बेळगाव : आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी नैऋत्य रेल्वेने मोठा दिलासा दिला आहे. धारवाड–पंढरपूर–धारवाड या मार्गावर 23 ते 28 जुलै दरम्यान विशेष रेल्वे धावणार असून, बेळगावसह सीमाभागातील हजारो भाविकांचा विठुरायाच्या दर्शनाचा प्रवास यामुळे अधिक सुलभ होणार आहे. दरवर्षी बेळगाव, खानापूर, हुबळी, धारवाड आणि परिसरातील हजारो वारकरी आषाढी एकादशीसाठी …
Read More »भारतनगर पंच कमिटीची निवड; महादेव तुकाराम पाटील सरपंचपदी
बेळगाव : भारतनगर पहिली गल्ली, शहापूर येथील पंच कमिटीची निवड नुकतीच करण्यात आली. यामध्ये गल्लीतील ज्येष्ठत्वानुसार ज्येष्ठ नागरिक श्री. महादेव तुकाराम पाटील यांची सरपंचपदी निवड करण्यात आली. तसेच सेक्रेटरीपदी श्री. विजय वांगणेकर, तर खजिनदारपदी श्री. प्रभाकर मारुती अष्टेकर यांची निवड करण्यात आली. कार्यकारिणी सदस्य म्हणून श्री. संतोष नारायण कणुकले, …
Read More »पेपरफुटीच्या मुद्द्यावर मोदी सरकारची कोंडी; संसदेपासून पंतप्रधान निवासापर्यंत विरोधकांचा हल्लाबोल
नवी दिल्ली : पेपरफुटी प्रकरण, विद्यार्थ्यांवरील कथित पोलिस लाठीमार आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवरील राजकीय दबाव अधिकच तीव्र होताना दिसत आहे. संसदेत सातत्याने गदारोळ, चर्चेची विरोधकांची मागणी आणि त्यानंतर पंतप्रधानांच्या निवासस्थानाच्या दिशेने काढलेले आंदोलन यामुळे राजधानी दिल्लीतील राजकारण चांगलेच तापले. संसदेत पेपरफुटी …
Read More »कृषी तलावात पडून प्रगतशील शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; कक्केरी परिसरात हळहळ
कक्केरी : कक्केरी येथील प्रगतशील शेतकरी मल्लय्या दुंडय्या हिरेमठ (वय ५२) यांचा मंगळवारी सकाळी शेतातील कृषी तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. मल्लय्या हिरेमठ हे नेहमीप्रमाणे आपल्या शेतात गेले होते. शेतातील कृषी तलावाजवळ वाढलेले गवत व कचरा साफ करत असताना त्यांचा पाय घसरून ते …
Read More »दूषित पाणीपुरवठ्यासह कचऱ्यामुळे शिरगुपीमधील ग्रामस्थांची गैरसोय
निपाणी (वार्ता) : शिरगुप्पी येथे गढूळ पाणी पुरवठा होत असल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. याशिवाय विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत ने ग्रामस्थांना नागरी सुविधा देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. गावातील विहीर संरक्षक कट्ट्याविना असल्याने गटारीचे पाणी त्यामध्ये जाऊन विहिरीतील पाणी दूषित झाले आहे. या ठिकाणी वास्तव्यास …
Read More »कर्नाटक मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर
बेंगळुरू : कर्नाटकातील काँग्रेस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला पुन्हा एकदा विलंब झाला आहे. आजच नव्या मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, आता हा विस्तार आणखी दोन ते तीन दिवस पुढे ढकलला जाण्याची शक्यता आहे. दिल्लीत पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा करण्यासाठी गेलेले मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आज बेंगळुरूला परतणार …
Read More »सार्वजनिक वक्तृत्व कलेवरील ओपन हाऊस कार्यक्रम उत्साहात संपन्न
बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पण आणि बेळगाव टोस्टमास्टर्स सेंटेनरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक वक्तृत्व कला, प्रभावी संवादकौशल्य आणि नेतृत्व विकास यांवर आधारित ओपन हाऊस कार्यक्रम नुकताच बीकन हॉटेल, बेळगाव येथे उत्साहात पार पडला. दि. 18 जुलै रोजी सायंकाळी 4 वाजता आयोजित या कार्यक्रमात सहभागी आणि पाहुण्यांना …
Read More »व्यसन, मोबाईलपासून दूर राहा : वैदेही जाधव
हुंचेनहट्टी, किणयेत स्वास्थ्य संकल्प कार्यक्रम बेळगाव : सध्याच्या काळात तरुणाईमध्ये वाढत चाललेली व्यसनाधीनता आणि मोबाईलच्या अतिवापराचे दुष्परिणाम लक्षात घेता विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दूर राहून आरोग्याची काळजी घ्यावी, तसेच मोबाईलचा आवश्यक आणि मर्यादित वापर करावा, असे आवाहन प्राध्यापिका वैदेही जाधव यांनी केले. श्री क्षेत्र धर्मस्थळ ग्रामाभिवृद्धी योजना, बेळगाव योजना कार्यालयाच्या वतीने …
Read More »जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पावसाचा कहर; २३ जणांचा मृत्यू
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून, विविध दुर्घटनांमध्ये आतापर्यंत २३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या असून, वाहनेही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली आहेत. पूंछ जिल्ह्यात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत चार महिलांसह सात जणांचा मृत्यू झाला. तसेच जम्मू-किश्तवाड राष्ट्रीय महामार्गावर …
Read More »आयएसआयसाठी युवक भरती प्रकरणी ईडीची कर्नाटकातील ८ ठिकाणी धाड
बंगळूर : आयएसआयएस या दहशतवादी संघटनेसाठी युवकांची भरती, त्यासाठी बेकायदेशीर निधी संकलन आणि आर्थिक व्यवहार केल्याच्या आरोपांप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी बंगळुरसह कर्नाटकातील आठ ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले. राष्ट्रीय तपास संस्थे (एनआयए)ने दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे ईडीने तपासाला गती दिली आहे. या कारवाईत ‘इक्रा वेल्फेअर ट्रस्ट’, ‘गायडन्स फॉर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta