Monday , September 21 2026
Breaking News

Belgaum Varta

गोव्याच्या भाजप आमदार तथा माजी मंत्री जेनिफर मोन्सेरात यांचे निधन

    पणजी : गोव्यातील ताळगाव विधानसभा मतदारसंघाच्या भाजप आमदार तथा माजी मंत्री जेनिफर मोन्सेरात यांचे रविवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्या गेल्या काही महिन्यांपासून कर्करोगाशी झुंज देत होत्या आणि पणजीतील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. निधनाच्या वेळी त्या ५६ वर्षांच्या होत्या. जेनिफर मोन्सेरात या गोव्याच्या राजकारणातील प्रभावी महिला …

Read More »

मिशन ऑलिंपिक गेम असोसिएशनच्या बैठकीत राज्यस्तरीय स्पर्धांचे नियोजन

बेळगाव : मिशन ऑलिंपिक गेम असोसिएशन, कर्नाटक राज्य यांच्या वतीने शनिवारी अंजनेय नगर येथील बास जिम व्यायामशाळेत पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीत राज्यभर विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करून खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी उपलब्ध करून देण्याचा निर्धार करण्यात आला. बैठकीला कर्नाटक राज्याध्यक्ष पै. अतुल शिरोले प्रमुख उपस्थित होते. …

Read More »

महात्मा बसवेश्वर संस्थेच्या कुर्ली शाखेत गुणवंतांचा सत्कार समारंभ

  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील महात्मा बसवेश्वर संस्थेच्या कुर्ली शाखेत गुणवंतांचा सत्कार समारंभ पार पडला. अध्यक्षस्थानी महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेच्या कुर्ली शाखा अध्यक्ष रवींद्र चौगुले होते. शैक्षणिक व राष्ट्रीय सेवा क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंतांचा संस्थेच्यावतीने सत्कार करण्यात आला. शिवाजी विद्यापीठातून भौतिकशास्त्र विषयात पीएचडी पदवी प्राप्त …

Read More »

पाण्यात बुडालेला मृतदेह बाहेर काढण्यात सोशल वर्कर रेस्क्यू टीम, एसडीआरएफ (SDRF) आणि गोकाक अग्निशमन दलाला यश

  बेळगाव : गोकाक परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या एका युवकाचा पाण्यात पाय घसरून बुडाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. रविवारी रात्री उशिरा मिळालेल्या माहितीच्या आधारे सोशल वर्कर रेस्क्यू टीम, एसडीआरएफ (SDRF) आणि गोकाक अग्निशमन दलाने संयुक्तपणे शोधमोहीम राबवून युवकाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. घटनेची माहिती मिळताच सोशल वर्कर रेस्क्यू टीमचे अवधूत तुडवेकर, पद्मप्रसाद …

Read More »

तारांगण-ज्ञानवर्धिनीतर्फे करंबळ येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

  खानापूर : महिलांच्या विकासासाठी आणि त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी विविध उपक्रम राबवणाऱ्या तारांगण, ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठान खानापूर व करंबळ गावचे ग्रामस्थ यांच्यावतीने सोमवार दिनांक 20 जुलै 2026 रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळा करंबळ या ठिकाणी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. ग्रामीण भागातील …

Read More »

भरदिवसा झालेल्या घरफोडीचा छडा; मुख्य संशयित अटकेत, साडेपाच लाखांचे सोन्याचे दागिने जप्त

  बेळगाव : बैलहोंगल तालुक्यातील चिवटगुंडी गावात भरदिवसा झालेल्या घरफोडी प्रकरणाचा उलगडा करण्यात बैलहोंगल पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणातील मुख्य संशयिताला अटक करून त्याच्याकडून चोरीला गेलेले सुमारे ५ लाख ४९ हजार रुपये किमतीचे ५८ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. चिवटगुंडी येथील रहिवासी महांतेश बसप्पा बोगूर (वय २९) …

Read More »

चिखली येथील कुमार विद्यामंदिर आपुलकी सेवाभावी संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

    निपाणी (वार्ता) : शिक्षण हीच समाजपरिवर्तनाची खरी ताकद असून गरजू, होतकरू व गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक ते बळ मिळावे या उद्देशाने कागल येथील तुषार भास्कर संस्थापित आपुलकी सेवाभावी संस्थेतर्फे चिखली येथील कुमार विद्यामंदिर मधील २० विद्यार्थ्यांना शालेय दप्तर, वह्या व विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. संस्थापक तुषार …

Read More »

हलशी– हलशीवाडी रस्त्याची तीन महिन्यांतच दुरवस्था; ग्रामस्थांचा रास्ता रोकोचा इशारा

  खानापूर : लक्ष्मी यात्रेनिमित्त मोठ्या गाजावाजात करण्यात आलेल्या हलशी ते हलशीवाडी या रस्त्याची ठिकठिकाणी अवघ्या तीन महिन्यांतच दुरवस्था झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शिवाजी हायस्कूल ते हलशीवाडी पर्यंतच्या रस्त्यावरील खडी मोठ्या प्रमाणात उखडून निघाली असून अनेक ठिकाणी खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे रस्त्याच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न …

Read More »

बोरगावच्या ‘अरिहंत’च्या डिजिटल बँकिंगमुळे महत्त्वाचे पाऊल

  अध्यक्ष अभिनंदन पाटील : संस्थेच्या क्युआर कोडचे अनावरण निपाणी (वार्ता) : सध्याच्या युगात आधुनिक तंत्रज्ञान ही काळाची गरज बनली आहे. संस्थेसाठी महत्त्वाच्या असलेल्या क्युआर कोड व मोबाईल बँकिंग अॅपचे अनावरण करून आपण डिजिटल बँकिंगच्या नव्या युगात एक महत्त्वाचे पाऊल टाकत आहोत. या सुविधेमुळे सभासद आणि ग्राहकांना घरबसल्या सुरक्षित, जलद …

Read More »

हालशुगरमधील साखर चोरीची चौकशी न झाल्यास मंडल पोलीस निरीक्षक कार्यालयासमोर धरणे आंदोलन

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील श्री हालसिध्दनाथ सहकारी साखर कारखान्यात झालेल्या साखर चोरीच्या घटनेमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र, या प्रकरणी पोलिसांना तपास करण्यासाठी उच्च न्यायालयाने निर्देश असूनही पोलीस तपासात हलगर्जीपणा करत आहेत. त्याविरोधात ७ ऑगस्ट पर्यंत तपास न झाल्यास ८ ऑगस्टपासून मंडळ पोलीस निरीक्षक कार्यालयासमोर …

Read More »