बेळगाव : बेळगाव-कित्तूर-धारवाड रेल्वे मार्गिकेसाठी आवश्यक असलेली भूसंपादन प्रक्रिया राज्य सरकारच्या पातळीवर प्रलंबित आहे. ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करून रेल्वेचे काम सुरू करावे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि खासदार जगदीश शेट्टर यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री सिध्दरामय्यांना पत्र लिहून लक्ष घालण्याची विनंती केली आहे. बेळगावमध्ये पत्रकारांशी बोलताना …
Read More »७व्या अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेचे दिमाखात अनावरण
बेळगाव ( प्रतिनिधी) : मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या जतनाचा ध्यास घेणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, बेळगाव आणि मराठा मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ७ वे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन २०२६ च्या निमंत्रण पत्रिकेचे आज मराठा मंदिर येथे उत्साहपूर्ण वातावरणात दिमाखात अनावरण करण्यात आले. जेष्ठ साहित्यिक यशवंत …
Read More »बेळगावमध्ये बड्या व्यक्तींना अडकवून खंडणी वसूल करणाऱ्या महिलेला अटक
बेळगाव : बड्या व्यक्तींना लग्नाचे आमिष दाखवून आणि नंतर अत्याचाराचे खोटे गुन्हे दाखल करण्याची भीती दाखवून खंडणी वसूल करणाऱ्या एका टोळीतील महिलेला बेळगाव पोलिसांनी अटक केली आहे. बेळगाव जिल्ह्यात पोलिसांसह अनेक नागरिकांना खोट्या गुन्ह्यांत अडकवून ब्लॅकमेल करणाऱ्या रेणमा मुतगा नावाच्या महिलेवर रौडी शिटरची कारवाई करण्यात आली आहे. या महिलेने …
Read More »श्रमदानाने रस्त्यावरील खड्डा बुजवणाऱ्या दोघा रहदारी पोलिसांचा सत्कार
बेळगाव : स्वतः पोलीस असूनही शहरातील श्री शनी मंदिराजवळ रस्त्यावर पडलेला धोकादायक खड्डा भर उन्हात हातात फावडा घेऊन श्रमदानाने बुजवणाऱ्या दोघा रहदारी पोलीस कर्मचाऱ्यांचा शहरवासीय व वकीलवर्गातर्फे नुकताच सत्कार करण्यात आला. जनसेवा हीच ईश्वर सेवा असे मानणारे या दोन सत्कारमूर्ती रहदारी पोलीस कर्मचाऱ्यांची नावे शिवपुत्र हुडेद आणि शिवाप्पा दोडभिमापगोळ …
Read More »मानस फुटबॉल अकादमीचा उपांत्य फेरीत प्रवेश
बेळगाव : कलिंगड गोवा येथे बडोदा फुटबॉल अकादमी गुजरात आयोजित स्पोर्टिंग गोवा फुटबॉल फेस्टिवल अंतर्गत सुरू असलेल्या 14 वर्षाखालील मुलांच्या फुटबॉल स्पर्धेत बेळगावच्या मानस फुटबॉल अकादमीने उपांत्य फेरीत प्रवेश केला. पहिल्या सामन्यात मानस फुटबॉल अकादमीने बडोदा फुटबॉल क्लबचा 7-3 असा पराभव केला, विजयी संघाच्या हुसेन जमादारने हॅट्रिकसह 5 गोल, …
Read More »श्री गुरु नर्सिंग कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन साजरा
बेळगाव : दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी जखमी सैनिकांची सुश्रुषा करणाऱ्या फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांची जयंती जगभरात आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन म्हणून साजरी केली जाते. याच दिनाचे औचित्य साधून कोल्हापूर सर्कल येथील इंद्रचर्या बिल्डिंग मधील श्री गुरु नर्सिंग कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे महाविद्यालयाचे डीन आणि डायरेक्टर अध्यक्ष …
Read More »फेरतपासणीनंतर मराठी विद्यानिकेतनचा मराठी माध्यमात सोहम हळदणकर जिल्ह्यात प्रथम
बेळगाव : दिनांक १६ मे रोजी इयत्ता दहावीचा फेरतपासणीचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये मराठी विद्यानिकेतन शाळेचा सोहम सतीश हळदणकर याने ६२५ पैकी ६१६ गुण मिळवत ९८.५६ टक्के गुणांसह शाळेसह बेळगाव जिल्ह्यात मराठी माध्यमात प्रथम क्रमांक पटकावला. शाळेची विद्यार्थिनी स्नेहा यल्लाप्पा हिरोजी हिने ६२५ पैकी ६१५ गुण मिळवून ९८.४ …
Read More »श्री शनैश्वर जयंती निमित्त आयोजित रक्तदान शिबिर उत्स्फूर्त प्रतिसादात
बेळगाव : सालाबाद प्रमाणे श्री शनैश्वर एज्युकेशन अँड सोशल वेल्फेअर सोसायटी, बेळगाव यांच्यावतीने श्री शनैश्वर जयंती निमित्त आयोजित रक्तदान शिबिर आज शनिवारी उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडले. सदर रक्तदान शिबिराच्या उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे ॲड. सुधीर सक्री व डॉ. संतोष पत्तार यांच्यासह डॉ. श्रीकांत विरगी, डॉ. विठ्ठल माने आदी मान्यवर …
Read More »बेळगावच्या पत्रकारिता क्षेत्रातील निर्भिड व्यक्तिमत्व हरपले : बसवंत शहापूरकर
बेळगाव : पत्रकारिता म्हणजे नेमकं काय ते एम.डी.मुल्ला यांनी आपल्या लेखणीतून इतर पत्रकारांना आणि लोकांना दाखवून दिलं. त्यांच्या निधनाने बेळगावच्या पत्रकारिताक्षेत्रातील निर्भिड व्यक्तिमत्व हरपले, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार बसवंत शहापूरकर यांनी केले. बेळगावचे ज्येष्ठ पत्रकार एम. डी. मुल्ला यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधन निमित्त आज शनिवारी सायंकाळी मराठा …
Read More »इस्कॉनमध्ये अधिक मासानिमित्त विशेष कार्यक्रम
बेळगाव : येथील आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन)तर्फे अधिक मासानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 17 मे ते 15 जून या कालावधीत इस्कॉनच्या श्री श्री राधा गोकुळानंद मंदिरात रोज सायंकाळी 7 ते 8.50 वाजेपर्यंत चौराग्रगण्य अष्टकमचे पठण, दीपदान होणार असून रोज भगवद्गीतेतील 15 व्या अध्यायाचे पठण त्यानंतर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta