Monday , September 21 2026
Breaking News

Belgaum Varta

केपीएससी अध्यक्ष शिवशंकरप्पा साहुकार निलंबित

  राज्यपालांकडून सर्वोच्च न्यायालयीन चौकशीची शिफारस बंगळूर : कर्नाटक लोकसेवा आयोगाचे (केपीएससी) अध्यक्ष शिवशंकरप्पा एस. साहुकार यांना त्यांच्या दोन मुलींची औद्योगिक विस्तार अधिकारी पदावर बेकायदेशीर निवड झाल्याच्या आरोपांप्रकरणी राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी सोमवारी निलंबित केले. तसेच भारतीय राज्यघटनेच्या कलम ३१७(१) अंतर्गत या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाकडे संदर्भ पाठवावा, …

Read More »

पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांना ब्रह्मचैतन्य रुग्णसेवा फाउंडेशनकडून अन्नपदार्थ व औषध किटचे वाटप

  हिंडलगा : श्री ब्रह्मचैतन्य रुग्णसेवा फाउंडेशन, हिंडलगा आणि फॉरनेस जनरिक मेडिसिन, विजयनगर (हिंडलगा) यांच्या संयुक्त विद्यमाने श्री विठ्ठल-रुक्मिणी वारकरी संस्था, मुळगाव (डिचोली, गोवा) येथून पंढरपूरकडे पायी दिंडीने निघालेल्या वारकरी भक्तांसाठी अन्नपदार्थ व औषध किटचे वितरण करण्यात आले. या सेवाभावी उपक्रमात संस्थेचे अध्यक्ष श्री. थाबाजी रा. शिंदे व उपाध्यक्षा सौ. …

Read More »

एनके एज्युकेशन फाउंडेशनमध्ये अग्निसुरक्षा जनजागृती कार्यक्रम संपन्न

  बेळगाव : एनके एज्युकेशन फाउंडेशन, बेळगाव यांच्या वतीने पीयूसी विद्यार्थ्यांसाठी कर्नाटक अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभाग, बेळगाव यांच्या सहकार्याने अग्निसुरक्षा जनजागृती कार्यक्रम यशस्वीपणे आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अग्निशामक यंत्रांचा (Fire Extinguishers) योग्य वापर, आग लागल्यास घ्यावयाची काळजी, आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षितरीत्या बाहेर पडण्याच्या पद्धती तसेच जीवित …

Read More »

मान्सूनची दडी; राज्यावर दुष्काळाचे गडद सावट

  २९ टक्के पर्जन्यतूट; खरीप पिके संकटात, पुढील पंधरवडा निर्णायक बेंगळुरू : राज्यात मान्सूनने पुन्हा एकदा दडी मारल्याने दुष्काळाचे संकट दिवसेंदिवस गडद होत चालले आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात किनारपट्टी आणि मलनाड भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे प्रमुख धरणांमधील पाणीसाठ्यात काहीशी वाढ झाली होती. मात्र, त्यानंतर पावसाने अचानक पाठ फिरवल्याने जलाशयांमध्ये होणारी …

Read More »

खानापूरात १६ जुलै रोजी एसआयआर प्रशिक्षण शिबिर; डॉ. अंजलीताई निंबाळकर यांचे मार्गदर्शन

  खानापूर : मतदार यादीच्या विशेष सघन पुनरावलोकन (SIR) प्रक्रियेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने खानापूर ब्लॉक काँग्रेसतर्फे गुरुवार, १६ जुलै रोजी सकाळी ११ वाजता स्टेशन रोडवरील टाऊन पंचायत हॉल, खानापूर येथे SIR प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराला डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर, माजी …

Read More »

माऊली स्पोर्ट्स क्लब गर्लगुंजी यांच्या 2026-27 वर्षाच्या क्रिकेट स्पर्धेसाठी जर्सीचे अनावरण

  खानापूर : माऊली स्पोर्ट्स क्लब गर्लगुंजी यांच्या 2026-27 वर्षाच्या क्रिकेट स्पर्धेसाठी जर्सीचे अनावरण काल संध्याकाळी मारुती मंदिर समुदाय भवन येथे पार पडले. माऊली स्पोर्ट्स क्लब गर्लगुंजी या संघाची विजयी घोडदौड सातत्याने चालू आहे. या संघाने 2025/26 या वर्षामध्ये माचीगड पहिला, माळ अंकले पहिला, नंदगड पहिला, जांबोटी पहिला, हलसाल पहिला, …

Read More »

रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

  १७० विद्यार्थ्यांची दंत, हिमोग्लोबिन व रक्तगट तपासणी ; आरोग्य जनजागृतीला चालना बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणच्या वतीने शिवबसवनगर येथील श्री सिद्धरामेश्वर विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी मोफत दंत तपासणी, हिमोग्लोबिन तपासणी आणि रक्तगट निश्चिती शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरात १७० विद्यार्थ्यांची विविध आरोग्य तपासणी करून त्यांना आवश्यक आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात …

Read More »

बेनकनहळ्ळी सरकारी उच्च प्राथमिक शाळेत ‘पाही वाईब्स फाउंडेशन’तर्फे रोपे पुनर्लावणी उपक्रम

  गेल्या वर्षी लावलेली ५६० रोपांची जोमदार वाढ पर्यावरण संवर्धनासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न बेळगाव : पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने सातत्याने कार्यरत असलेल्या ‘पाही वाईब्स फाउंडेशन’तर्फे रविवारी बेनकनहळ्ळी येथील सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळेच्या परिसरात रोपे पुनर्लावणी मोहीम राबविण्यात आली. मागील वर्षीच्या वृक्षारोपण मोहिमेनंतर जी रोपे जगू शकली नाहीत किंवा नष्ट झाली होती, …

Read More »

रवळनाथ युनिक संस्थेचा विस्तार देशभर व्हावा

  डॉ. ज्ञानेश्वर मुळे; रवळनाथची ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा निपाणी (वार्ता) : सहकार क्षेत्रात कार्यरत असलेल्या वित्तीय संस्थांचे पर्यावरण हे केवळ आर्थिक नसून ते राजकीय, सामाजिक स्वरुपाचे आहे. परंतू हे पर्यावरण संतुलित आहे असे नाही. तरी देखील प्रतिकूल परिस्थितीतून या संस्था उभ्या रहात असतात. श्री रवळनाथ हौसिंग फायनान्सने देखील …

Read More »

शहर, उपनगरातील पाणी पुरवठ्याबाबत पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना निवेदन

  निपाणी (वार्ता) : निपाणी शहर आणि उपनगरात सहा दिवसानंतर पाणीपुरवठा होत आहे. याशिवाय नळांना गढूळ पाणी मिळत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत नगरपालिका प्रशासनाला वारंवार कळवूनही त्याकडे दुर्लक्ष झाल्याने पालकमंत्र सतीश जारकीहोळी यांची भेट घेऊन आम्ही निपाणीकर मंडळातर्फे निवेदन देण्यात आले. निपाणी शहरास सहा ते …

Read More »