Sunday , September 20 2026
Breaking News

निपाणी

दूषित पाणीपुरवठ्यासह कचऱ्यामुळे शिरगुपीमधील ग्रामस्थांची गैरसोय

  निपाणी (वार्ता) : शिरगुप्पी येथे गढूळ पाणी पुरवठा होत असल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. याशिवाय विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत ने ग्रामस्थांना नागरी सुविधा देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. गावातील विहीर संरक्षक कट्ट्याविना असल्याने गटारीचे पाणी त्यामध्ये जाऊन विहिरीतील पाणी दूषित झाले आहे. या ठिकाणी वास्तव्यास …

Read More »

अक्कोळ पार्श्वमती विद्यालयात आरोग्य जनजागृतीपर मार्गदर्शन कार्यक्रम

  निपाणी (वार्ता) : बाहुबली विद्यापीठ, बाहुबली संचलित अक्कोळ येथील पार्श्वमती विद्यालयात चिकोडी येथील शासकीय रुग्णालयातर्फे डॉ. मंगल शास्त्री यांचा विद्यार्थ्यांसाठी आरोग्य जनजागृती व मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व आरोग्य पथकाने विद्यार्थ्यांना आरोग्याची काळजी, वैयक्तिक स्वच्छता, संसर्गजन्य रोगांपासून बचाव, संतुलित आहार, नियमित व्यायाम, निरोगी जीवनशैली, किशोरवयीन आरोग्य …

Read More »

नादुरुस्त, गळक्या खराब बसमुळे विद्यार्थी, महिला, वृद्ध प्रवाशांची फरपट

  निपाणी (वार्ता) : हुबळी विभागात निपाणी बस आगार उत्पन्नाच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर आहे. पण नादुरुस्त बसमुळे प्रवासी व विद्यार्थी हैराण झाले असून कोणती बस रस्त्यात कुठे बंद पडते हे समजणे कठीण झाले आहे. याशिवाय बसमध्ये गळती लागत असल्याने प्रवाशांना प्रवास भिजतच प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे वृद्ध व विद्यार्थ्यांची …

Read More »

निपाणीतील तनवीर देसाई याचा विश्वविक्रम; ‘उमलिंगला’ शिखर केले सर

  निपाणी (प्रतिनिधी) : निपाणीतील एका साहसीवीराने जागतिक विक्रम करीत आपले नाव जागतिक स्तरावर नोंदविले आहे. येथील सुपुत्र तनवीर शब्बीर देसाई याने लद्दाख लेह येथील सर्वात उंच शिखर सर केले आहे. येथील अकोळ रोड हुडको कॉलनी येथील शब्बीर देसाई यांचे चिरंजीव तनवीर याने काश्मीर लेह लद्दाख येथील सर्वात उंच ‘उमलिंग …

Read More »

वांगी पिकातून भरघोस उत्पादन

  बेनाडी येथील सतीश पाटील यांचा उपक्रम ; आतापर्यंत ४ टन वांग्याची तोडणी निपाणी (वार्ता) : दिवसेंदिवस शेतीमध्ये अमुलाग्र बदल होत आहेत. नव्या बदलांची खास धरून बेनाडी येथील प्रगतशील युवा शेतकरी सतीश पाटील यांनी हवामानावर आधारित वांग्याचे पीक घेतले आहे. या पिकाचे उत्पादन चांगले होत असून आतापर्यंत त्यांनी ४ टन …

Read More »

चांद शिरदवाड येथील शयनाज कनवडे यांचा पदोन्नतीनिमित्त उत्तम पाटील यांच्या हस्ते सत्कार

  निपाणी (वार्ता) : चाँद-शिरदवाड येथील माजी ग्रामपंचायत सदस्य दिवंगत बाबालाल कनवाडे यांच्या स्नुषा शहनाज आलम कनवाड यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावरून पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती झाले आहे. त्यानिमित्त सहकाररत्न उत्तम पाटील यांच्या हस्ते त्यांच्या उल्लेखनीय कर्तृत्वाचा गौरव करण्यात आला. याशिवाय पुढील सेवाकार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. उत्तम आण्णा पाटील म्हणाले, …

Read More »

बंगळूर येथील आयआयआयटी निवड झाल्याबद्दल साईराज पाटील यांचा सत्कार

  निपाणी (वार्ता) : स्तवनिधी येथील ए. एस. पाटील हायस्कूलचे शिक्षक जे. एस. पाटील यांचे चिरंजीव साईराज पाटील यांची बंगलोर येथे आय. आय. आय. टी. पदी निवड झाल्याबद्दल दोन्ही शाळे तर्फे मुख्याध्यापक एस. एस. तेरदाळ व मुख्याध्यापक बी. बी. दादण्णावर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी साईराज यांनी विद्यार्थ्यांशी …

Read More »

महात्मा बसवेश्वर संस्थेच्या कुर्ली शाखेत गुणवंतांचा सत्कार समारंभ

  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील महात्मा बसवेश्वर संस्थेच्या कुर्ली शाखेत गुणवंतांचा सत्कार समारंभ पार पडला. अध्यक्षस्थानी महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेच्या कुर्ली शाखा अध्यक्ष रवींद्र चौगुले होते. शैक्षणिक व राष्ट्रीय सेवा क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंतांचा संस्थेच्यावतीने सत्कार करण्यात आला. शिवाजी विद्यापीठातून भौतिकशास्त्र विषयात पीएचडी पदवी प्राप्त …

Read More »

चिखली येथील कुमार विद्यामंदिर आपुलकी सेवाभावी संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

    निपाणी (वार्ता) : शिक्षण हीच समाजपरिवर्तनाची खरी ताकद असून गरजू, होतकरू व गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक ते बळ मिळावे या उद्देशाने कागल येथील तुषार भास्कर संस्थापित आपुलकी सेवाभावी संस्थेतर्फे चिखली येथील कुमार विद्यामंदिर मधील २० विद्यार्थ्यांना शालेय दप्तर, वह्या व विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. संस्थापक तुषार …

Read More »

बोरगावच्या ‘अरिहंत’च्या डिजिटल बँकिंगमुळे महत्त्वाचे पाऊल

  अध्यक्ष अभिनंदन पाटील : संस्थेच्या क्युआर कोडचे अनावरण निपाणी (वार्ता) : सध्याच्या युगात आधुनिक तंत्रज्ञान ही काळाची गरज बनली आहे. संस्थेसाठी महत्त्वाच्या असलेल्या क्युआर कोड व मोबाईल बँकिंग अॅपचे अनावरण करून आपण डिजिटल बँकिंगच्या नव्या युगात एक महत्त्वाचे पाऊल टाकत आहोत. या सुविधेमुळे सभासद आणि ग्राहकांना घरबसल्या सुरक्षित, जलद …

Read More »