पट्टन पंचायतीसह पर्यावरण प्रेमींचे प्रयत्न निपाणी (वार्ता) : बोरगाव शहरात पर्यावरण याचा सुंदर समतोल साधण्याच्या महत्त्वाचे पाऊल उचललेले जात आहे. येथील स्मशान भूमीत पर्यावरण समतोलाच्या दृष्टीने विविध प्रकारची झाडे लावून हिरवाईला नवसंजीवनी देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कडक उन्हात ही या स्मशानभूमीत हिरवाईची झालर दिसून येत आहे. यापूर्वी सार्वजनिक स्मशानभूमी …
Read More »निपाणी परिसरात बैलजोड्या बनवण्याची लगबग
माती मिळवण्यासाठी धावाधाव; शेतकऱ्यांमध्ये सणाची तयारी सुरू निपाणी (वार्ता) : बेंदूर सण केवळ आठवड्यावर आला आहे. त्या पार्श्वभूमीवर निपाणीसह परिसरातील कुंभारवाड्यात यंदाच्या कर्नाटकी बेंदूर सणाचे ‘वेध’ लागले आहेत. शेतीमध्ये वर्षभर साथ देणाऱ्या सर्जा-राजाच्या कृतज्ञतेचा हा सण परिसरात साजरा होतो. त्या पार्श्वभूमीवर कुंभारवाड्यात चिखलापासून बैलजोड्या बनविण्याची लगबग दिसून येत आहे …
Read More »पेरण्या रखडल्याने कृषी सेवा केंद्रे ओस
पाऊस अद्यापही गायब; लाखो रुपयांची उलाढाल ठप्प निपाणी (वार्ता) : मशागतीची कामे आटोपून चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहणाऱ्या बळिराजाची चिंता अधिक वाढली आहे. सुरवातीला दोन-तीन वेळा झालेल्या पावसानंतर तालुक्यातील सुमारे १५ ते २० टक्के शेतकऱ्यांनी खते आणि बियाण्यांची खरेदी करून ठेवली खरी, मात्र त्यानंतर पावसाने अचानक दडी मारल्याने संपूर्ण पेरणीचे …
Read More »शिवाजी विद्यापीठाच्या वतीने उद्या रोजी सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा
बेळगाव : शिवाजी विद्यापीठाच्या कोल्हापूर दूरशिक्षण ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या एम. ए., एम. कॉम., बी.ए., बी.कॉम., एम.बी.ए., तसेच ऑनलाईन एम.बी.ए., ऑनलाईन एम. कॉम., ऑनलाईन एम.एस्सी. (गणित) या अभ्यासक्रमाबरोबरच विविध प्रमाणपत्र अभ्यासक्रमा विषयी बेळगाव येथे प्रवेश माहितीपर शिबिर गुरुवार दिनांक 25 जून 2026 रोजी सकाळी 10-30 वाजता या शिबिराचे आयोजन ओरिएंटल …
Read More »अश्लील व्हिडिओ अपलोड करणाऱ्यांच्या विरोधात केंद्रीय व राज्यस्तरीय यंत्रणा गांभीर्याने कार्यरत
बेंगळुरू : अश्लील व्हिडिओ अपलोड करणाऱ्यांच्या विरोधात केंद्रीय व राज्यस्तरीय यंत्रणा गांभीर्याने कार्यरत असून संबंधितांवर सरकारतर्फे फिर्याद दाखल करण्यात येणार आहे. यानुसार जिल्ह्यातील दीडशे जण पोलिसांच्या रडारवर असून टप्प्याटप्प्याने त्यांच्यावर कारवाई होणार आहे. अल्पवयीनांचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करणाऱ्या विरोधात सायबर क्राईम विभागाने मोहीम उघडली आहे केंद्र सरकारने …
Read More »करामसापच्या बहुभाषिक कविसंमेलनात कन्नड, बंगाली, उर्दू, मराठी साहित्यिकांचा सत्कार; बहुभाषिक रसिकांची बहुसंख्य उपस्थिती
बेंगळुरू : कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद कलबुरगी, बेंगळूरू विभाग आयोजित बहुभाषिक कविसंमेलन दिनांक २१ जून रोजी सायंकाळी बेंगळूरूच्या हेब्बाळ परिसरात अत्यंत उत्साहात पार पडले. बेंगळूरूच्या विविध भागांतील विविध भाषिक कवी-कवयित्रींनी आपल्या स्वरचित कविता मान्यवरांसमोर सादर केल्या. या संमेलनात विषयांचे वैविध्य, शब्दरचना आणि सादरीकरणाची शैली साहित्यविश्वात रमवून ठेवणारी होती. …
Read More »मराठी भाषा प्रेरणा मंच बेळगावतर्फे लक्ष्मी पाटील हीचा गौरव
बेळगाव : श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ येळळूर संचलित श्री चांगळेश्वरी हायस्कूल येळळूर चा 2025 -26 चा निकाल 100% लागल्यामुळे व लक्ष्मी पाटील या विद्यार्थिनींने दहावीच्या परीक्षेत 606 गुण (96.96%) मिळवून बेळगाव तालुक्यामध्ये चौथा क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल मराठी भाषा प्रेरणा मंच बेळगाव तर्फे मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक मानपत्र …
Read More »एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या; तेलंगणा येथील धक्कादायक घटना
नल्लागोंडा (तेलंगणा) : तेलंगणातील नल्लागोंडा शहरात एकाच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह बंद घरात आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घरातून येणाऱ्या तीव्र दुर्गंधीनंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली आणि त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. प्राथमिक तपासात कौटुंबिक कारणांमुळे सामूहिक आत्महत्येचा संशय व्यक्त करण्यात आला असून पोलीस विविध अंगांनी तपास …
Read More »खानापूर शिवाजीनगरात दोन दुचाकींची भीषण धडक; सेवानिवृत्त पोस्टमास्तर गंभीर जखमी
खानापूर : खानापूर शहरातील शिवाजीनगर परिसरात सोमवारी (दि. २२ जून २०२६) दोन दुचाकींमध्ये झालेल्या भीषण अपघातात सेवानिवृत्त पोस्टमास्तर मारुती नारायण दळवी (वय ६८, रा. मणतुर्गा) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर बेळगाव येथील केएलई रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. …
Read More »संकेश्वरमधील हत्या प्रकरणातील ६ आरोपींना २४ तासांत अटक
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील संकेश्वर शहरात झालेल्या बाबू भुसगोळ यांच्या हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना अवघ्या २४ तासांत यश आले असून, या प्रकरणी सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. बेळगावचे पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी पत्रकार परिषदेत या संपूर्ण कारवाईची माहिती दिली. गोरक्षणमाळ भागात पूर्ववैमनस्य आणि नगरपालिकेच्या पोटनिवडणुकीतील राजकीय …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta