Monday , September 21 2026
Breaking News

Belgaum Varta

नागरिकांच्या सतर्कतेमुळे बोरगावमध्ये चोरीचा डाव फसला; दोघा चोरट्यांना पकडण्यात यश

  निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील टेक्स्टाईल पार्कमध्ये चोरी करण्यासाठी आलेल्या चोरट्यांची चाहूल लागताच नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरीचा डाव अयशस्वी झाला. सागर माने यांच्या कारखान्यात चोरी करत असताना दोघा संशयितांना नागरिकांनी रंगेहाथ पकडले असून तिघेजण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. फैयाज कोलार व तोहिद मुजावर (रा. कबनूर, इचलकरंजी) अशी त्यांची नावे …

Read More »

पॉक्सो प्रकरणी आरोपीला ३० वर्षांची सक्तमजुरी

  बेळगाव : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला बेळगावमधील विशेष पॉक्सो न्यायालयाने ३० वर्षांच्या सक्तमजुरीची कठोर शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात न्यायालयाने पीडितेच्या पुनर्वसनासाठी आर्थिक मदतीचे महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. कुलगोड पोलीस ठाण्यातील तक्रारीनुसार, राजू भीमप्पा दोड्डभीमप्पागोळ याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी तक्रार नोंदविण्यात आली होती. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक आनंद …

Read More »

सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी कोल्हापूर शिवाजी विद्यापीठात प्रवेशाची संधी

  बेळगाव : सन 2022-2023 या शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील सीमाभागातील एकूण 865 गावातील जे विद्यार्थी शिवाजी विद्यापीठामध्ये प्रवेश घेवू इच्छितात त्यांच्यासाठी शिवाजी विद्यापीठाने फी सवलत जाहीर केली आहे. यामध्ये अनुदानित अभ्यासक्रमाांसाठी संपूर्ण ट्यूशन फी व विनाअनुदानित अभ्यासक्रमाांसाठी 25% ट्युशन फी माफ करण्यात आली आहे. जे विद्यार्थी वसतिगृहासाठी …

Read More »

प्रकाश मरगाळे यांचा म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने सत्कार

  बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नवनिर्वाचित अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रकाश मरगाळे यांचा म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नवनिर्वाचित अध्यक्षपदी प्रकाश मरगाळे यांची निवड झाल्याबद्दल बेळगावमधील मराठा आणि मराठी प्रेमी म ए समितीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा विशेष सत्कार केला. यावेळी उपस्थित असलेल्या पदाधिकाऱ्यांनी …

Read More »

घुमटमाळ मारुती मंदिरात हनुमान जन्मोत्सव उत्साहाने साजरा

  बेळगाव : हिंदवाडी येथील पुरातन असलेल्या श्री घुमटमाळ मारुती मंदिरामध्ये हनुमान जन्मोत्सव उत्साहाने साजरा करण्यात आला. त्यानिमित्त 1 व 2 एप्रिल रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. एक रोजी सायंकाळी संगीत गुरु शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आदिशक्ती महिला मंडळाच्या महिलांनी भजन सादर केले. त्यानंतर वारकरी संप्रदायाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे …

Read More »

सौंदलगा येथे येणाऱ्या प्रमुख वक्त्यावर बंदी घाला

  ऑल इंडिया पँथर सेनेची मागणी; तहसीलदार कार्यालयाला निवेदन निपाणी (वार्ता) : सौंदलगा येथे होत असलेल्या हिंदू संमेलनासाठी प्रमुख वक्ते म्हणून मिलिंद एकबोटे हे उपस्थित राहणार आहेत. भीमा कोरेगाव दंगलीतील प्रमुख आरोपी असून त्यांची वक्तव्ये दलित हिंदू,- मुस्लिम समाजामध्ये तेढ निर्माण करणे, सामाजिक सलोखा बिघडवणे, संविधान विरोधी आणि जातीय दंगली …

Read More »

….म्हणे मराठी पत्रकारांना बेळगावमधून हद्दपार करा; करवे गुंडांची आत्ता मराठी वृत्तपत्रांवर वक्रदृष्टी!

  बेळगाव : महाराष्ट्र – कर्नाटक सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या दाव्याची जलद गतीने सुनावणी व्हावी यासाठी बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाने एक लाख सह्यांची मोहीम हाती घेतली आहे, या मोहिमेच्या निषेधार्थ करवे गुंडांनी आंदोलन करून बेळगावमधील मराठी दैनिके बंद करून मराठी पत्रकारांना बेळगावमधून हद्दपार करावे, या मागणीसाठी कर्नाटक रक्षण …

Read More »

गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीच्या वतीने AI चा शिक्षणातील वापर व परिणाम व्याख्यानाचे आयोजन

  बेळगाव : गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी तर्फे मराठी माध्यम माझी यशोगाथा या व्याख्यान सत्राच्या अंतर्गत व्हिटीयुचे प्राध्यापक प्रशांत ढोपे यांचे AI चा शिक्षणातील वापर व परिणाम, भविष्यातील संधी या विषयावरील व्याख्यान बेळगाव परिसरातील शिक्षकांसाठी आयोजित करण्यात आले आहे. शनिवार दिनांक 4 एप्रिल 2026 रोजी सकाळी ठीक 11.00 …

Read More »

युवा समिती बेळगावच्या वतीने मध्यवर्तीचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. प्रकाशदादा मरगाळे यांचा सत्कार

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगावच्या वतीने मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. प्रकाशदादा मरगाळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर, शिवाजी हंगिरकर, सरचिटणीस श्रीकांत कदम, खजिनदार विनायक कावळे, सुरज कुडूचकर, किरण हुद्दार, संतोष कृष्णाचे, उमेश पाटील, बाबू कोले, विशाल गौंडाडकर, शेखर तळवार, …

Read More »

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या दोघांना तीन वर्षे कारावास

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात घडलेल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात न्यायालयाने आज महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. भुरणकी गावातील दोन आरोपींना दोषी ठरवत पोक्सो न्यायालयाने कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे. खानापूर तालुक्यातील नंदगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या भुरणकी गावामध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणाची …

Read More »