दोन दिवस चालणार सोहळा; आणखी मिरवणुकीसह विविध कार्यक्रम निपाणी (वार्ता) : येथील साई शंकर नगर मधील साई मंदिरात शुक्रवारपासून (ता.१३) साई यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार अखेर चालणाऱ्या या कार्यक्रमात पालखी सोहळ्यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सद्गुरू साईनाथ विश्वस्त मंडळ व साई यात्रा कमिटीने दिली …
Read More »‘रेणुका देवीच्या नावानं चांगभलं’ च्या गजरात बेनाडीतील रेणुका यात्रा सौंदत्तीकडे रवाना
निपाणी (वार्ता) : बेनाडी(ता.. निपाणी )येथील श्री रेणुका देवी विश्वस्त कमिटीतर्फे आयोजित रेणुका देवीची यात्रेसाठी येथील मानाच्या जगासह भाविक बुधवारी रात्री (ता.११) सौंदत्तीकडे रवाना झाले. तत्पूर्वी येथील रेणुका मंदिरपासून गावातील प्रमुख मार्गावरून मानाच्या जगाची सर्वाधिक मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर मंदिरात जगाची पूजा करून कापूर लावून सुमारे २१६ भाविक बस …
Read More »साखरवाडीतील हनुमान मंदिर जीर्णोद्धारासाठी निधीच्या मागणीचे आमदार गणेश हुक्केरी यांना निवेदन
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील जुन्या पी.बी. रोडवरील साखरवाडी येथील पुरातन श्री मारूती मंदिराच्या जीर्णोध्दाराचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. भाविकांनी देणगीदारांच्या सहकार्याने अंतिम टप्प्यात आले आहे. चिक्कोडी-सदलगा मतदार संघाचे आमदार गणेश हुक्केरी, बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष रोहन साळवे, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत जासूद यांनी मंदिरास्थळी भेट देवून …
Read More »नवीन कायदे रद्द होईपर्यंत रस्त्यावरची लढाई सुरूच
कॉम्रेड चंद्रकांत खराडे; निपाणीत ‘सिटू’ संघटनेतर्फे तहसीलदारांना निवेदन निपाणी (वार्ता) : केंद्र सरकारने कष्टकरी कामगारांच्या कायद्यांमध्ये सुधारणा करून त्यांना ४ संहितांमध्ये रूपांतरित केले आहे. कामगारांना मिळणाऱ्या लाभामध्ये कपात करून मालकांचे खिसे भरले आहेत. केंद्र आणि राज्य सरकारचे हे धोरण निंदनीय आहे. त्यांनी आणलेल्या ४ संहितांमुळे कष्टकरी नागरिकासह कामगारांना त्रास …
Read More »आडी येथील मल्लिकार्जुन डोंगर मठात महाशिवरात्री सप्ताह कार्यक्रमाला प्रारंभ
निपाणी (वार्ता) : आडी (ता.निपाणी) येथील मल्लिकार्जुन देव डोंगर मठ येथे महाशिवरात्रि सप्ताह निमित्त शिवानंद स्वामींच्या सानिध्यात मंगळवारपासून (ता.१०) विविध कार्यक्रमांना शिवानंद स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत विना पूजनाने प्रारंभ झाला आहे. मंगळवार (ता.१७) पर्यंत विविध कार्यक्रम होणार असल्याची माहिती महाशिवरात्री सप्ताह समितीने दिली आहे. मंगळवारी (ता.१०) सकाळी अभिषेक, पूजा …
Read More »नाले, गटारींमध्ये प्लॅस्टिक पिशव्यांचे थर
निपाणीत बंदीकडे दुर्लक्ष; कारवाई केवळ नावापुरतीच निपाणी (वार्ता) : सरकारने प्लॅस्टिक बंदी लागू केली असली, तरी निपाणी शहरात मात्र या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे चित्र आहे. परिसरातील मोकळे भूखंड, रस्ते, नाले आणि गटारीमध्ये प्लॅस्टिक पिशव्यांचे ढीग साचले असून नगरपालिकेची कारवाई केवळ नावापुरतीच असल्याचे आरोप नागरिक करत आहेत. ५१ …
Read More »नगरपालिका आवार की भंगार वाहनांचा डेपो?
नगरपालिकेची अनेक भंगार वाहने धुळखात; इंधनावर महिन्याला लाखोंचा खर्च निपाणी (वार्ता) : शहर आणि उपनगरातील स्वच्छतेचा भार नगरपालिकेवर आहे. यासाठी पालिकेकडे एकूण ३२ घंटागाड्या आहेत. मात्र या घंटागाड्या अपुऱ्या असल्याचे नवीन घंटागाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. तर दुसरीकडे, स्वतः पालिकेचाच अक्कोळ क्रॉसवरीर परिसर अस्वच्छ झाला आहे. मागील वर्षभरापेक्षा काळापासून …
Read More »ऊसावर केवडा, लोकरी माव्याच्या प्रादुर्भावामुळे निपाणी भागातील शेतकऱ्यांमध्ये चिंता
निपाणी (वार्ता) : यंदा मुबलक पाणीसाठा उपलब्ध असल्याने निपाणी भागातील अनेक शेतकऱ्यांनी उस लागवडीकडे कल वाढवला आहे. मात्र ऊस पिकावर अचानक केवडा रोगासह नोकरी माव्याचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे उसाची पाने पिवळी पडण्यासह वाढ खुंटत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ऊस लागवडीसाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात खर्च केला …
Read More »बॅटरी स्वस्त, मोबाईल महाग!
इलेक्ट्रॉनिक साहित्याच्या किमती वाढल्याचा परिणाम निपाणी (वार्ता) : केंद्रीय अर्थसंकल्पात लिथियम बॅटरीचे दर कमी होणार असल्याची घोषणा झाल्यानंतर सामान्य नागरिकांना स्मार्टफोन स्वस्त होण्याची आशा लागली होती. मात्र इतर आवश्यक इलेक्ट्रॉनिक साहित्यांच्या किमतीत वाढ झाल्याने सामान्यांसाठी मोबाईलच्या किमती महागच असल्याचे येथील स्थानिक विक्रेत्यांनी सांगितले. असाच निर्णय काही महिन्यांपूर्वी दिवाळीच्या सुमारास …
Read More »तणावमुक्त वातावरणात परीक्षा दिल्यास हमखास यश
गटशिक्षणाधिकारी महादेवी नाईक; दहावी विद्यार्थ्यांना दिला कानमंत्र निपाणी (वार्ता) : दहावीच्या परीक्षांना केवळ एक महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे पालक विद्यार्थ्यांची अभ्यासाच्या वेळापत्रकासह इतर कामांची लगबग सुरू झाली आहे. वार्षिक परीक्षेच्या पार्श्वभूमीवर अनेक विद्यार्थ्यांच्या मनात भीती, तणाव आणि दडपणाची भावना निर्माण होते. परीक्षा म्हणजे आयुष्याचा शेवट नाही, तर स्वतःच्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta