कुद्रेमानी ( प्रतिनिधी) : कुद्रेमनी गावच्या ग्रामदैवत श्री मरगाई देवीच्या गोंधळ यात्रेचे औचित्य साधून लोहार कुटुंबीयांनी भक्तिभावाने सव्वा तोळ्याचे सोन्याचे गंठण देवीचरणी अर्पण केले. या धार्मिक व मंगलमय सोहळ्यामुळे यात्रेच्या उत्साहात आणखी भर पडली. स्वर्गीय अर्जुन सतबा लोहार यांचे सुपुत्र व कुशल कारागिर भरमाणा अर्जुन लोहार, संजय अर्जुन लोहार …
Read More »मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर धरणे आंदोलन; विरोधी पक्षांसह सत्ताधाऱ्यांनाही पाठिंब्याचे पत्र
बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाच्या लढ्याला पुन्हा एकदा वेग देण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने आक्रमक भूमिका घेतली आहे. उच्चाधिकार समितीची बैठक तातडीने बोलावण्यात यावी, या मागणीसाठी मुंबईतील मुख्यमंत्री निवासस्थानासमोर धरणे आंदोलन छेडण्याचा निर्धार समितीने व्यक्त केला असून, या आंदोलनाला पाठिंबा मिळावा यासाठी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांना पत्र पाठविण्यात आले आहे. …
Read More »महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगावच्या वतीने येत्या रविवारी दहावीच्या गुणवंतांचा सत्कार
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने यावर्षीच्या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावीमध्ये मराठी माध्यमात बेळगाव शहर,बेळगाव ग्रामीण आणि खानापूर तालुक्यातून प्रत्येकी पहिला, दुसरा आणि तिसरा क्रमांक घेतलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार रविवार दिनांक १४ जून २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता संत तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन, ओरिएंटल शाळेजवळ खानापूर रोड, बेळगाव येथे संपन्न …
Read More »न्यू गुड्सशेड रस्त्याच्या कायमस्वरूपी दुरुस्तीची मागणी
बेळगाव : बसवेश्वर रेल्वे उड्डाणपुलाजवळील डेक्कन हॉस्पिटलसमोरील न्यू गुड्सशेड रस्त्याची तातडीने कायमस्वरूपी दुरुस्ती करावी तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूंना योग्य जलनिस्सारण गटारे बांधावीत, अशी मागणी नागरिकांनी महानगरपालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, एल अँड टी कंपनीने केलेल्या कामानंतर गेल्या अनेक वर्षांपासून हा रस्ता अत्यंत खराब अवस्थेत असून …
Read More »पती-प्रियकराकडून महिलेचे खासगी फोटो व्हायरल; दोघांविरुद्ध गुन्हा
बेळगाव : सदाशिवनगर येथील एका विवाहित महिलेचे खासगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी तिच्या पती व प्रियकराविरुद्ध सायबर क्राईम विभागात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोघांविरुद्ध एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ३७ वर्षीय विवाहित महिलेचे शिमोगा जिल्ह्यातील तिच्याच नात्यातील एका युवकासोबत गेल्या सहा …
Read More »मराठी विद्यानिकेतनमध्ये साने गुरुजी पुण्यतिथी साजरी
बेळगाव : मराठी विद्यानिकेतनमध्ये 11 जून रोजी साने गुरुजी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून शाळेतील शिक्षिका मुक्ता आलगोंडी उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते साने गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. इयत्ता चौथी ‘अ’मधील विद्यार्थ्यांनी वर्गशिक्षिका मनिषा सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली साने गुरुजींच्या जीवनाबद्दल भित्तीपत्रके तयार केली. यामध्ये साने गुरुजींच्या …
Read More »अनैतिक संबंध आणि २ कोटींच्या पॉलिसीसाठी माजी सैनिकाचा खून?
सलाईनमधून विष देऊन हत्या केल्याचा संशय; पत्नी व प्रियकरावर संशयाची सुई बेळगाव : अनैतिक संबंध आणि दोन कोटी रुपयांच्या विमा पॉलिसीच्या रकमेच्या हव्यासातून एका माजी सैनिकाचा सलाईनमधून विष देऊन खून केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. हुक्केरी तालुक्यातील घोडगेरी येथील संदीप मंजरगी (वय ४६) यांच्या संशयास्पद मृत्यूच्या तपासात हा …
Read More »अतिवृष्टीच्या संकटावर मात करण्यासाठी महापालिकेची युद्धपातळीवरील तयारी; तीन जलद प्रतिसाद पथके सज्ज
बेळगाव : पावसाळा म्हटला की रस्त्यांवर साचणारे पाणी, कोसळणारी झाडे, ठप्प होणारी वाहतूक आणि नागरिकांचे हाल हे चित्र आता नवे राहिलेले नाही. मात्र यंदा संभाव्य आपत्तींचा धोका ओळखून महापालिकेने पावसाळी संकटांना तोंड देण्यासाठी युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे. नागरिकांना तातडीने मदत मिळावी आणि आपत्कालीन परिस्थितीवर वेगाने नियंत्रण मिळवता यावे …
Read More »दुर्मिळ आध्यात्मिक योगावरील श्रीदत्तयागाची जय्यत तयारी भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण
निपाणी (वार्ता) : आडी येथील संजीवनगिरीवरील श्री दत्त देवस्थान मठाच्या वतीने अधिक मास, कर्क राशीतील वर्गोत्तम उच्चस्थ गुरू आणि पंचरात्रिपर्व यांच्या दुर्मिळ संयोगावर आयोजित करण्यात आलेल्या श्रीदत्तयाग महोत्सवाची सर्व तयारी करणे चालू असून, परिसरात उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. रविवार (ता. १४) आणि सोमवार (ता.१५) रोजी संजीवनगिरीच्या …
Read More »‘ऑपरेशन गृहलक्ष्मी’ची मोठी कारवाई; 4.30 लाख अपात्र लाभार्थी योजनेतून बाद
बेळगाव : राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी गृहलक्ष्मी योजनेतील अपात्र लाभार्थ्यांविरोधात सुरू करण्यात आलेल्या ‘ऑपरेशन गृहलक्ष्मी’ मोहिमेत मोठी कारवाई करण्यात आली आहे. तपासणीनंतर राज्यातील तब्बल 4.30 लाख लाभार्थी अपात्र आढळून आले असून त्यांची नावे योजनेतून वगळण्यात आली आहेत. महागाईच्या वाढत्या झळा लक्षात घेऊन राज्य सरकारने कुटुंबप्रमुख महिलांना दरमहा दोन हजार रुपयांची …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta