Monday , June 1 2026
Breaking News

Belgaum Varta

अगरबत्ती व्यवसाय फसवणूक प्रकरणातील आरोपीला अटक

  बेळगाव : अगरबत्ती व्यवसाय सुरू करून चांगला नफा मिळेल, अशा आमिषाने अनेक महिलांची फसवणूक करणाऱ्या बाबासाहेब लक्ष्मण कोळेकर या मुख्य आरोपीला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. काही महिन्यांपूर्वी या प्रकरणात कोळेकर याने महिलांकडून लाखो रुपयांची गुंतवणूक करून घेतली होती. त्यानंतर ना व्यवसाय सुरू ठेवला, ना पैसे परत दिले, अशा …

Read More »

इटगीतील ४० विद्यार्थ्यांच्या दाखल्याचा प्रश्न डॉ. अंजली निंबाळकर यांच्या पुढाकाराने सुटला!

  खानापूर : खानापूर तालुक्यातील इटगी येथील 40 विद्यार्थ्यांचा शाळा सोडल्याच्या दाखल्या संदर्भातील प्रलंबित प्रश्न अखेर खानापूर तालुक्याच्या माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्या पुढाकाराने सुटला असून या 40 विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेण्यासाठीचा मार्ग सुखकर झाला आहे. या प्रकरणी खानापूर ब्लॉक काँग्रेस तसेच माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी अन्यायग्रस्त …

Read More »

नगरपालिका कार्यालयावरील नवीन भगवा ध्वज फडकवण्याच्या माहितीबाबत नवनाथ चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल

  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील नगरपालिका कार्यालयावर अनेक वर्षापासून भगवा ध्वज फडकला आहे. सध्या हा ध्वज जीर्ण झाल्याने त्या ठिकाणी मराठी भाषिकातर्फे नवीन ध्वज फडकवण्यात येणार होता. त्याबाबत पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्याने नवनाथ चव्हाण यांच्यावर शहरातील नागरिकांच्या भावना भडकविण्याची शक्यता असल्याने त्यांच्यावर येथील पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आला आहे. …

Read More »

ऊस दरासाठी रस्त्यावरची लढाई लढणार

  राजू पोवार ; ऊस दर आंदोलनाला वकील संघटनेचा पाठिंबा निपाणी (वार्ता) : शेतकरी हा देशाचा अन्नदाता आहे. पण त्यांनी उत्पादन केलेल्या पिकांना योग्य दर दिला जात नाही. त्याचा सर्वच फायदा साखर कारखानदार आणि सरकारला होत आहे. त्यामुळे शेतकरी वर्षानुवर्षी कर्जबाजारी होऊन आत्महत्या कडे वळत आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामातील उसाला …

Read More »

‘कॅपिटल वन’च्या एसएसएलसी व्याख्यानमालेचे १६ रोजी प्रारंभ

  बेळगाव : येथील कॅपिटल वन संस्थेच्यावतीने शैक्षणिक उपक्रमांतर्गत बेळगाव परिसरातील विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या समृद्ध करण्यासाठी तसेच दहावी परीक्षेच्या तयारीसाठी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असून, तज्ज्ञ शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या शाळेमधून केलेल्या नावनोंदणीप्रमाणे व्याख्यानमालेमध्ये सहभागी होता येणार आहे. आजवरच्या परीक्षेमध्ये अवल गुण संख्येने पास होणारे विद्यार्थी व काठावर …

Read More »

आराध्या सावंत हिची राज्य कराटे स्पर्धेसाठी निवड

  बेळगाव : कॅम्पमधील सेंट झेवियर्स शाळेची विद्यार्थिनी आराध्या निवास सावंत हिची राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी जिल्हा संघात निवड झाली आहे. सार्वजनिक शिक्षण खात्याच्या वतीने नुकत्याच घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत 38 किलो वजनी गटात आराध्या सावंत हिने सुवर्णपदक पटकाविले होते आता तिची 5 नोव्हेंबरपासून दावणगिरी येथे होणाऱ्या सार्वजनिक शिक्षण खात्याच्या …

Read More »

शेतकऱ्यांच्या अश्रूंवर राजकारण करू नका : विजयेंद्र यांचे सरकारवर ताशेरे

  बेळगाव : “शेतकऱ्यांच्या समस्या वेदनादायी आहेत. त्यांच्या अश्रूंवर राजकारण करू नका. पक्षीय मतभेद विसरून सर्वांनी शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी त्यांच्या समर्थनात उभे राहणे, गरजेचे आहे,” असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र म्हणाले. विजयेंद्र यांनी राज्य सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणावर सरकारवर सडाडून टीका केली. ‘सरकारने शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांना त्वरित प्रतिसाद द्यावा आणि …

Read More »

महामानवाने दिलेले अधिकार धोक्यात संघर्ष : नायक दीपक केदार

  निपाणी ऑल इंडिया दलित पँथरची बैठक निपाणी (वार्ता) : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले अधिकार धोक्यात आले आहेत. महामानवाची क्रांती नष्ट करण्याची भूमिका अलीकडच्या काळामध्ये सुरू आहे. देशावरील आलेले संकट दूर करण्याची क्षमता ही फक्त्त आंबेडकरवादी समूहामध्ये आहे. पँथर सेना ही केवळ दिखाऊणा नसून तो एक विचार असल्याचे …

Read More »

बेळगाव तालुक्यातील सावगाव, बाची सह खानापुरातील पाच मराठी गावांवर कानडीकरणाचा वरवंटा!

  बेळगाव : कारवारप्रमाणेच बेळगाव जिल्ह्याचे देखील संपूर्ण कानडीकरण करण्याचा कुटील डाव कर्नाटक प्रशासनाने घातला असून सरकारने बेळगाव ग्रामीण व खानापूर तालुक्यातील शंभर टक्के मराठी भाषिक गावांमध्ये मराठी शाळांच्या इमारतीत कन्नड शाळा सुरू करण्याचे आदेश शिक्षण खात्याने दिले असून आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. मराठी गावांमध्ये कन्नड शाळा सुरू करून …

Read More »

पंडित नेहरू हायस्कूलच्या विद्यार्थ्याची राज्यस्तरीय गोळाफेक स्पर्धेसाठी निवड

  बेळगाव : श्री सार्वजनिक शिक्षण खात्यामार्फत आयोजित आज झालेल्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत पंडित नेहरू हायस्कूलचा इयत्ता आठविचा विद्यार्थी कु. राजू दोडमनी याने 14 वर्षाखालील गोळाफेक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला आहे. तसेच या विद्यार्थ्याने कुस्तीमध्ये सुद्धा प्रथम क्रमांक मिळविलेला आहे तर या विद्यार्थ्याची कुस्ती व गोळाफेकमध्ये राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली …

Read More »