नवी दिल्ली : विधानसभेच्या निवडणूक निकालानंतर आता तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेसाठी आकड्यांची जुळवाजुळव करण्यास सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षाने डीएमके आणि एआयएडीएमके या दोन्ही पक्षांना मोठा धक्का दिला आहे. तामिळनाडूनमध्ये टीव्हीकेच्या सर्वाधिक 108 जागा निवडून आल्या आहेत. तामिळनाडूमध्ये सत्तास्थापनेसाठी बहुमताचा आकडा 118 एवढा आहे. परंतु …
Read More »मुख्यमंत्रिपदाचे दावेदार सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची गोळ्या झाडून हत्या
कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर हिंसाचार घटना सुरूच आहे. बुधवारी रात्री उशिरा भाजप नेते आणि ममता बॅनर्जी यांचा पराभव करून विजयी झालेले सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. चंद्रनाथ रथ असे त्यांच्या पीएचे नाव होते. त्यांच्यासोबत कारमध्ये असलेली एक व्यक्ती या गोळीबारामध्ये गंभीर जखमी …
Read More »अवैध कृत्यांविरोधात शहर पोलिसांची तीव्र मोहीम; पाच जणांना अटक
बेळगाव : शहरातील अवैध कृत्यांविरोधात शहर पोलिसांनी तीव्र मोहीम हाती घेतली असून चार पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्वतंत्र छापे घालून कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत मटका व्यवसाय आणि अमली पदार्थांचे सेवन करीत असणाऱ्या पाच जणांना अटक केली असून विविध पोलीस स्थानकाच्या पथकाने सदर कारवाई केली आहे. हिरेबागेवाडी पोलीस स्थानकाचे …
Read More »मराठी घेऊन बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनीसाठी अशीष फाफट शिष्यवृत्तीसाठी अर्जाचे आवाहन
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील विज्ञान शाखेतून एक विषय मराठी घेऊन बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनीकडून अशीष फाफट शिष्यवृत्तीसाठी अर्जाचे आवाहन करण्यात आले आहे. अशीष फाफट हे मूळचे राजस्थानमधील फालोदी येथील आहेत. त्यांचे बालपण आणि शिक्षण चेन्नई आणि हैदराबाद येथे झाले. त्यांनी चार्टर्ड अकाउंटंट (CA) आणि सर्टिफाइड पब्लिक अकाउंटंट (CPA) ही …
Read More »रामकृष्ण मिशन आश्रमाच्या रौप्य महोत्सव कार्यक्रमास 8 मे पासून प्रारंभ
बेळगाव : स्वामी विवेकानंद यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या किल्ल्यातील रामकृष्ण मिशन आश्रमाला पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याने रौप्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या निमित्ताने धार्मिक, अध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन दि. ८ ते १० मे दरम्यान किल्ल्यातील आश्रमात करण्यात आले आहे. स्वामीजींनी १६ ते २७ ऑक्टोबर १८९२ या कालावधीत …
Read More »बेळगाव उत्तर विभाग आयजीपीपदी संदीप पाटील यांची नियुक्ती
बेंगळूर : राज्य सरकारने अनेक वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले असून बेळगाव उत्तर विभागाचे आयजीपी म्हणून संदीप पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या कार्यरत असलेले डॉ. चेतन सिंग राठोड यांच्या जागी ही बदली करण्यात आली आहे. कर्नाटक सरकारने बुधवारी जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार, २००४ बॅचचे आयपीएस अधिकारी …
Read More »बोळेवाडी येथील शर्यतीत आडीतील बैलगाडी प्रथम
रेंदाळची गाडी द्वितीय; शर्यती शौकिनांची गर्दी निपाणी (वार्ता) : बोळेवाडी येथे सिद्धेश्वर, महालक्ष्मी व मरगुबाई यात्रेनिमित्त ४ ते ६ मे अखेर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी (ता.६) सकाळी दहा वाजता दुर्गा माता तरुण मंडळातर्फे आयोजित विना लाठी काठी जनरल बैलगाडी शर्यतीमध्ये आडी मधील पप्पू …
Read More »नंदकिशोर सारडा यांच्या स्मरणार्थ तीन विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती देणार
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील महाविद्यालय मराठी भाषा विषय घेऊन शास्त्र शाखेतून (Science) बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनींसाठी शशिकांत सारडा आपले वडील नंदकिशोर सारडा यांच्या स्मरणार्थ तीन विद्यार्थिनींना हुशार व होतकरू मुलींना प्रत्येकी दहा हजार रुपयांची शिष्यवृत्ती देणार आहेत. शशिकांत सारडा हे सांगलीचे सुपुत्र असून सध्या ते अमेरिकेतील WPS या कंपनीत …
Read More »विजेचा धक्का बसून घराच्या छतावरून खाली पडल्याने 9 वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू
चिकोडी : विजेचा धक्का बसून घराच्या छतावरून खाली पडल्याने 9 वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना चिक्कोडी तालुक्यातील इंगळी गावात घडली आहे. सान्वी कांबळे असे मृत बालिकेचे नाव असून ती इंगळी येथील प्राथमिक शाळेत तिसरी इयत्तेत शिक्षण घेत होती. मंगळवारी सायंकाळी घराच्या छतावर खेळत असताना अचानक विद्युत तारेचा स्पर्श …
Read More »बेळगावनगरीत भरणार आंबा महोत्सव : मिळणार शेतकऱ्यांकडून थेट खरेदीची संधी
बेळगाव : जिल्हा बागायती विभागाच्या वतीने बेळगाव, क्लब रोडवरील ह्युम पार्क येथे आंबा प्रदर्शन व विक्री मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दिनांक 8 ते रविवार दिनांक 10 मे दरम्यान सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत हा आंबा प्रदर्शन व विक्री मेळा भरणार आहे. या मेळ्यात शास्त्रीय पद्धतीने काढलेले …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta