संजीवीनी फौंडेशन मध्ये योग दिन उत्साहात साजरा बेळगाव : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त संजीवीनी फाउंडेशनमध्ये योगासन शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले योग शिक्षक विजय बन्सुर यांनी योगाचे महत्त्व विशद करताना, योगासन केल्याने आरोग्य स्वस्थ आणि सुंदर राहते. त्यामुळे प्रत्येकाने नियमित योगाभ्यास करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन …
Read More »अमित शहा यांच्या कोल्हापूर दौऱ्यादरम्यान बेळगावच्या शिवसैनिकांची पोलिसांकडून अडवणूक
कोल्हापूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कोल्हापूर दौऱ्यादरम्यान सीमाप्रश्नाकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणाऱ्या बेळगावच्या शिवसैनिकांना पोलिसांनी काही काळ ताब्यात घेतल्याची घटना शनिवारी घडली. मात्र, त्यांनी केवळ निवेदनात्मक फलकांच्या माध्यमातून आपली भूमिका मांडण्यासाठी आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. ‘चलो कोल्हापूर’ आंदोलनात सहभाग अमित शहा यांच्या …
Read More »बसच्या तिकीट दरवाढीवर संतुलित निर्णय घेऊ
मुख्यमंत्री शिवकुमार, बस भाडेवाढीचे दिले संकेत बंगळूर : राज्य परिवहन महामंडळ (केएसआरटीसी) आर्थिकदृष्ट्या सक्षम राहिले पाहिजे, तसेच सर्वसामान्य प्रवाशांचाही हितसंबंध अबाधित राहिला पाहिजे. या दोन्ही बाबी लक्षात घेऊन बसभाडेवाढीच्या प्रस्तावावर निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी स्पष्ट केले. विधानसौध येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, खासगी …
Read More »कन्नडसक्तीविरोधी मोर्चाला येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीचा पाठिंबा
बेळगाव : शनिवार दिनांक 20/6/2026 रोजी येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक अध्यक्ष श्री. विलास घाडी यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे कार्यालय श्री बालशिवाजी वाचनालय येळ्ळूर येथे पार पडली. बैठकीमध्ये सोमवार दिनांक 22 जून 2026 रोजी मध्यवर्तीं महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या कन्नड सक्तीविरोधी मोर्चाला एकमुखी पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला …
Read More »मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची तातडीची बैठक उद्या
बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची तातडीची बैठक उद्या, दिनांक 21 जून रोजी दुपारी 3.00 वाजता मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे. सदर बैठकीस मध्यवर्ती समितीच्या सर्व सदस्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी केले आहे.
Read More »सीमाभागातल्या मराठी भाषिकांच्या मूलभूत अधिकारांच्या उल्लंघना विरुद्ध दाखल करणार रिट याचिका
बेळगाव : सीमा भागात होणाऱ्या मूलभूत अधिकारांच्या उल्लंघना बद्दल सर्वोच्च न्यायालयाचे वकील श्री. विठ्ठल आदित्य यांच्याशी चर्चा केली. मूळचे लातूर येथील असलेले विठ्ठल आदित्य हे सर्वोच्च न्यायालयात वकिली करतात, त्यांनी बेळगावला धावती भेट दिली असता शुभम शेळके यांनी त्यांच्याशी चर्चा करताना सर्वच सीमा प्रश्न असलेल्या सर्वोच्च न्यायालयातील दाव्या बद्दल …
Read More »22 जूनच्या कन्नडसक्ती मोर्चाला कर्नाटक प्रशासनाचा नकार; कायदा-सुव्यवस्थेचे दिले कारण
बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आयोजित 22 जून रोजीच्या कन्नडसक्ती आंदोलनाला कर्नाटक प्रशासनाने परवानगी नसल्याचे पत्रकाद्वारे कळविले आहे. धर्मवीर संभाजी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर प्रस्तावित सार्वजनिक मोर्चा व रॅली काढण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. दिनांक ८ जून २०२६ रोजी मध्यवर्ती म. ए. समितीच्या वतीने …
Read More »अमित शहा यांना भेटण्यासाठी गेलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाला कोल्हापुरात स्थानबद्ध
कोल्हापूर : देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटण्यासाठी गेलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतेमंडळी व कार्यकर्त्यांना कोल्हापूर पोलिसांनी अडवून करून स्थानबद्ध केल्याची घटना आज घडली. या प्रकारामुळे सीमाभागातील कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाबाबत आपली भूमिका आणि मागण्या केंद्रीय गृहमंत्र्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे शिष्टमंडळ कोल्हापूर …
Read More »राकसकोप धरण परिसरात पार्ट्यांवर बंदी; नियम मोडणाऱ्यांना ५ हजारांचा दंड
बेळगाव : निसर्गरम्य पर्यटनस्थळांवर मद्यपान, हुल्लडबाजी आणि पर्यावरणाची हानी करणाऱ्या प्रकारांमध्ये वाढ होत असल्याने राकसकोप धरण परिसरात पार्ट्या करण्यास ग्रामस्थांनी सक्त बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे उल्लंघन करताना आढळणाऱ्यांवर ५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. यापूर्वी हजगोळी येथील निसर्गरम्य चाळोबा मंदिर परिसरात पर्यटकांच्या अनियंत्रित वावरामुळे ग्रामस्थांनी …
Read More »अमित शाह यांच्या भेटीसाठी निघालेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना हत्तरगी टोलवर अडवले; महामार्गावर ठिय्या आंदोलन
बेळगाव : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांची भेट घेण्यासाठी निघालेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाला कर्नाटक पोलिसांनी हत्तरगी टोल नाक्यावर रोखल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या कारवाईच्या निषेधार्थ समितीचे नेते व कार्यकर्ते महामार्गावरच ठिय्या आंदोलन करत घोषणाबाजी करत आहेत. शनिवारी सकाळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta