बेळगाव : शहापूर परिसरातील सर्वसामान्य जनता, शेतकरी तसेच नागरिकांच्या मनात मानाचे स्थान असलेल्या श्री तुकाराम को-ऑप. बँकेत दरवर्षीप्रमाणे यंदाही तुकाराम बीज कार्यक्रम गुरुवार, दि. ५ मार्च २०२६ रोजी भक्तिमय वातावरणात पार पडला. फाल्गुन महिन्यात येणाऱ्या तुकाराम महाराज बीज निमित्त बँकेसमोर उभारलेल्या जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांच्या मूर्तीची विधिवत पूजा …
Read More »उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचे बेळगाव विमानतळावर स्वागत
बेळगाव : चिक्कोडी तालुक्यातील तीर्थ क्षेत्र यडूर येथील श्री वीरभद्रेश्वर मंदिरात आज होणाऱ्या नूतन राजगोपुर उद्घाटन, कळसारोहण व महाकुंभाभिषेक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आगमन झालेले भारताचे माननीय उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचे बेळगावच्या सांबरा विमानतळावर गौरवपूर्वक स्वागत करण्यात आले. यावेळी राज्यपाल थावरचंद गेहलोत, सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकिहोळी, राज्यसभा सदस्य …
Read More »हलगा येथील बीबी फातिमा दर्ग्याचे देवकरी धाकलू बिळगोजी यांचे निधन
बेळगाव : हलगा देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष, देवकारी पंच, प्रगतशील शेतकरी, म ए समितीचे कार्यकर्ते, बसवान गल्ली हलगा येथील रहिवासी श्री. धाकलू फकीरा बिळगोजी (वय वर्षे ८८) यांचे गुरुवार दिनांक ५ रोजी दुःखद निधन झाले. पश्चात पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे, पणतवंडे असा परिवार आहे. धाकलू …
Read More »बेळगावात मनपाचे ‘ऑपरेशन लायसन्स’; नियम धाब्यावर बसवणाऱ्या बड्या शोरूम्सना दणका
बेळगाव : बेळगाव महानगरपालिका आयुक्तांच्या आदेशानंतर आता शहरभर आरोग्य निरीक्षकांचे पथक मैदानात उतरले आहे. व्यापार परवाना न घेता वसाहत करणाऱ्या मोठ्या शोरूम्स आणि दुकानांना महापालिका अधिकाऱ्यांनी दणका देण्यास सुरुवात केली आहे. बेळगाव महानगरपालिका आयुक्तांच्या कडक सूचनेनुसार शहराच्या उत्तर आणि दक्षिण विभागातील आरोग्य निरीक्षकांनी ही संयुक्त मोहीम राबवली. समादेवी गल्लीतील …
Read More »कावळेवाडीत ज्ञानेश्वरी पारायण सोहळा
बेळगाव : कावळेवाडी येथील संत ज्ञानेश्वर पारायण मंडळ व भजनी मंडळातर्फे दरवर्षी प्रमाणे यंदाही तुकाराम बीज पासून ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याची मूहूर्त मेढ तेवीस फेब्रुवारी रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न. 4 मार्च रोजी ज्ञानेश्वर महाराज मूर्ती व तुकाराम महाराज मूर्तीची गावातून टाळ मृदुंगच्या जयघोषात दिंडी …
Read More »बेळगावात उत्पादन शुल्क विभागाची कारवाई : गोवा बनावटीची दारू जप्त
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील हलगा गावाजवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. राष्ट्रीय महामार्गाशेजारील एका शेडमध्ये अवैधपणे साठवून ठेवलेला लाखो रुपये किमतीचा गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी एका आरोपीला नोटीस बजावण्यात आली आहे. बेळगाव तालुक्यातील हलगा गावच्या हद्दीत उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली …
Read More »पालिकेचे महसूल अधिकारी सुनील कांबळे यांना मातृशोक
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील नगरपालिकेचे महसूल अधिकारी सुनील कांबळे यांच्या मातोश्री आणि थळोबा पेठेमधील प्रतिष्ठित महिला राधाबाई कृष्णा कांबळे (वय ९२) यांचे बुधवारी (ता.४) निधन झाले. त्या अत्यंत मनमिळावू स्वभावाच्या होत्या. परोपकारी वृत्तीमुळे त्या सर्वांना परिचित होत्या. अत्यंत कठीण परिस्थितीत त्यांनी कुटुंबाचा सांभाळ केला. त्यांच्या निधनामुळे निपाणी परिसरात …
Read More »कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या १० ते १२ दिवसांपासून पांढऱ्या रंगाची महाराष्ट्र पासिंगची कार संशयास्पद स्थितीत उभी आहे. ही कार कोणाची आहे आणि ती येथे कशी आली, याबाबत कोणालाही माहिती नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मंदिराच्या पवित्र परिसरात इतके …
Read More »बेळगावात एकाच वेळी १२०० शाळांमध्ये बाल हक्क आणि कायद्याची जनजागृती
बेळगाव : बेळगाव जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच बालकांच्या कायदेशीर हक्कांबाबत जनजागृती करण्यासाठी ७ मार्च रोजी भव्य अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश मंजुनाथ नायक यांनी दिली आहे. या उपक्रमाद्वारे जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांना कायद्याचे ज्ञान दिले जाणार आहे. बेळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी या मोहिमेची …
Read More »सिदनाळ येथील बैलगाडी शर्यतीत राशिवडेच्या आयुष वाडकर यांची गाडी प्रथम
निपाणी (वार्ता) : सिदनाळ येथील ग्रामदैवत श्री. सिद्धेश्वर आणि मायाक्का देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या जनरल बैलगाडी शर्यतीत राशिवडेच्या आयुष वाडकर यांनी व कोल्हापूरच्या स्वप्निल सरनाईक यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांक पटकावून २० हजार रुपयांचे बक्षीस विभागून पटकावले. करंजे येथील यश माने व मुरगुड येथील रामा मांगले यांच्या बैल जोड्यांनी विभागून …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta