Monday , May 25 2026
Breaking News

निपाणी

लेटेक्स कॉलनीत मूलभूत सुविधा न दिल्यास नगरपालिके समोर नागरिकांचा उपोषणाचा इशारा

  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील शहरा बाहेर असलेल्या लेटेक्स कॉलनीमध्ये बऱ्याच वर्षापासून अनेक सुशिक्षित कुटुंबे वास्तव्यास आहेत. त्यांच्याकडून दरवर्षी नगरपालिकेचे सर्व कर वेळेत भरले जातात. तरीही तेथील नागरिकांना रस्ते, गटारी, पथदीप व पाण्याची सोय करण्यात आलेली नाही. त्यामुळे अनेक कुटुंबांची गैरसोय होत आहे. नगरपालिका प्रशासनाने तात्काळ मूलभूत सुविधा उपलब्ध …

Read More »

बोरगाव येथील धनगरी ढोलवादन स्पर्धेत निडगुंदी येथील ‘बेंकी बबलादी’ मंडळ सर्वोत्तम

  निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील वाशीखान वालुग मंडळातर्फे वाशिखान मंदिरात सहकाररत्न उत्तम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त धनगरी ढोल स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामध्ये कर्नाटक, महाराष्ट्रातील मंडळांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत निडगुंदी येथील बेंकी बबलादी वालु मंडळांने प्रथम क्रमांक पटकावून २१ हजार रुपयांचे रोख बक्षीस आणि शिल्ड पटकाविले. स्पर्धेचे उद्घाटन पृथ्वीराज …

Read More »

निपाणी परिसरात होळीचा सण भक्तीभावाने

  आता सर्वांनाच रंगपंचमी सणाची आतुरता निपाणी (वार्ता) : शहर, उपनगर आणि ग्रामीण भागात सोमवारी (ता.२) सायंकाळी भक्तिमय वातावरणात होलिका दहनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी अनेक ठिकाणी पोळी-दानाचा उपक्रम राबविण्यात आला. त्याला भाविकांकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. तर काही ठिकाणी युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शेणी ऐवजी परिसरातील कचरा संकलित करून त्याची होळी …

Read More »

निपाणी बस स्थानकात अस्वच्छ स्वच्छतागृह; तरीही दुप्पट रक्कम आकारून प्रवाशांची लूट

  निपाणी (वार्ता) : महिलांना मोफत बस सुविधा पुरविणाऱ्या वायव्य कर्नाटक परिवहन मंडळाकडून स्वच्छतागृह वापरासाठी मात्र दहा रुपये सक्तीने आकारले जात असल्याचा प्रकार निपाणी बस स्थानकात समोर आला आहे. त्याची चौकशी करून प्रवाशांना मोफत सुविधा देण्याची मागणीही येथील मानवाधिकार संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांसह आगार प्रमुखांकडे निवेदनाद्वारे केली आहे. याशिवाय गॅरंटी योजना कमिटी …

Read More »

मानवी हस्तक्षेपामुळे प्राणी, वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर; सृष्टी पर्यावरणवादी संघटनेचे संस्थापक फिरोज चाऊस

जागतिक वन्य दिन विशेष जनजागृतीसह शिकार थांबवणे गरजेचे निपाणी (वार्ता) : जैवविविधतेच्या संवर्धनासाठी दरवर्षी ३ मार्चला जागतिक वन्यजीव दिन साजरा केला जातो. याचा उद्देश नष्ट होणाऱ्या प्रजातींविषयी जागरूकता निर्माण करणे आणि त्यांचे संरक्षण करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवणे हा आहे. परंतु वाढते जंगलतोड, हवामान बदल आणि मानवी हस्तक्षेपामुळे अनेक दुर्मिळ प्राणी …

Read More »

‘पंचहमी’ योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी सहकार्य करावे

  गॅरंटी योजना कमिटी अध्यक्ष रमेश जाधव ; निपाणी तालुका पातळीवरील बैठक निपाणी (वार्ता) : राज्य, जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायत पातळीवर पंचहमी गॅरंटीमधून सर्वच लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचत आहे. ही योजना निरंतरपणे सुरू राहणार असून विरोधकांच्या अफवावर लाभार्थी व नागरिकांनी विश्वास ठेवू नये. ही योजना आणखीन प्रभावीपणे राबविण्यासाठी तालुक्यातील सर्वच घरासमोर …

Read More »

निपाणी अक्कोळ रोडवर ‘बर्निंग’ व्हॅनचा थरार

  नागरिकांच्या सतर्कतेमुळे वाचले चालकाचे प्राण निपाणी (वार्ता) : भरधाव जाणाऱ्या मारुती व्हॅनने अचानक पेट घेतल्याने रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली. काही नागरिकांनी व्हॅनला आग लागल्याचे ओरडून चालकाला सांगितले. त्यामुळे प्रसंगावधान राखून चालकाने वाहनातून पुढे घेतल्याने त्याचा जीव बचावला. सोमवारी (ता.२) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास निपाणी- इचलकरंजी मार्गावरील अक्कोळ …

Read More »

आगारातील खड्डे, कचऱ्यावरून आगार प्रमुखांची झाडाझडती

  पंचहमी योजना पदाधिकारी आक्रमक आठवड्याभरात समस्या सोडविण्याच्या सूचना निपाणी (वार्ता) : प्रवाशांची वाढती संख्या आणि सुविधांचा अभाव असल्याने दहा वर्षापूर्वी येथे कोट्यावधी रुपये खर्च करून ‘हायटेक’ बसस्थानक निर्माण करण्यात आले आहे. केवळ तीनच वर्षात या बस स्थानकाची दुरावस्था झाली आहे. आगाराच्या परिसरात अनेक लहान मोठे खड्डे, परिसरात कचऱ्याचे ढीग, …

Read More »

होळी, रंगपंचमी, रमजान ईद काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई

  निपाणी (वार्ता) : रमजानचे उपवास सुरू झाले असून मुस्लिम बांधवांची रात्री उशिरापर्यंत ये-जा असते. तसेच पहाटे लवकर उठून नमाज अदा करतात. त्यामुळे शहर, उपनगरातील प्रत्येक मार्गावर सकाळ-सायंकाळी गर्दी होत आहे. या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखून पोलिसांना सहकार्य करावे. यंदा भीषण पाणी टंचाई असल्यामुळे रंगपंचमी साजरी करताना पाण्याचा …

Read More »

शेवटच्या श्वासापर्यंत जनतेसाठी कार्यरत; सहकाररत्न उत्तम पाटील

  निपाणीत कार्यकर्त्यातर्फे हृद्य सत्कार निपाणी (वार्ता) : कार्यकर्त्यांचा आशीर्वाद आणि मतदारांच्या पाठिंब्यामुळे निपाणी मतदारसंघाची नाळ जुळली आहे. सामाजिक, राजकीय क्षेत्रात निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या जीवावर आपण कोणत्याच नेतेमंडळींची साथ नसताना विधानसभा निवडणूक लढवली. निवडणूक लढविली. कार्यकर्त्यांचा विश्वास आणि नागरिकांच्या पाठिंबामुळे द्वितीय क्रमांकाची मते मिळाली. पराभव झाला तरी खचून न जाता कोणतीही …

Read More »