Monday , September 21 2026
Breaking News

Belgaum Varta

बेळगावमध्ये घरात डांबून ठेवलेल्या महिला आणि मुलांची ‘अक्का पथका’कडून सुटका

  बेळगाव : पतीकडून घरात डांबून ठेवलेल्या आणि शारीरिक तसेच मानसिक छळाला सामोरे जाणाऱ्या एका महिलेची व तिच्या दोन मुलांची बेळगाव पोलिसांच्या ‘अक्का पथका’ने यशस्वी सुटका केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून पीडितेची सुरक्षित रवानगी केली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी या कारवाईची …

Read More »

प्रादेशिक आयुक्त कार्यालयातच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न

  बेळगाव : जमिनीचे बिगरशेतीमध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींमुळे एका व्यक्तीने बेळगावच्या प्रादेशिक आयुक्त कार्यालयात गुरुवारी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. हावेरी जिल्ह्यातील राणेबेन्नूर येथील रुद्रय्या अम्मिनबावीमठ (५०) असे या व्यक्तीचे नाव आहे. आपली दोन एकर जमिनीचे बिगरशेतीमध्ये रूपांतर करण्यासाठी त्यांनी …

Read More »

रस्त्याची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी खानापूर-जांबोटी मार्ग आजपासून बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

  बेळगाव : खानापूर-जांबोटी रस्त्याची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी गुरुवार, दि. ३० एप्रिल ते ५ मे पर्यंत असे सहा दिवस या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी बजावले आहेत. या काळात खानापूरहून येणारी वाहने पिरनवाडी, कुसळी, जांबोटी रोडवरून वळविण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे. …

Read More »

विजयदुर्ग खाडीतील जलतरण स्पर्धेत हर्षवर्धनला सुवर्ण तर स्मरण, गाथा, गनीष्का यांना रौप्य पदके

  बेळगाव : जिम स्विम अकॅडमी कोल्हापूर तसेच सिंधुदुर्ग क्रीडा व सांस्कृतिक मंडळ यांच्या वतीने तसेच महाराष्ट्र राज्य जलतरण संघटना यांच्या मान्यतेने संपन्न झालेल्या सिंधुदुर्ग खाडीतील जलतरण स्पर्धेत बेळगाव आबा व हिंद स्पोर्ट्स क्लबच्या जलतरणपटूनी घवघवीत यश संपादन केले. यामध्ये कुमार हर्षवर्धन कर्लेकर यांने एक किलोमीटर स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला …

Read More »

मराठा इन्फंट्रीतर्फे जूनमध्ये ‘अग्निवीर’ मेगा भरती मेळावा

  कर्नाटक, महाराष्ट्र, गोव्यासह इतर राज्यांतील उमेदवारांना संधी बेळगाव : मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर बेळगावमध्ये २७ जूनपासून अग्निवीर भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाजी स्टेडियमवर महाराष्ट्र, गोवा, मध्यप्रदेश, छत्तीसगड, गुजरात, कर्नाटक व आंध्र प्रदेशातील उमेदवारांची भरती होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी भरती प्रक्रियेला उपस्थित राहण्याचे आवाहन मराठा लाईट इन्फंट्रीतर्फे करण्यात …

Read More »

बंगळुरमध्ये मुसळधार पावसाचा कहर; कंपाऊंड भिंत कोसळून ८ जणांचा मृत्यू

  बंगळूर : दिवसेंदिवस वाढत असलेल्या उकाड्यानंतर दिलासा देणारा पाऊस उलट नागरिकांसाठी धोकादायक ठरला आहे. अवघ्या अर्ध्या तासाच्या मुसळधार पावसाने संपूर्ण शहर विस्कळीत झाले असून, जोरदार वाऱ्यासह पडलेल्या गारपिटीमुळे मोठे नुकसान झाले आहे. शिवाजीनगर येथील बौरींग रुग्णालयाजवळील कंपाऊंड भिंत कोसळून ८ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृतांमध्ये …

Read More »

कंग्राळी बुद्रुकमध्ये भंडाऱ्याच्या उधळणीत श्री महालक्ष्मी देवीचा रथोत्सव

  बेळगाव : सुमारे ४३ वर्षांनंतर बेळगाव तालुक्यातील कंग्राळी बुद्रुक गावामध्ये ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेला मंगळवारपासून प्रारंभ झाला. मंगळवारी अक्षतारोपण झाल्यानंतर आज बुधवारी सकाळी देवीच्या भव्य रथोत्सवास सुरुवात झाली. भंडाऱ्याची उधळण आणि श्री महालक्ष्मीच्या जयघोषात हजारो भक्तांनी देवीचा रथ ओढला. श्री गणेश आणि श्री कलमेश्वर मंदिरातून या रथोत्सवास सुरुवात झाली …

Read More »

विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेला प्राधान्य द्यावे; अरुण निकाडे

  कुर्ली हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या सन्मान निपाणी (वार्ता) : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधांचा आभाव असतो पण त्यावर मात करीत करिअर निवडतांना स्पर्धा परीक्षेला अधिक प्राधान्य द्यावे असे मत स्कूल बेटरमेंट कमिट अध्यक्ष अरुण निकाडे यांनी व्यक्त केले. रयत शिक्षण संस्थेच्या कुर्ली येथील सिद्धेश्वर विद्यालयात आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा कार्यक्रमात अध्यक्ष …

Read More »

तुकाराम बँकेच्या संचालक पदी विनोद आंबेवाडीकर यांची नेमणूक

  बेळगाव : येथील श्री तुकाराम को- ऑप. बँक लि. शहापूर बेळगांवमधील संचालक कै. अनंतराव रामचंद्र जांगळे यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या जागी महाराष्ट्र एकीकरण समितीचे निष्ठावंत व सामाजिक कार्यकर्ते श्री. विनोद शिवाजीराव आंबेवाडीकर यांची संचालक पदी नेमणूक करण्यात आली आहे. बँकेचे चेअरमन श्री. प्रकाश मरगाळे यांच्या अध्यक्षतेखाली दि. २७ …

Read More »

शिवाजी विद्यापीठाच्यावतीने सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी सवलतीत प्रवेशाची सुवर्णसंधी

  बेळगाव : आज बुधवार दिनांक २९ एप्रिल रोजी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी सवलतीत विविध अभ्यासक्रमासाठी प्रवेशाची माहिती देण्यासाठी विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी शिवाजी विद्यापीठातील प्रा.डॉ. सुभाष कोंबडे, डॉ.कविता वड्राळे, डॉ. हर्षवर्धन पंडित यांनी मार्गदर्शन केले. व्यासपीठावर मध्यवर्तीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे, …

Read More »