Sunday , September 20 2026
Breaking News

Belgaum Varta

निपाणीतील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांना निवेदन

  निपाणी (वार्ता) : निपाणी शहर आणि ग्रामीण भागातील महाविद्यालयीन विद्यार्थी कोल्हापुर येथे उच्चशिक्षण घेत आहेत. परंतु महाराष्ट्रातील शैक्षणिक वर्ष कर्नाटकातील शैक्षणिक वर्षापेक्षा दोन महिने लवकर सुरू होत असल्याने निपाणी आगार प्रमुखांनी येथील विद्यार्थ्यांना कर्नाटक शासनाच्या शैक्षणिक वर्षापासून बस पास देत असल्यामुळे कोल्हापूरमध्ये शिक्षण घेत असलेल्या असंख्य विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान …

Read More »

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी रोटरी क्लब ऑफ बेळगाव उत्तरचे हरित अभियान सुरू

  बेळगाव : आगामी गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासन आणि रोटरी क्लब ऑफ बेळगाव उत्तर यांच्या संयुक्त विद्यमाने शाडूच्या गणेशमूर्तींचा प्रचार-प्रसार करणाऱ्या विशेष अभियानाचा प्रारंभ करण्यात आला आहे. या अभियानाअंतर्गत शहरातील १० ठिकाणी शाडूच्या गणेशमूर्तींच्या बुकिंग व वितरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) …

Read More »

अवैध सावकारी प्रकरणातील फरार आरोपी संकेश्वर पोलिसांच्या जाळ्यात

  बेळगाव : अवैध सावकारी, जादा पैशांची मागणी आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी फरार असलेल्या आरोपीला संकेश्वर पोलिसांनी अटक केली आहे. सदानंद भीमराव हलगे (वय ४७) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. करजगा येथील एका महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, तिने घेतलेल्या कर्जाची मुद्दल व व्याजासह एकूण ३६.७७ लाख रुपये परतफेड …

Read More »

उपमुख्यमंत्रीपदाबाबत पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य; सतीश जारकीहोळींचे स्पष्ट विधान

  नवी दिल्ली : कर्नाटकात अतिरिक्त उपमुख्यमंत्रीपदाच्या चर्चेला वेग आला असतानाच सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अतिरिक्त उपमुख्यमंत्रीपदाबाबत अंतिम निर्णय काँग्रेस हायकमांड घेणार असून, पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल, असे त्यांनी सांगितले. नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जारकीहोळी म्हणाले, “अतिरिक्त …

Read More »

बेळगाव जिल्ह्यात मतदार यादी पुनरीक्षणाला वेग; १८ मतदारसंघांत अर्ज वाटप १०० टक्के पूर्ण

  बेळगाव : मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेला बेळगाव जिल्ह्यात वेग आला असून, सर्व १८ विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदारांना अर्ज वाटपाचे काम १०० टक्के पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली. जिल्ह्यातील ४१.०७ लाख मतदारांपर्यंत अर्ज पोहोचविण्याचे काम यशस्वीरीत्या पूर्ण झाले असून, प्रत्येक मतदाराने मतदार यादीतील आपले नाव, पत्ता …

Read More »

८ ऑगस्टची अंतिम मुदत जवळ; एसआयआर मोहिमेला वेग, बीएलओंची घराघरांत धावपळ

  बेळगाव : मतदार यादी पुनर्निरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेची ८ ऑगस्ट ही अंतिम मुदत जवळ येत असल्याने जिल्हा प्रशासनाने कामाला अधिक गती दिली आहे. ३० जूनपासून सुरू असलेली ही मोहीम निर्धारित मुदतीत पूर्ण करण्यासाठी बूथ लेव्हल ऑफिसर्स (बीएलओ) युद्धपातळीवर घराघरांत जाऊन अर्ज संकलन आणि ऑनलाइन नोंदणीचे काम करत आहेत. आतापर्यंत बेळगाव …

Read More »

आप्पाचीवाडी येथील पुलाच्या कामाला प्रारंभ न केल्यास कर्नाटक राज्य रयत संघटनेतर्फे रस्त्यावरची लढाई

  निपाणी (वार्ता) : आप्पाचीवाडी येथील श्री हालसिध्दनाथ देवालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पुलाची निर्मिती करावी, तालुका पंचायत कार्यालयातील शेतकऱ्यांची प्रलंबित कामे मार्गी लावावीत यासह विविध मागण्यांसाठी कर्नाटक राज्य रयत संघटनेतर्फे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर ही कामे त्वरित करण्याचे आश्वासन पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांसह इतर अधिकाऱ्यांनी दिला होता. मात्र त्याकडे दुर्लक्ष …

Read More »

महाराष्ट्रात मुसळधार पाऊस; कृष्णा-वेदगंगा नदीकाठच्या गावांना पुराचा धोका

  चिकोडी : महाराष्ट्रातील पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चिकोडी आणि निपाणी तालुक्यातील कृष्णा, वेदगंगा व दूधगंगा नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पुराचा धोका निर्माण झाला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कल्लोळजवळ कृष्णा नदीत सध्या सुमारे ६५ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीच्या पाणीपातळीत …

Read More »

बोरगाव अरिहंत को-ऑप. बँकेच्या बेनाडी शाखेचा दहावा वर्धापन दिन

  निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील श्री अरिहंतको-ऑप. क्रेडिट सो.लि., बोरगाव (मल्टिस्टेट) संस्थेच्या येथील शाखेचा दहावा वर्धापन दिन पार ‌पडला. त्यानिमित्त श्री महासरस्वती व महालक्ष्मी पूजनाचा कार्यक्रम झाला. अरिहंत बँकेचे अध्यक्ष अभिनंदन उर्फ बच्चू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहकाररत्न उत्तमपाटील. यांच्या प्रमुख उपस्थित पूजन करण्यात आले. संचालक मंडळ व मान्यवरांच्या हस्ते …

Read More »

सलामवाडीतून श्री भावेश्वरी दिंडीचे पंढरपूरकडे भक्तिभावाने प्रस्थान

  दड्डी : हुक्केरी तालुक्यातील सलामवाडी येथून श्री भावेश्वरी दिंडीचे पंढरपूरकडे आषाढी वारीनिमित्त बुधवारी (दि. २२ जुलै) मोठ्या भक्तिभावाने प्रस्थान झाले. विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या दिंडीमुळे गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. प्रस्थानापूर्वी वाहनाचे विधिवत पूजन तानाजी कळवीकट्टे यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर “विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल” आणि “ज्ञानोबा-तुकाराम” यांच्या …

Read More »