निपाणी (वार्ता) : निपाणी जवळील यरनाळ येथील भागवत धर्माचे प्रचारक व प्रसारक निवृत्ती घाटगे यांचा जन्मदिनानिमित्त निपाणी येथील भूमी वात्सल्य फाऊंडेशनतर्फे पर्यावरण प्रेमी शिक्षक नामदेव चौगुले परिवारातर्फे स्मशानभूमीत वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश देण्यात आला. यावेळी पिंपळ, पिंपरी व महोगणी या विविध वृक्षांची लागवड करण्यात …
Read More »प्रशासनाकडून महिन्याभरात घरकुलांच्या वितरणाचे आश्वासन : विलास गाडीवड्डर यांचे आंदोलन स्थगित
निपाणी (वार्ता) : निपाणी नगरपालिकेतर्फे राजीव गांधी हौसिंग कार्पोरेशन आश्रय योजना जी प्लस २ अंतर्गत बांधण्यात आलेल्या घरकुलांचे वितरण येत्या महिन्याभरात सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून करण्यात येईल, अशी लेखी आश्वासन जिल्हाधिकारी आणि नगरपालिका आयुक्त गणपती पाटील यांनी दिले आहे. त्यामुळे आंदोलन येत्या महिन्यापर्यंत पुढे ढकलण्यात आल्याची माहिती माजी …
Read More »म्युनिसिपल हायस्कूल मैदान बनले वाहन पार्किंगचा अड्डा
खेळाडूसह नागरिकांची गैरसोय ; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा निपाणी (वार्ता) : शहर व नगरपालिकेच्या इतिहासात म्युनिसिपल हायस्कूलच्या मैदानाला महत्त्वाचे स्थान आहे. १८५४ मध्ये निपाणी नगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर या मैदानाचा वापर राजकीय सभा सार्वजनिक कार्यक्रम, विविध खेळ व सांस्कृतिक केंद्रबिंदू म्हणून या मैदानाला आजही तितकेच महत्त्व असताना सध्या या …
Read More »निपाणीतील पाणी प्रश्नाकडे गांभीर्याने पाहावे
दीर्घकालीन जलनियोजन आवश्यक; माजी सभापती प्रा. राजन चिकोडे यांची मागणी निपाणी (वार्ता) : निपाणी शहर आणि उपनगरातील नागरिकांना नियमित व पुरेसा पाणीपुरवठा कसा करता येईल, तसेच भविष्यातील गरजा लक्षात घेऊन आवश्यक पाणीसाठा कसा निर्माण करता येईल, यासाठी जलव्यवस्थापन क्षेत्रातील तज्ज्ञांना आमंत्रित करून व्यापक विचारमंथन करण्याची गरज आहे, असे आवाहन …
Read More »पाणीपुरवठा योजनेचे काम केल्याने नगरपालिकेसमोरील नियोजित मोर्चा स्थगित
निपाणी (वार्ता) : निपाणी शहरातील मुगळे गल्ली, तवटे गल्ली आणि शानेदिवाण गल्ली पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी माजी सभापती जुबेर बागवान यांच्या नेतृत्वाखाली नागरिकातर्फे नगरपालिकेला निवेदन देण्यात आले होते. तात्काळ दखल न घेतल्यास नगरपालिकेसमोर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. आयुक्त गणपती पाटील व पाणीपुरवठा विभागाचे अधिकाऱ्यांनी पाणीपुरवठा योजनेची दुरुस्ती करून …
Read More »निपाणीतील शेट्टी सराफ बंधूंनी बनविला बदामी बनशंकरी देवस्थानसाठी १५० किलोचा चांदीचा रथ
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील अप्पय्या शिवरुद्रप्पा शेट्टी सराफ दुकानातून बदामी येथील बनशंकरी देवस्थानासाठी तब्बल १५० वजनाचा रथ बनवण्यात आला होता. शनिवारी (ता.१३) सकाळी देवस्थान कमिटी पदाधिकाऱ्याकडे सुपूर्द करण्यात आल्या. यावेळी समाधी मठातील प्राणलिंग स्वामींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी प्राणलिंग स्वामी आणि महिलांच्या हस्ते रथाची पूजा करण्यात आली. त्यानंतर …
Read More »पाऊस वारा येताच बत्तीगुल
पावसाळापूर्व कामावर प्रश्नचिन्ह; दररोज तीन तासापेक्षा अधिक वेळ वीज गायब निपाणी (वार्ता) : हेस्कॉमच्या कारभाराचा फटका एप्रिल मे महिन्यात शहरासह ग्रामीण भागातील ग्राहकांना बसला आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला मॉन्सूनपूर्व थोडा पाऊस झाला. मात्र त्यानंतर तापमान अधिक वाढत असून उकाडादेखील वाढला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा विजेच्या मागणीत वाढ झाली आहे. …
Read More »अर्धवट कामासह विकास कामांच्या मागणीचे राजेंद्र वडर यांचे मंत्री जारकीहोळी यांना निवेदन
निपाणी (वार्ता) : कर्नाटक सरकारच्या नूतन मंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून फेरनिवड झाल्यानंतर सतीश जारकीहोळी यांची भोज जिल्हा पंचायतचे माजी सदस्य व कर्नाटक राज्य ओसीसीआयचे संचालक राजेंद्र वडर पवार यांनी भेट घेतली. यावेळी निपाणी तालुक्यातील विकासकामे, प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याबाबतचे निवेदन वडर यांनी जारकीहोळी यांना दिले. यमकनमर्डी येथील मंत्री …
Read More »महात्मा बसवेश्वर सौहार्द संस्थेच्या संस्थेच्या हुन्नरगी शाखा अध्यक्षपदी वसंत शिंत्रे, उपाध्यक्षपदी अशोक मुरदंडे यांची निवड
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील चिक्कोडी रोडवरील श्री महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेच्या हुन्नरगी शाखा अध्यक्षपदी वसंत शिंत्रे तर उपाध्यक्षपदी अशोक मुरदंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. प्रारंभी संस्थेचे सहकार रत्न संस्थापक चेअरमन डॉ. सी. बी. कुरबेटी सर व संस्थेचे अध्यक्ष किशोर बाली यांच्या हस्ते श्री महात्मा बसवेश्वर …
Read More »अक्कोळ मराठी मुलींच्या शाळेत चव्हाण परिवारातर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप
निपाणी (वार्ता) : अक्कोळ येथील मराठी मुलींच्या शाळेत निपाणीतील उद्योजक किशोर आणि स्नेहा चव्हाण परिवारातर्फे १२० विद्यार्थिनींना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात. याशिवाय मराठा मंडळ गर्ल्स हायस्कूल मधील विद्यार्थिनींना ३० पॅड आणि कंपासाचे वितरण करण्यात आले. गेल्या दहा वर्षापासून चव्हाण परिवारातर्फे हा उपक्रम राबविला जात आहे. सर्वसामान्य कुटुंबातील मुलींना …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta