बेळगाव : बेळगाव शहरात 24/7 पाणीपुरवठा योजनेअंतर्गत 24 तास पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचे प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. दक्षिण मतदार संघातील वडगाव परिसरात गुरुवार दिनांक 12 फेब्रुवारी पासून प्रायोगिक तत्त्वावर 24 तास पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असून टप्प्याटप्प्याने या भागातील पाणीपुरवठा योजनेला चालना देण्यात येणार आहे. यासंदर्भात बेळगाव …
Read More »बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रामार्फत ज्ञान व मनोरंजनाचा कार्यक्रम
बेळगाव : बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रामार्फत ज्ञान व मनोरंजनाचा कार्यक्रम डॉ. निता देशपांडे डायबेटिस सेंटर सोमवारपेठ टिळकवाडी येथे उत्साहात संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष विश्वास धुराजी, उपाध्यक्ष के एल मजूकर, कार्यवाह सुरेन्द्र देसाई, सहकार्यवाह शिवराज पाटील व डॉ. नागभूषण चौगुले हे उपस्थित होते. यावेळी …
Read More »पंचहमी योजनांतर्गत खानापूर तालुक्यात ५०० कोटींचा लाभ : डॉ. अंजलीताई निंबाळकर
खानापूर : राज्य सरकारच्या पंचहमी योजनांमुळे खानापूर तालुक्यातील गोरगरीब जनतेपर्यंत आत्तापर्यंत साधारणपणे ५०० कोटी रुपये पोहोचल्याची माहिती आमदार डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर यांनी दिली. काँग्रेस सरकारने निवडणुकीत दिलेल्या आश्वासनानुसार गोरगरीब, सामान्य, कष्टकरी, कामगार, शेतकरी आणि महिलांच्या उन्नतीसाठी पंचहमी योजना प्रभावीपणे राबविल्या असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यभरात सुमारे १००० दिवसांत पंचहमी …
Read More »युवा समिती बेळगावच्या वतीने १ मार्च २०२६ रोजी मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची महत्त्वपूर्ण बैठक आज शनिवार १४ रोजी युवा समिती कार्यालयात अध्यक्ष अंकुश केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सदर बैठकीत १ मार्च २०२६ रोजी मराठा मंदिर येथे मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून सामान्यज्ञान स्पर्धेचा बक्षिस वितरण, आदर्श शाळा पुरस्कार वितरण आणि मराठी भाषा गौरव …
Read More »शेंगदाणा पावणे दोनशे पार, भगर दीडशेहे
उपवास निरंकार; महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर फराळ महागला निपाणी (वार्ता) : महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर उपवास करणाऱ्या भाविकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. येथील बाजारपेठेत फराळाच्या साहित्याचे दर कडाडले असून केवळ सुका मेवाच नाही, तर साध्या फळांचेही दर गगनाला भिडले आहेत. विशेषता शेंगदाण्याने पावणे दोनशे पार तर भगर दीडशेहे रुपये किलो पर्यंत मजल मारली …
Read More »महाअभिषेक, महाप्रसादाने साई महोत्सवाची सांगता
साईस्तवन मंजिरीचे सामूहिक पारायण; दिवसभर भाविकांची गर्दी निपाणी (वार्ता) : निपाणीयेथील साईशंकर नगर मधील साई मंदिरात दोन दिवसापासून आयोजित साई यात्रा महोत्सवात पालखी मिरवणुक, अभिषेक, पूजा, महाअभिषेक, महाप्रसादासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी (ता.१४) रात्री शेजारतीने सोहळ्याची सांगता करण्यात आली. शनिवारी (ता. १४ रोजी पहाटे काकड आरती, …
Read More »डोंगराळ भागाच्या पाण्यासह रोजगार निर्मितीसाठी प्रयत्नशील
सहकाररत्न उत्तम पाटील ; शेंडूर, गोंदूकुप्पीतील कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश निपाणी (वार्ता) : निरंतरपणे समाजसेवा आणि निवडणुकीच्या वेळी राजकारण केल्यामुळे सर्वसामान्य नागरिक आमच्या पाठीशी सदैव आहेत. सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवत महिलांच्या विकासात्मक धोरणांवर कार्य सुरू आहे. डोंगराळ भागात असलेल्या शेंडूर, गोंदूकुप् पीपरिसरात रोजगारनिर्मिती वाढवणे, युवकांना स्थानिक स्तरावर संधी उपलब्ध करून …
Read More »श्री गुरुदेव रानडे मंदिरच्या शताब्दी महोत्सवानिमित्त “स्वरसंध्या” संगीत मैफलीने श्रोते मंत्रमुग्ध
बेळगाव : हिंदवाडी येथील विख्यात श्री गुरुदेव रानडे मंदिरच्या अकॅडमी ऑफ कॉम्परेटिव्ह फिलॉसॉफी अँड रिलिजनला 100 वर्षे पूर्तीनिमित्त शताब्दी महोत्सवांतर्गत गुरूवारी सायंकाळी मंदिरच्या दिव्य सभागृहात आयोजित भक्तीरसपूर्ण “स्वरसंध्या” कार्यक्रमास रसिक श्रोत्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. गायक विनायक मोरे, ऋषिकेश हेर्लेकर, योगेश रामदास, गायिका सुलक्षणा देसाई, अक्षता मोरे यांनी एकाहून एक …
Read More »चुडाप्पा हलगेकर कुस्ती प्रोत्साहन समितीच्या वतीने २२ फेब्रुवारीला भव्य कुस्ती मैदान
बेळगाव : चुडाप्पा हलगेकर कुस्ती प्रोत्साहन समितीच्या वतीने २२ फेब्रुवारी रोजी आनंदवाडी येथे भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे. पारंपरिक मल्लविद्या जिवंत ठेवणे आणि लहान मुलांना कुस्तीची प्रेरणा देणे हा समितीचा मुख्य उद्देश असल्याची माहिती आयोजकांनी दिली. गेल्या २६ वर्षांपासून समिती सातत्याने कुस्ती मैदान भरवत असून बेळगावकरांच्या सहकार्याने …
Read More »बालहक्क संरक्षण आयोग अध्यक्षांची खडेबाजार पोलीस स्थानकाला अचानक भेट
बेळगाव : कर्नाटक राज्य बालहक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष शशिधर एस. कोसंबे यांनी शुक्रवारी खडेबाजार पोलीस स्थानकाला अचानक भेट देत बालकांसाठी कार्यरत विशेष पोलीस युनिटच्या कामकाजाची सखोल पाहणी केली. भेटीदरम्यान बालकांशी संबंधित प्रकरणांची नोंद, अहवाल प्रक्रिया आणि आवश्यक फलकांविषयी त्यांनी स्पष्ट निर्देश दिले. बाल न्याय (बालकांचे संरक्षण व संगोपन) अधिनियम …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta