बेळगाव : बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जैतून माळ येथे गांजा विक्री करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी छापा टाकला आहे. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून १ किलोपेक्षा जास्त गांजा जप्त केला आहे.महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमा भागातून गांजा आणून बेळगावमध्ये विक्री केली जात होती. सीसीबीचे पोलीस निरीक्षक …
Read More »माजी मंत्री व आमदार जयंत पाटील यांनी घेतली दीपक दळवी कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दिवंगत दीपक दळवी यांच्या कुटुंबीयांची आज शुक्रवारी महाराष्ट्राचे माजी मंत्री व आमदार जयंत पाटील यांनी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. सीमा प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आपले आयुष्य वेचणारे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे झुंजार व्यक्तिमत्त्व असलेले अध्यक्ष दीपक दळवी यांचे गेल्या मंगळवारी वयाच्या 84 व्या …
Read More »न्यायाधीश प्रियांका राजगोळकर यांचा सत्कार
बेळगाव : शाहूनगर, बेळगाव येथील रहिवासी प्रियांका राजगोळकर यांची दिवाणी न्यायाधीश पदी निवड झाल्याबद्दल शाहूनगरवासियांतर्फे अभिनंदन करून नुकताच त्यांचा सत्कार करण्यात आला. शाहूनगर येथील रहिवासी प्रियांका राजगोळकर -बेकवाडकर यांनी दिवाणी न्यायाधीश परिक्षा उत्तम श्रेणीमध्ये उत्तीर्ण होऊन न्यायाधीशपदाला गवसणी घातली आहे. या पद्धतीने न्यायाधीश पदी निवड झाल्याबद्दल प्रियांका यांचे त्यांच्या …
Read More »श्रीक्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर देवस्थानमध्ये गुढी पाडवा उत्साहात साजरा
बेळगाव : हिंदू नववर्ष व गुढी पाडव्याच्या निमित्ताने श्री क्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर देवस्थान ट्रस्टच्यावतीने सर्व पत्रकार बंधूंना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. आज पहाटेपासून मंदिर परिसरात सनई-चौघड्यांच्या मंगल ध्वनीत भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. या पावन दिनानिमित्त रुद्राभिषेक व पंचांग पूजन विधी पार पडले. त्यानंतर मंदिराचे अध्यक्ष राहुल कुरणे …
Read More »बेळगावात गुन्हेगारीवर पोलिसांचा बडगा; तीन सराईत गुन्हेगार 6 महिन्यांसाठी तडीपार
बेळगाव : शहरातील वाढत्या बेकायदेशीर धंद्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी कडक भूमिका घेत तीन सराईत गुन्हेगारांना जिल्ह्याबाहेर हद्दपार करण्याची कारवाई केली आहे. मटका, पत्त्यांचा जुगार आणि गांजा विक्रीसारख्या अवैध कृत्यांमध्ये सातत्याने सहभागी असलेल्या तिघांना सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे. तडीपार करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सर्फराज शब्बीरअहमद शेख (रा. शहापूर), विनायक प्रकाश …
Read More »मध्यवर्ती म. ए. समिती अध्यक्ष दीपक दळवी यांच्या निमित्त उद्या शोकसभा
बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष श्री. दीपक दळवी यांच्या दुःखद निधनाबद्दल शुक्रवार दिनांक 20 मार्च 2026 रोजी सायंकाळी ठीक 4-30 वाजता तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन (ओरिएंटल हायस्कूल जवळ) टिळकवाडी बेळगाव येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.।या शोकसभेस नागरिक व समिती कार्यकर्ते यांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन …
Read More »भारत विकास परिषदेच्यावतीने महिला दिनानिमित्त “होम मिनिस्टर”
बेळगाव : भारत विकास परिषदेतर्फे ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ रविवारी सायंकाळी जीजीसी सभागृहात अपूर्व उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित खास आकर्षण असलेल्या “होम मिनिस्टर” स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रारंभी अक्षता मोरे यांनी संपूर्ण वंदे मातरम् प्रस्तुत केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते भारतमाता व स्वामी विवेकानंद प्रतिमांचे पूजन करून दीपप्रज्वलन …
Read More »कडोलीत रविवारी बांधकाम कामगार युनियनचे उद्घाटन तसेच कामगारांना मार्गदर्शन
बेळगाव : कडोली, चलेवनहट्टी, केदनुर, होनगा, आंबेवाडी, आलतगा, आदी विभागातील बांधकाम कामगार युनियनची स्थापन करण्यात येणार आहे. तसेच या उद्घाटन सोहळ्यानिमित्त बांधकाम कामगारांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. हा युनियन संघटनेचा उद्घाटन सोहळा रविवार दिनांक 22 मार्च 2026 रोजी कडोली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आयोजित करण्यात आला आहे. यावेळी …
Read More »जिल्हाधिकाऱ्यांनी दिली दहावीच्या परीक्षा केंद्रांना भेट
बेळगाव : कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी दहावीची मुख्य परीक्षा आजपासून राज्यभरात सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी शहरातील विविध परीक्षा केंद्रांना प्रत्यक्ष भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी परीक्षा केंद्रांवरील बैठक व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय आणि सुरक्षिततेचा आढावा घेतला. परीक्षा …
Read More »किरकोळ वादातून दोडवाड येथे नातेवाईकाची हत्या; आरोपी 24 तासात पोलिसांच्या ताब्यात
बैलहोंगल : बैलहोंगल तालुक्यातील दोडवाड येथे घडलेल्या खून प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना अवघ्या एका दिवसात यश मिळाले आहे. घरासमोरील रस्त्याच्या वापरावरून निर्माण झालेल्या किरकोळ वादातूनच नातेवाईकाची हत्या करून पळ काढणाऱ्या आरोपीला पोलिसांनी तात्काळ अटक केली. कोप्प अगसी परिसरात राहणारे महेश बसय्या उपनिमठ यांचा १७ मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास खून …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta