भाट गल्लीतील नागरिकांचा इशारा; नगरपालिकेने दुजाभाव केल्याचा आरोप निपाणी (वार्ता) : शासकीय नियमाप्रमाणे नगरपालिकेला सर्व प्रकारचे कर प्रामाणिकपणे नागरिक भरत आहेत. त्यानुसार नगरपालिकेनेही आपल्या कर्तव्याची पूर्तता करीत मुलभूत सुविधा देणे आवश्यक आहे. पण प्रशासनाने दुजाभाव करून अनेक वर्षांपासून रस्ते, गटारीसह इतर सुविधा दिलेल्या नाहीत. त्यामुळे आठवड्याभरात येथील रस्त्याचे काम …
Read More »मावळ्यांच्या कार्याचा अभ्यास करण्याची गरज
श्रीमंत संजयसिंह बेनाडीकर-सरकार; नवीन संभाजीनगरात राज्याभिषेक सोहळा निपाणी (वार्ता) : शिवकार्याचा अभ्यास करणाऱ्यांची संख्या वाढत असून, दुर्गभ्रमंतीच्या माध्यमातून शिवरायांच्या कार्याचा इतिहास जाणून घेण्यासाठी शिवप्रेमी पुढे येत आहेत, हे कौतुकास्पद आहे. स्वराज्य उभारणीत मोलाची भूमिका बजावलेल्या मावळ्यांच्या कार्याचा सखोल अभ्यास करण्याची खरी गरज आहे, मत श्रीमंत संजयसिंह बेनाडीकर सरकार यांनी …
Read More »बेळगाव जिल्हा नूतन पोलीस प्रमुख के. रामराजन यांचा रयत संघटनेतर्फे सत्कार
निपाणी (वार्ता) : बेळगांव येथील जिल्हा पोलीस प्रमुख भीमाशंकर गुळेद यांची बेंगलोर येथे बदली झाली आहे. त्यांच्या जागी नूतन जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून के. रामराजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानिमित्त दोन्ही पोलीस प्रमुखांचा कर्नाटक राज्य रयत संघटनेतर्फे कार्याध्यक्ष राजू पोवार व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी नूतन …
Read More »खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने हुतात्म्यांना अभिवादन!
खानापूर : 1956 भाषांवर प्रांतरचना करताना मराठी भाषिकांवर झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ 17 जानेवारी 1956 रोजी आंदोलन छेडण्यात आले होते, या मध्ये महाराष्ट्र मुंबईसह सीमाभागात अनेकांनी आपल्या जीवाची आहुती देऊन हौतात्म्य पत्करले होते, त्या पैकीच खानापूरचे हुतात्मा कै. नागाप्पा होसुरकर, खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने स्टेशन रोड हुतात्मा स्मारक …
Read More »हुतात्मा दिनाच्या पार्श्वभूमीवर खानापूर तालुका म. ए. समितीतर्फे कणकुंबी भागात जनजागृती
खानापूर : खानापूर तालुका म. ए. समितीतर्फे हुतात्मा दिनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (ता. १७) खानापूर तालुक्यातील जनतेने आपापले उद्योगधंदे बंद ठेवून कडकडीत हरताळ पाळावा तसेच सकाळी ८.३० वाजता स्टेशन रोड खानापूर येथे कै. नागाप्पा होसूरकर हुतात्मा स्मारकाला अभिवादन करण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यासाठी आज शुक्रवार दि. १६ रोजी …
Read More »चैनीसाठी आदमापूर येथून दुचाकी चोरणाऱ्या बेळगाव मधील दोघांना अटक
निपाणी (वार्ता) : कोल्हापूर आणि आदमापूर येथून दुचाकी चोरणाऱ्या बेळगाव येथील दोन चोरट्यांना निपाणी पोलिसांनी अटक केली. सोमनाथ पुंडलिक मेणसे (वय २१) व जोतिबा यल्लाप्पा धामणीकर (वय २३) रा. दोघेही अगसगा, ता, बेळगाव) अशी अटक केलेल्या संशयित चोरट्यांची नावे आहेत. ही कारवाई विशेष गस्त पथकाने केली. चोरट्याकडून १ लाख, …
Read More »ऊस उत्पादक शेतकऱ्यांची लूट थांबविण्यासाठी रयत संघटनेची कारखाना प्रशासनाला भेट
निपाणी (वार्ता) : शहर आणि परिसरातील साखर कारखान्यासाठी ऊसतोड करणाऱ्या मजुरांकडून प्रतिएकर उसामागे ८ ते १० हजार रुपये सक्तीने घेतले जात आहेत. ऊस तोडणी-ओढणीची रक्कम मिळत असतानाही शेतकऱ्यांकडूनही आर्थिक लूट केली जात आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची २० गुंठे ते ५ एकर शेती असलेल्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. ऊसतोड …
Read More »नंदगड येथे क्रांतिवीर संगोळी रायण्णा यांच्या भव्य पुतळ्याचे आणि संग्रहालयाचे सोमवारी उद्घाटन
माजी आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांच्या प्रयत्नांना यश खानापूर : नंदगड (ता. खानापूर) येथे उभारण्यात आलेल्या क्रांतिवीर संगोळी रायण्णा यांच्या भव्य पुतळ्याचे आणि आकर्षक संग्रहालयाचे उद्घाटन येत्या १९ जानेवारी रोजी राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यास मंत्रिमंडळातील सुमारे अनेक दिग्गज मंत्री उपस्थित राहणार आहेत. सिद्धरामय्या …
Read More »हलगा (खानापूर) ग्रामस्थांच्या वतीने हलशी येथे श्री महालक्ष्मी देवीला ओटी अर्पण; उद्या भव्य कार्यक्रम
हलगा : “हलगा माहेर… मेरडा आजोळ… आणि हलशी सासर” ही केवळ शब्दरचना नसून पिढ्यान्पिढ्या जपलेली श्रद्धा, परंपरा आणि भावनिक नाळ आहे. याच परंपरेनुसार शुक्रवार दि. 16 जानेवारी 2026 रोजी हलगा गाव पंचकमिटी व समस्त ग्रामस्थांच्या वतीने हलशी येथील श्री महालक्ष्मी देवीला ओटी (आहेर) अर्पण करण्याचा पवित्र कार्यक्रम आयोजित करण्यात …
Read More »भोंगा वाजणार, विद्यार्थी अभ्यासाला बसणार
अक्कोळ ग्रामपंचायतीचा उपक्रम : सायंकाळी दोन तास अभ्यास करणार विद्यार्थी निपाणी (वार्ता) : सध्याच्या डिजिटल व्यसनाधीनतेला आळा घालून विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला चालना देण्यासाठी निपाणी तालुक्यातील अक्कोळ गावाने एक आदर्शवत आणि प्रेरणादायी उपक्रम सुरू केला आहे. गावातील सर्व घरांमध्ये दररोज सायंकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत टीव्ही व मोबाईल वापर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta