Sunday , September 20 2026
Breaking News

निपाणी

बेनाडी ते पंढरपूर दिंडीचे प्रस्थान यंदा वारकऱ्यांचा २०० भाविकांचा सहभाग

  निपाणी (वार्ता) : बेनाडी येथील पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्याची बेनाडी ते पंढरपूर पायी दिंडी रवाना झाली. येथील हनुमान मंदिरामध्ये सकाळी श्रींच्या पादुकांना शरद जोशी यांच्या हस्ते अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर भजन सेवा झाली. विधीपूर्वक विना पूजन, श्रींची पालखी पूजन झाल्यानंतर अभंग, भक्तीगीत, भावगीत, गवळण सादर करीत या दिंडीचे …

Read More »

नाईंग्लजमध्ये सिद्धेश्वर पतसंस्थेच्या तिसऱ्या शाखेचे उद्घाटन

  पहिल्याच दिवशी ७० लाखांच्या ठेवी; ग्रामीण सहकार विस्ताराला नवी गती निपाणी (वार्ता) : ग्रामीण भागातील शेतकरी, लघुउद्योग व्यावसायिक आणि नोकरदार वर्गाला विश्वासार्ह आर्थिक सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या जनवाड येथील श्री सिद्धेश्वर को-ऑप. सोसायटी नाईंग्लज येथील तिसऱ्या शाखेचा प्रारंभ शिवप्रसाद देवरु स्वामीजी (अल्लमप्रभू सिद्धसंस्थान मठ, चिंचली) यांच्या …

Read More »

निपाणी रोटरी क्लबचा शनिवारी पदग्रहण सोहळा

  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा शनिवारी (ता.१८) सकाळी ११ वाजता होणार आहे. २०२६-२७ साठीच्या संचालक मंडळ आणि पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. अध्यक्षपदी चेतन लगारे, सचिवपदी राजेंद्र सदलगे आणि खजिनदारपदी चिंतामणी वाळवे यांची निवड करण्यात येणार आहे. याशिवाय इतर पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. प्रमुख …

Read More »

हरीनगरातील मराठी शाळेला प्रोजेक्टर लॅपटॉपसह गणवेशाची देणगी

  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील हरी नगरातील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेला शिला राहुल वालीशेट्टी यांनी देणगी स्वरूपात प्रोजकटर स्क्रीन व लॅपटॉप देऊन उपकृत केले. जर्मनीत वास्तव्य असलेल्या या दांपत्याने विद्यार्थ्यांना शनिवारचा पी. टी. रंगाचा गणवेश देऊन मुलांना प्रोत्साहित केले. त्यामुळे या दांपत्याचे कौतुक होत आहे. शिला वालीशेट्टी यांनी, …

Read More »

डॉ. एन. डी. पाटील यांचे शैक्षणिक कार्य प्रेरणादायी

  एस. एस. चौगुले; कुर्ली हायस्कूलमध्ये डॉ. एन. डी. पाटील यांना अभिवादन निपाणी (वार्ता) : कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या “स्वावलंबी शिक्षण” या विचारधारेचा वारसा पुढे नेत डॉ. एन. डी. पाटील यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी सातत्याने प्रयत्न केले. रयत शिक्षण संस्थेच्या विविध शैक्षणिक उपक्रमांना त्यांनी दिशा देत …

Read More »

पंधरा वर्षांपासून पंढरीच्या वाटेवर अन्नदानाची सेवा

  निपाणीतील पठाडे कुटुंबीयांकडून वारकऱ्यांसह भाविकांना महाप्रसादाची व्यवस्था निपाणी (वार्ता) : आषाढी वारीसाठी खडकेवाडा ते पंढरपुर ही दिंडी दरवर्षी जात आहे. या वारीचे येथील प्रगतीनगर येथे मंगळवारी (ता.१४) सायंकाळी आगमन झाले. या भागातील उद्योजक शिवाजी आण्णासाहेब पठाडे यांच्या घरी खडकेवाडा पायी दिंडीचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर नगरप्रदक्षिणा होऊन रात्री सर्व …

Read More »

रस्त्यांच्या माध्यमातून मतदारसंघाचा विकास

  खासदार प्रियांका जारकिहोळी; निपाणीत रस्ता कामाचा प्रारंभ निपाणी (वार्ता) : निपाणी मतदार संघाचा रस्त्याच्या माध्यमातून विकास साधला जाईल. आवश्यक त्या गावातील प्रमुख मार्गावरील प्रमुख आणि संपर्क रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. सर्वच रस्ते दर्जेदार करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे मत खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी व्यक्त केले.जत्राट वेस येथील …

Read More »

मतदार संघातील समस्यासाठी काँग्रेस जनसंपर्क कार्यालय

  खासदार प्रियांका जारकीहोळी; मतदार संघ काँग्रेस संपर्क कार्यालयाचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : निपाणी मतदार संघातील नागरिकांसाठी येथे काँग्रेसचे जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात आले आहे. मतदारांनी आपल्या कोणत्याही प्रकारच्या अडीअडचणीसाठी कार्यालयाशी संपर्क साधावा. या ठिकाणी संगणक आणि ऑपरेटरची व्यवस्था करण्यात आली आहे. एस आय आर नोंदणी करून आपला मतदानाचा अधिकार …

Read More »

जवाहरलाल नेहरू तलावातील गाळ काढण्यासंदर्भात विविध प्रस्तावांसह नगरपालिकेला निवेदन

  निपाणी (वार्ता) : निपाणी शहराची जीवनदायिनी असलेल्या जवाहरलाल नेहरू तलावातील साचलेला गाळ अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तातडीने काढून जलाशयाची पाणी साठवण क्षमता वाढवावी, अशी मागणी माजी सभापती प्रा. राजन चिकोडे यांनी नगरपालिका आयुक्त गणपती पाटील यांच्याकडे दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनातील माहिती अशी, येथील जवाहरलाल नेहरू तलावात अनेक वर्षांपासून गाळ …

Read More »

पावसाने डोळे वठारल्याने स्प्रिंकलरद्वारे पिकांना पाणी; वाढत्या उन्हामुळे सोयाबीन धोक्यात

  निपाणी (वार्ता) : निपाणी तालुक्यात यंदा समाधानकारक पाऊस न झाल्याने सोयाबीनसह भाजीपाला आणि पिके धोक्यात आली आहेत. पावसाच्या भरवशावर असलेल्या शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने सोयाबीनची लागवड केली. मात्र त्यानंतर दमदार पाऊस न झाल्याने पिकाची वाढ खुंटत आहे. पावसाअभावी जमिनीतील ओलावा कमी झाल्याने पिके वाचवण्यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी स्प्रिंकलरचा आधार घेतला आहे. …

Read More »