Monday , September 21 2026
Breaking News

Belgaum Varta

डॉ. उमा कुलकर्णीनी मराठी साहित्याला कन्नड संस्कृतीची ओळख करून दिली : डॉ. पुष्पा द्रविड

  बेंगळूरू : कन्नड आणि मराठी या दोन्ही भाषा समृद्ध परंपरा लाभलेल्या असून कन्नड साहित्यातील अनेक महत्वपूर्ण कृतींचे मराठीत अनुवाद करून ज्येष्ठ अनुवादक डॉ. उमा कुलकर्णी यांनी मराठी साहित्यविश्वाला कन्नड संस्कृतीची खरी ओळख करून दिली. त्यांच्या साहित्यसेवेचा गौरव म्हणजे मराठी–कन्नड भाषिक ऐक्याचा गौरव होय, असे प्रतिपादन जागतिक दर्जाच्या चित्रकार, शिल्पकार …

Read More »

खानापुरात रविवारी सामान्यज्ञान प्रज्ञाशोध परीक्षा

  मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि राज्य मराठी विकास संस्थेकडून आयोजन खानापूर : येथील मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र सरकारचे राज्य मराठी विकास संस्थेच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (ता.२२) सामान्यज्ञान प्रज्ञाशोध परिक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा मंडळच्या ताराराणी हायस्कूलमध्ये होणाऱ्या या परीक्षेला खानापूर तालुक्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने …

Read More »

मातोश्री ट्रॉफी ग्रामपंचायत प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचा उदघाटन सोहळा उत्साहात

  बेळगाव : मातोश्री क्रीडा, सामाजिक व शैक्षणिक फौंडेशन, मण्णूर, यांच्या वतीने खास महाशिवरात्री निमित्त मण्णूर -आंबेवाडी -गोजगे अश्या तिन्ही गावाच्या मिळून मातोश्री ट्रॉफी नावाने ग्रामपंचायत प्रीमियर लीग हि क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आहे. त्याचा उदघाटन सोहळा मण्णूर येथील छत्रपती शिवाजी महाराज ग्राउंडवर अतिउत्साहात पार पडला. सर्व प्रथम मण्णूर येथील …

Read More »

सरकारी मराठी मॉडेल शाळा येळ्ळूर येथे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न

  बेळगाव : सरकारी मराठी मॉडेल शाळा येळ्ळूर येथे सन 2025-26 सालातील वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एसडीएमसी अध्यक्षा सौ.दिव्या संदिप कुंडेकर या होत्या, प्रमुख वक्त्या शाळेच्या माजी विद्यार्थीनी आणि निर्देशक, कौशल्य अभिवृद्धी केंद्र आणि अध्यक्षा महिला घटक व्हीटीयू डॉ. संध्या राजन अणवेकर त्याचबरोबर बेळगाव ग्रामीणचे …

Read More »

डॉक्टर दांपत्याकडून 37 जणांची फसवणूक; खडेबाजार पोलिस स्थानकात गुन्हा दाखल

  बेळगाव : एमबीबीएसमध्ये प्रवेश मिळवून देण्याचे त्याचप्रमाणे रशियामध्ये नोकरीचे आमिष दाखवून यमनापूर येथील डॉक्टर दांपत्याने बेळगाव शहरातील जवळपास 37 जणांची फसवणूक करून 75 लाख रुपयांना गंडविल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी संबंधित डॉक्टरवर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, डॉक्टर सुरज अशोक अनगोळकर हे …

Read More »

आयुष्यात एक दिवस अविस्मरणीय असावा यासाठीच वाढदिवस ज्येष्ठांसोबत साजरा : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर

  बेळगाव : ज्येष्ठ नागरिकांसमवेत वाढदिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे वडीलधाऱ्या मंडळींसोबत वेळ घालवणे व त्यांचा आशीर्वाद घेणे हा होता. ज्येष्ठ नागरिकांच्या आयुष्यात पुन्हा एकदा नवचैतन्य, उत्साह निर्माण व्हावा अशी आपली इच्छा होती. दैनंदिन जीवनातील समस्या दूर ठेवून त्यांच्या आयुष्यात एक दिवस अविस्मरणीय असावा यासाठी आपण आपला वाढदिवस ज्येष्ठांसोबत …

Read More »

टीम इंडियाची सुपर 8 मध्ये धडक, पाकिस्तानचा 61 धावांनी धुव्वा

  कोलंबो : आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील 27 व्या सामन्यात टीम इंडियाने कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये पाकिस्तानचा 61 धावांनी धुव्वा उडवला आहे. टीम इंडियाने या विजयासह पाकिस्तान विरुद्ध विजयी होण्याची मालिका यशस्वीरित्या कायम राखली आहे. भारताने सलामीवीर फलंदाज इशान किशन याच्या तडाखेदार खेळीच्या जोरावर पाकिस्तासमोर 176 धावांचं …

Read More »

व्यसनमुक्ती काळाची गरज, युवा पिढीने आत्मचिंतन करावे : निवृत्त शिक्षक गोविंद कालसेकर

  समाज सारथी सेवा संघाच्या बैठकीत चिंतन येळ्ळूर : दिवसेंदिवस युवापिढी व्यसनाधिन होत असुन अनेकांचे जीवन बरबाद होते आहे. त्याचा त्रास जन्मदाता आईवडिलांना होतो याच भान ठेवत युवकानी आत्मचिंतन करावे, असा सल्ला संघटनेचे हिशोब तपासणीस गोविंद काळसेकर यानी दिला. ते समाज सारथी सेवा संघाच्या बैठकीत बोलत होते अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष …

Read More »

‘मराठी सन्मान यात्रे’ला येळ्ळूर म. ए. समितीचा पाठिंबा

  येळ्ळूर : 27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने आयोजित केलेल्या मराठी सन्मान यात्रेत बहुसंख्येने हजर राहून यशस्वी करण्याचा निर्धार येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समितीने केला आहे. दत्त मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी ग्रामपंचायत सदस्य श्री. गोविंद बापूसाहेब पाटील हे होते. …

Read More »

‘जीवनानंद’ पुस्तक श्रमातून समृद्धीकडे नेणारी प्रेरणादायी वाट

  डॉ. अच्युत माने : निपाणीत पुस्तक प्रकाशन सोहळा निपाणी (वार्ता) : प्रतिकूल परिस्थितीतून जिद्दीने उभे राहत स्वतःला सिद्ध करणाऱ्या प्रा. आनंद संकपाळ यांनी ‘जीवनानंद’ या पुस्तकातून श्रमातून समृद्धीकडे जाणारी प्रेरणादायी वाट समाजासमोर ठेवली आहे, असे मत अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. अच्युत माने व्यक्त यांनी केले. येथील बी. आर. पाटील …

Read More »