Monday , September 21 2026
Breaking News

Belgaum Varta

प्रगणकांनी काम संपवले; महापालिकेचे किट अजूनही हवेत!

  प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्न बेळगाव : बेळगाव शहर परिसरात सुरू असलेल्या जनगणनेच्या कामामध्ये नियोजनाचा अभाव उघड झाल्याची चर्चा सुरू आहे. अनेक प्रगणकांनी आपल्या वाट्याला आलेल्या विभागातील घरांची गणती पूर्ण केली असली तरी त्यांना आवश्यक साधनसामग्री अद्यापही उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रगणकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. जनगणनेच्या कामासाठी …

Read More »

पोलीस विभागाकडून विकास कलघटगी यांचे कौतुक; प्रशंसापत्र प्रदान

  बेळगाव : बेळगाव शहरातील शिवजयंती उत्सव आणि भव्य चित्ररथ मिरवणूक यंदा उत्साहात आणि पूर्णतः शांततेत पार पडली. या यशामागे अनेकांचे योगदान असून, त्यामध्ये शिवजयंती मंडळ आणि प्रशासनात समन्वय साधणारे विकास आर. कलघटगी यांची भूमिका विशेष ठरली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत पोलीस विभागाने त्यांचे कौतुक करत प्रशंसापत्र प्रदान …

Read More »

हरवलेली पर्स प्रामाणिकपणे परत; बस वाहक व चालकाचे कौतुक

  बेळगाव : मच्छे येथील रहिवासी चैत्राली संदीप वागोजी यांची बुधवार दिनांक 15-04-2026 रोजी उद्यमबाग ते पिरणवाडी दरम्यान बस प्रवास करत असताना पर्स हरवली होती. सदर बस वायव्य कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बेळगाव येथील दुसऱ्या डेपोतील अनुसूची क्रमांक १०८ (सी.बी.टी – तीर्थकुंडे मार्ग) वर धावत होती. या बसमध्ये कर्तव्य …

Read More »

बेन्सन्स इंटरनॅशनल अकॅडमी शाळेचा गौरव

  बेळगाव : ‘मायेचा एक घास भारतीय जवानांसाठी’ या उपक्रमांतर्गत आयोजित राज्यस्तरीय ग्रीटिंग कार्ड स्पर्धेत बेन्सन्स इंटरनॅशनल अकॅडमी बेनकनहळ्ळी बेळगाव शाळेतील 55 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत महाराष्ट्रातील १६००० स्पर्धकांसोबत यश संपादन केले. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल शाळेचा गौरव दिनांक 18 एप्रिल रोजी करण्यात आला. देशभक्तीचा संस्कार शालेय जीवनात होणे गरजेचे आहे. …

Read More »

बेळगावमध्ये पाणीटंचाई निवारण्यासाठी महापालिकेचा ‘मास्टर प्लॅन’

  बेळगाव : बेळगाव शहरात उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी महापालिका आयुक्त अशोक दुदगुंटी यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. शहरातील ५८ वॉर्डांपैकी १० वॉर्डांमध्ये सध्या २४ तास पाणीपुरवठा सुरू असून, उर्वरित भागात पाणीटंचाई भासू नये म्हणून प्रशासनाने पर्यायी व्यवस्था सज्ज ठेवली आहे. आज माध्यमांशी संवाद साधताना आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी …

Read More »

सिद्धरामय्या पुढे राहण्यास किंवा राजीनाम्यासही तयार

  के. एन. राजण्णा; सत्तेबाबतचा निर्णय हायकमांडवर बंगळूर : सिध्दरामय्या हे मुख्यमंत्रीपद कायम ठेवण्यास तसेच आवश्यक असल्यास राजीनामा देण्यासही तयार आहेत, अशी माहिती माजी मंत्री के. एन. राजण्णा यांनी दिली. पत्रकारांशी बोलताना राजण्णा म्हणाले की, पक्षातील नेतृत्वावरील गोंधळ हायकमांडने लवकरात लवकर सोडवला पाहिजे. हा गोंधळ जितका वाढेल तितके पक्षाचे नुकसान …

Read More »

सरकारी शाळांच्या बळकटीसाठी मुख्यमंत्र्यांची आठ ‘हमी’ घोषणा

  बंगळूर : राज्यातील सरकारी प्राथमिक, माध्यमिक शाळा आणि पदवी पूर्व महाविद्यालयांचा दर्जा उंचावण्यासाठी मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी आठ महत्त्वाच्या ‘हमी’ योजना जाहीर केल्या आहेत. शिक्षण क्षेत्रात सर्वांगीण सुधारणा घडवून आणण्याच्या उद्देशाने ही व्यापक योजना तयार करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत शाळांमधील शिक्षकांची कमतरता तातडीच्या भरतीद्वारे दूर करण्यात येणार आहे. प्रत्येक …

Read More »

छ. शिवाजी विद्यापीठाच्या वतीने उद्या सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा

  बेळगाव : छ. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरने सीमाभागातील ८६५ विद्यार्थ्यांसाठी २०२६-२७ नवीन शैक्षणिक वर्षात प्रवेशाची संधी आणि फी सवलत जाहीर केली आहे. फी सवलत: अनुदानित अभ्यासक्रमांसाठी पूर्ण ट्यूशन फी आणि विनाअनुदानित अभ्यासक्रमांसाठी २५% ट्यूशन फी माफ. जे विद्यार्थी वसतिगृहासाठी प्रवेश घेऊ इच्छितात त्यांच्याकरीता वसतिगृह फी सुद्धा माफ करण्यात आली आहे. …

Read More »

करामधील सूट मिळण्यासाठी निपाणी नगरपालिकेत कर भरण्यासाठी गर्दी

  निपाणी (वार्ता) : नवीन आर्थिक वर्षाला एक एप्रिल पासून सुरुवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर येथील नगरपालिकेध्ये मालमत्ता कर (घरफाळा) पाणी पट्टी ३० एप्रिल पर्यंत करा मध्ये ५ टक्के सूट देण्यात आली आहे. त्यामुळे कर भरण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. याशिवाय थकबाकी वसुलीची मोहीम राबवली जात आहे. मालमत्ता कर वेळेत …

Read More »

कंग्राळी (बी. के.) महालक्ष्मी यात्रोत्सवाला उत्साहात सुरुवात

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कंग्राळी बी. के. येथील ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रोत्सवाला आजपासून सुरुवात झाली असून ब्राह्ममुहूर्तावर देवीचा अक्षतारोपण सोहळा संपन्न झाला. देवीच्या दर्शनासाठी पहिल्याच दिवशी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. बेळगाव तालुक्यातील कंग्राळी बी. के. गावामध्ये आज पहाटेपासूनच उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. पहाटे ५ वाजून ४८ मिनिटांनी …

Read More »