Sunday , September 20 2026
Breaking News

निपाणी

मतदारसंघाच्या विकासासाठी प्रयत्नशील; आमदार शशिकला जोल्ले

    अमृत नगरोत्थान योजनेतील लाभार्थ्यांना साहित्य वितरण निपाणी (वार्ता) : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे माझे आदर्श आहेत. त्यांनी लिहिलेल्या घटनेमुळेच सर्वसामान्य वर्गाला अधिकार, हक्क मिळाले आहेत. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न करीत आहे. ततालुक्याचा विकास करीत असताना जात, पंथ, पक्ष पाहिले …

Read More »

प्लॅस्टिक, ताडपत्रीची निपाणी खरेदी-विक्री

  पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मागणी वाढली : शेतकऱ्यांचीही लगबग सुरू निपाणी (वार्ता) : यंदाच्या हंगामातील पावसाला प्रारंभ झाला आहे.त्या पार्श्वभूमीवर निपाणी बाजारात प्लॅस्टिक कागद आणि ताडपत्रांची दुकाने सजली आहेत. पाऊस सुरू झाल्याने परिसरातील शेतकऱ्यासह मेंढपाळ बांधवाकडून ताडपत्री, प्लॅस्टिक कापड खरेदीसाठी येथील बाजारपेठेमधील दुकानांमध्ये गर्दी होत आहे. महागाई आणि पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे …

Read More »

लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या घटनेचा निषेध; निपाणीत केंद्र सरकार विरोधात काँग्रेस आक्रमक

  निपाणी (वार्ता) : दिल्लीतील जंतर-मंतर येथे नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीचार्ज व अश्रुधुराचा वापर केल्याच्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी निपाणी व बेडकीहाळ ब्लॉक काँग्रेस ब्लॉक काँग्रेसतर्फे धर्मवीर संभाजी चौकात मानवी साखळीसह आंदोलन करून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. आंदोलना दरम्यान जब-जब …

Read More »

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज तरूण मंडळातर्फे नागरी सत्कार

    निपाणी (वार्ता) : निपाणी येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज तरूण मंडळातर्फे न्यु संभाजी नगर मधील सुपुत्र आदित्य अरूण बुरूड याने भारतीय सैन्य दलामधील प्रशिक्षण पुर्ण करून देशसेवेच्या पवित्र कार्यासाठी स्वताला समर्पित केले आहे. या यशाबद्दल त्याचा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज तरूण मंडळातर्फ नागरी सत्कार करूण भावी वाटचालीस शुभेच्छा …

Read More »

निपाणीतील पर्यावरण प्रेमी शिक्षक दाम्पत्य बेळगाव येथील पुरस्काराने सन्मानित

  निपाणी (वार्ता) : बेळगाव येथील महांतेश नगरमधील महंत भवनात रत्नाबाई व कल्याणप्पा उदगट्टी सोशल फाउंडेशन, सरोजनी व आणि महालिंगप्पा नांदगाव फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सन्मान सोहळा पार पडला यावेळी,सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण, शेती, उद्योग-व्यवसाय, कला, क्रीडा व विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ८५ मान्यवरांचागौरव करण्यात आला. त्यामध्ये येथील पर्यावरण …

Read More »

महात्मा बसवेश्वर सौहार्द संस्थेतर्फे जिल्हा बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले यांचा सत्कार

  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील चिक्कोडी रोडवरील श्री महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द संस्थेतर्फे बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष व माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांची नॅशनल को-ऑपरेटिव्ह युनियन ऑफ इंडिया नवी दिल्लीच्या संचालक मंडळावर निवड झाल्याबद्दल महात्मा बसवेश्वर क्रेडिट संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. प्रारंभी संस्थेचे संस्थापक सहकाररत्न डॉ. सी. …

Read More »

निपाणीत गुरुवारी धर्मवीर संभाजीराजे चौकात मानवी साखळी

  निपाणी (वार्ता) : दिल्ली येथील पोलीसांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करून आश्रुधुर सोडून मारहाण केली आहे. त्याच्या निषेधार्थ विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी सुरू असलेल्या शांततापूर्ण केलेल्या आंदोलनाला हुकूमशाही सरकार घाबरली आहे. पोलीस बळाचा गैरवापर करून विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना अटक केली. हे …

Read More »

निपाणीतील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांना निवेदन

  निपाणी (वार्ता) : निपाणी शहर आणि ग्रामीण भागातील महाविद्यालयीन विद्यार्थी कोल्हापुर येथे उच्चशिक्षण घेत आहेत. परंतु महाराष्ट्रातील शैक्षणिक वर्ष कर्नाटकातील शैक्षणिक वर्षापेक्षा दोन महिने लवकर सुरू होत असल्याने निपाणी आगार प्रमुखांनी येथील विद्यार्थ्यांना कर्नाटक शासनाच्या शैक्षणिक वर्षापासून बस पास देत असल्यामुळे कोल्हापूरमध्ये शिक्षण घेत असलेल्या असंख्य विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान …

Read More »

आप्पाचीवाडी येथील पुलाच्या कामाला प्रारंभ न केल्यास कर्नाटक राज्य रयत संघटनेतर्फे रस्त्यावरची लढाई

  निपाणी (वार्ता) : आप्पाचीवाडी येथील श्री हालसिध्दनाथ देवालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पुलाची निर्मिती करावी, तालुका पंचायत कार्यालयातील शेतकऱ्यांची प्रलंबित कामे मार्गी लावावीत यासह विविध मागण्यांसाठी कर्नाटक राज्य रयत संघटनेतर्फे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर ही कामे त्वरित करण्याचे आश्वासन पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांसह इतर अधिकाऱ्यांनी दिला होता. मात्र त्याकडे दुर्लक्ष …

Read More »

बोरगाव अरिहंत को-ऑप. बँकेच्या बेनाडी शाखेचा दहावा वर्धापन दिन

  निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील श्री अरिहंतको-ऑप. क्रेडिट सो.लि., बोरगाव (मल्टिस्टेट) संस्थेच्या येथील शाखेचा दहावा वर्धापन दिन पार ‌पडला. त्यानिमित्त श्री महासरस्वती व महालक्ष्मी पूजनाचा कार्यक्रम झाला. अरिहंत बँकेचे अध्यक्ष अभिनंदन उर्फ बच्चू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहकाररत्न उत्तमपाटील. यांच्या प्रमुख उपस्थित पूजन करण्यात आले. संचालक मंडळ व मान्यवरांच्या हस्ते …

Read More »