बेळगाव : हलगा-मच्छे बायपासच्या सुरू असलेल्या कामामुळे येळ्ळूर रस्ता बायपास परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल साचल्याने रविवारी भीषण अपघातांची मालिका घडली. निसरड्या झालेल्या रस्त्यावर सुमारे २५ ते ४० दुचाकी वाहने घसरून पडली, तर अनेक नागरिक जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार, हलगा-मच्छे बायपास प्रकल्पाची वाहने येळ्ळूर रस्ता आणि गावातून ये-जा …
Read More »हत्तरगुंजी गायरान जमिनीवरील अतिक्रमणाचा वाद चिघळला; कारवाईसाठी ग्रामस्थांचे तहसीलदारांना निवेदन
खानापूर (प्रतिनिधी) : हत्तरगुंजी (ता. खानापूर) येथील गायरान जमिनीवर झालेल्या कथित अतिक्रमणाविरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले असून, अतिक्रमण तातडीने हटविण्याची मागणी त्यांनी खानापूर तहसीलदारांकडे केली आहे. हलकर्णी ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले असून, प्रशासनाने त्वरित कारवाई न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनानुसार, हत्तरगुंजी गावच्या …
Read More »निपाणीतील तनवीर देसाई याचा विश्वविक्रम; ‘उमलिंगला’ शिखर केले सर
निपाणी (प्रतिनिधी) : निपाणीतील एका साहसीवीराने जागतिक विक्रम करीत आपले नाव जागतिक स्तरावर नोंदविले आहे. येथील सुपुत्र तनवीर शब्बीर देसाई याने लद्दाख लेह येथील सर्वात उंच शिखर सर केले आहे. येथील अकोळ रोड हुडको कॉलनी येथील शब्बीर देसाई यांचे चिरंजीव तनवीर याने काश्मीर लेह लद्दाख येथील सर्वात उंच ‘उमलिंग …
Read More »वांगी पिकातून भरघोस उत्पादन
बेनाडी येथील सतीश पाटील यांचा उपक्रम ; आतापर्यंत ४ टन वांग्याची तोडणी निपाणी (वार्ता) : दिवसेंदिवस शेतीमध्ये अमुलाग्र बदल होत आहेत. नव्या बदलांची खास धरून बेनाडी येथील प्रगतशील युवा शेतकरी सतीश पाटील यांनी हवामानावर आधारित वांग्याचे पीक घेतले आहे. या पिकाचे उत्पादन चांगले होत असून आतापर्यंत त्यांनी ४ टन …
Read More »पाच वर्षांनंतर पुन्हा ई-केवायसी; बेळगाव जिल्ह्यात 22.44 लाख रेशनकार्डधारकांची पडताळणी
बेळगाव : अपात्र बीपीएल रेशनकार्डधारकांचा शोध घेण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाने पुन्हा एकदा ई-केवायसी (e-KYC) मोहीम सुरू केली आहे. पाच वर्षांपूर्वी ई-केवायसी केलेल्या लाभार्थ्यांची नव्याने पडताळणी करण्याचे आदेश अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या आयुक्तांनी राज्यातील सर्व उपसंचालकांना दिले आहेत. त्यानुसार बेळगाव जिल्ह्यातील 22 लाख 44 हजार 860 रेशनकार्डधारकांची …
Read More »रिमझिम सरींच्या भरवशावर भात रोपलागवड; पावसाच्या लपंडावात बळीराजाची जीवाची कसरत
बेळगाव : मान्सूनच्या लहरीपणामुळे संकटात सापडलेल्या बळीराजाला गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसाने दिलास्याचा हात दिला आहे. कडक उन्हामुळे करपण्याच्या मार्गावर असलेल्या पिकांना या सरींनी नवसंजीवनी मिळाली असली, तरीही पुरेसा पाऊस नसल्याने शेतकरी अजूनही चिंतेत आहेत. पावसाच्या भरवशावर आणि वेळ हातातून निसटू नये म्हणून शेतकरी जीवाची कसरत करत …
Read More »शिक्षक भरतीच्या मसुदा नियमांना म. ए. युवा समिती सीमाभागचा विरोध; मराठी उमेदवारांसाठी सुधारणा करण्याची मागणी
बेळगाव : कर्नाटक शासनाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने १४ जुलै २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या GPSTR, PSTR आणि HSTR शिक्षक भरतीच्या कॅडर अँड रिक्रूटमेंट (C&R) मसुदा नियमांवर महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागने आक्षेप घेतला आहे. या संदर्भात समितीने शालेय शिक्षण व साक्षरता विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना निवेदन सादर करून …
Read More »सावंतवाडी–चंदगड रेल्वे मार्गासाठी पुन्हा आवाज; ५० वर्षांनंतरही प्रकल्प रखडलेलाच
बेळगाव : सावंतवाडी–चंदगड तसेच महाराष्ट्रातील सीमाभागातील गावांना रेल्वेने जोडण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. १९७० साली या मार्गासाठी सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यानंतर २०१८ मध्येही नव्याने सर्वेक्षण झाले, मात्र अद्याप या भागातील नागरिकांना रेल्वे सेवेसाठी प्रतीक्षाच करावी लागत आहे. समता सहकारी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आणि कोल्हापूर जिल्हा …
Read More »SIR फॉर्म मराठीत देण्याचे निर्देश; भागोजीराव पाटील, मोतेश बारदेशकर यांच्या पाठपुराव्याला यश
बेळगाव : सीमाभागातील मराठी भाषिक मतदारांना विशेष पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेतील अर्ज व आवश्यक कागदपत्रे मराठी भाषेत उपलब्ध करून देण्याच्या मागणीला यश आले आहे. यासाठी बेळगावचे सामाजिक कार्यकर्ते भागोजीराव पाटील आणि मोतेश बारदेशकर यांनी दिल्ली येथे जाऊन भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांची प्रत्यक्ष भेट घेत निवेदन सादर केले. १६ जुलै रोजी …
Read More »संकेश्वरातील लक्ष्मी देवी यात्रा समितीच्या बैठकीत हिशोबावरून गोंधळ
आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण तापले; पोलिसांच्या मध्यस्थीने वाद मिटला संकेश्वर : हुक्केरी तालुक्यातील संकेश्वर शहरात होणाऱ्या श्री लक्ष्मी देवी यात्रेच्या पूर्वतयारी बैठकीत मागील यात्रेच्या हिशोबावरून दोन गटांमध्ये जोरदार वाद निर्माण झाला. आरोप-प्रत्यारोपांमुळे बैठकस्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. संकेश्वर येथील श्री लक्ष्मी देवी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta