी परराज्यातून येणार्‍या विद्यार्थ्यांना स्थलांतर (मायग्रेशन) दाखला देणे बंधनकारक आहे. सीमाभागातील बहुसंख्य विद्यार्थी 10 वी नंतर महाराष्ट्र राज्यात शिक्षणासाठी जातात. पण स्थलांतर दाखला कधीच वेळत मिळत नाही. त्यामुळे विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे सर्व दाखले वेळत …

Read More »

कोरोना सेंटरमध्ये रंगला भक्तीगीत भजनाचा नाद!

जोल्ले कोविड सेंटरमध्ये उपक्रम : इंद्रजीत देशमुखांची प्रेरणा निपाणी (संजय सुर्यवंशी) : ’माणसाने माणसाशी माणसासम वागणे’ या उक्तीप्रमाणे कोल्हापूर येथील माजी कार्यकारी अधिकारी इंद्रजीत देशमुख यांच्या प्रेरणेतून समाजाला काहीतरी देणे लागतो, या उद्देशाने सध्याच्या परिस्थितीत कोरोनासारख्या रोगाला हटवण्यासाठी समाजातील वेगवेगळे घटक आपआपल्यापरिने मदत करीत आहेत. भजनाच्या माध्यमातून कोरोना रुग्णाचे आत्मबल …

Read More »

दरबार गल्लीमध्ये पोलिसांवर हल्ला

एक पोलीस जखमी; मारहाण करणारे तरुण पसार बेळगाव : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर नाकाबंदी करणाऱ्या पोलिसांवर सोमवारी रात्री काही टवाळखोरांनी हल्ला केल्याची खळबळजनक घटना दरबार गल्ली येथील अतिसंवेदनशील चौकात घडली. या हल्ल्यात एक पोलिस जखमी झाले आहेत. हल्ला करून पसार झालेल्या पाच हल्लेखोरांचा शोध मार्केट पोलीस घेत आहेत. सध्या बेळगावसह संपूर्ण कर्नाटक …

Read More »

कोगनोळी येथे एकाची गळफासाने आत्महत्या

कोगनोळी : कोगनोळी तालुका निपाणी येथे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवार तारीख 14 रोजी दुपारी उघडकीस आली. अनिल राजगोंडा पाटील (वय वर्षे 63) राहणार कोगनोळी, तालुका निपाणी असे मयत व्यक्तीचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांच्याकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, अनिल पाटील हे सकाळी शेताकडे जाऊन येतो म्हणून …

Read More »

खानापूर तालुका युवा समितीच्यावतीने उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांना निवेदन सादर

बेळगाव : कोल्हापूर जिल्ह्यातील वाढत्या कोरोनाबधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे आढावा बैठकीसाठी कोल्हापुरात आले असता खानापूर युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली आणि सीमाप्रश्नाबाबत आणि इतर विषयांवर सविस्तर चर्चा केली आणि निवेदन सादर केले. खानापूर युवा समितीने दिलेल्या …

Read More »

खाकी वर्दीने जोपासली माणुसकी!

गांधी रुग्णालयाला दिले वैद्यकीय साहित्य : कोरोना रुग्णांची झाली सोय निपाणी (संजय सूर्यवंशी) : येथील शासकीय महात्मा गांधी रुग्णालयामधील कोरोना रुग्णांसाठी निपाणी पोलिसांनी एक पाऊल पुढे टाकून मदतीचा हात दिला आहे. जिल्हा पोलिस प्रशासनाच्या सूचनेनुसार येथील पोलिसांच्यावतीने गांधी रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांसाठी कोविड उपचार किट व साहित्याची मदत देण्यात …

Read More »

अब की बार पेट्रोल 100 रुपये पार!

सामान्यांच्या खिशाला कात्री : सायकलींचा वापर वाढणार निपाणी (संजय सूर्यवंशी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने लॉकडाउनसह अनेक निर्बंध घातले आहेत. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प आहेत. असे असले तरी पेट्रोलची दरवाढ मात्र कमी होत नसल्याचे दिसत आहे. सातत्याने दरवाढ होत असून पेट्रोलने सोमवारी (ता.14) 100 रूपयावर पोहोचले आहे. यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. …

Read More »

निपाणीत पोलिसांना मास्क, सॅनिटायझर वितरण

सतीश जारकिहोळी यांचे सहकार्य : तीन पोलिस ठाण्याचा समावेश निपाणी : कर्नाटक राज्य काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष सतीश जारकिहोळी यांच्यातर्फे कोरोना काळात फटका बसलेल्या गरजूंना मदत करण्यासह कोरोना योद्धे म्हणून काम करत असलेल्या पोलिसांना मास्क, सॅनिटायझर वितरणाचा उपक्रम सुरू आहे. त्याप्रमाणे निपाणीतही शहर, ग्रामीण, बसवेश्वर चौक आणि मंडल पोलिस निरीक्षक कार्यालयातील …

Read More »